कष्टाचे चीज
मुलीशी सहज गप्पा मारत असता, जीवनाचा आढावा घेत नाना म्हणाले,
"खरच, त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्यातून अगदी जवळ काही पैसा आडका नसला पण मेहेनत करण्याची व स्वावलंबी बनविण्याची मनातून तीव्र ईच्छा असेल. तर ते मेहेनत व कष्ट करून दोन पैसे मिळवू शकत होते. आणि खरच जे कष्ट करतात त्यांच्या पाठीशी देव असतोच. हे आपण पहातोच.
म्हणतात ना प्रयत्ने वाळूचे रगडीता तेल ही गळे."
या संभाषणाचे उदाहरण म्हणजे आमचे बाबा. महेनत करून विदर्भातून येऊन, चांगल्या स्थितीत जीवन गुजराथ मधे जगले. ख-या अर्थाने शुन्यातून घरदार ,मुले कुटुंबाला उत्तम स्थितीत उभे केले.
आधीची घरची गरीबी. ४ बहिणी ..त्यांची लग्ने झालेली. एक धाकटी बाकी होती. जिला घेऊन व जोडीला आई व बाबा. असे चारजण. .अहमदाबादला आले..तेव्हा अहमदाबाद मधे कापड गिरण्या खूप होत्या. त्यांची आत्या तेथेच रहात होती. तिचा मुलगा कापड गिरणीत कामाला होता. कापड गिरणीच्या शेठचा अगदी विश्वासू माणूस होता ...मराठी माणूस महेनती व प्रामाणिक असतो. हे सर्वत्र मानले जायचे व अजूनही आहे. त्यावेळी अहमदाबाद मघे खूप मराठी माणसे गिरणीत स्पिनिंग मास्टर म्हणून कामास होती
आत्याने स्वतः चया मुलाला सांगून ,भाच्याला पण अहमदाबादला बोलावून घेतले.
ती भाच्याला म्हणाली,
"येथे माझ्या कडे ये. कापड गिरणीत काम मिळेल".
भाचा ,आत्याने सांगितले तसे आला. आधी एकटा आला. काही दिवस आत्या जवळ राहिला.मग स्वतःची खोली घेतली आणि मग आई बाबांना बहिणीला आणले.
गिरणीत ओव्हर टाईम करून पैसे कमविले. लग्न झाले. चौघे जण रहात पण पैशाची ओढाताण व्हायची.
पण जीद्य होती. सकाळी उठून टिफीन घेऊन गिरणी गाठायची.गिरणीत सतत आवाज व केमिकल चा वास.
त्रास व्हायचा ,पण काम तर केलेच पाहिजे.....पुढे लग्न झाले.
लग्ना नंतर पत्नी पण तितकीच जिद्दी. तिने पण त्यावेळी व. फा (व्हर्नीक्युलर फायनल म्हणायचे.)
ते केले की, शाळेमध्ये नोकरी मिळायची. तिने पण शिवण शिक्षिका म्हणून जे काम मिळेल ते घ्यायचे
ठरविले. दोघे जोडीने काम करू लागले. शिवण काम शिकली होती.शिवण कामाचे मशीन हप्ताने घरी विकत त्यावर आजुबाजुच्या लोकांचे शिवण करून दे ,असे करत , जे पैसे मिळतील तेवढाच कुटुंब जनास मदतीचा हातभार हे तत्व लक्षात घेऊन दोघंही मेहेनत घेत.
.गिरणीतून परत आल्यावर संध्याकाळी एका गिरणी तून मशीन ला कव्हर म्हणून कापड्याचे तागे यायचे, त्या ताग्यातून ठराविक पध्दतीने शिवण करून कव्हर बनविण्याचे काम ओळखीतून मिळविले. ती कव्हरे
शिवण्याचे काम.मिळवून त्यातून आवक उत्पन्न केली.अशा रीतीने मेहनत करण्यात कधीच मागे पडत नव्हते. पत्नीस पण म्युनिसिपालटीत शाळेत नोकरी कायम स्वरूपाची खटपट करून मिळाली. मग तर दोघांनी घराचा भार सहज मेहेनत करून उचलला.
मीलची नोकरी झाल्यावर दुसऱ्या गिरणी तर contract वर कामे घेत .महेनतीला कधीच मागे पडले नाहीत.कष्टाचे जीवन जगले पण कधी कोणा समोर हात पसरला नाही. स्वकष्टाने पैसा ,नाव कमविले.
संसारात दोन मुले .एक मुलगा व एक मुलगी . पत्नी शिक्षिका मग काय सरस्वतीला मान असणार च. दोघांनाही शिक्षीत केले . दोन्ही मुले पण शिकून उत्तम नोकरीला लागली.स्वत:चे छोटे घर पण घेतले. अशारितीने कष्ट केल्याचे समाधान मिळाले. व दोघे सुखी समाधानी जीवन जगले. अहमदाबाद ला आले व स्वतः चे घर स्वतः ची दुचाकी.. पण घेतली. मग पुढे मुले पण शिक्षीत होतीच,. आई वडिलांचे संस्कार व त्यांनी आई वडीलांनी केलेले कष्ट पाहिले होते. त्यामुळे त्यांना पण मनात फार आदर होता.पुढे कार पण घेतली.
अशा रीतीने कष्टाळू पण स्वाभिमानी जीवन जगले. सहज एकदा मुलीशी जीवनाचा आढावा घेत म्हणाले,
" खरच आता कापड गिरण्यांना मंदी आलीय .ब-याच नामांकित कापड गिरण्या बंद झाल्या आहेत.पण त्यावेळी त्याच गिरण्यांनी माझ्या सारखी बरीच घरे सावरली. नाही तर मी काय केले असते.तेव्हाच्या महेनत व कष्टाचे चीज झाले. .आता तुम्हीच मला सक्तीने रिटायरमेंट घेऊन आरामदायी सुखी जीवनाचा आनंद देत आहात.
तुम्ही पण दोघेही छान नोकरीत आहात व मला पण विमानाचा प्रवास करविला.घडविला. केवढा आनंद झाला होता.
मागे जीवनात वळून पाहिले तर कळते . प्रयत्न हाच परमेश्वर ही म्हण पटते. जीवनात आम्ही
अशा रीतीने कष्ट केले पण त्या *कष्टाचे चीज* झाले ह्याचा मनात सदा अभिमान राहिला.