शनिवार, १८ जुलै, २०२०

चाराक्षरी राधा कृष्ण

यारिया साहित्य  कला आयोजित
चित्र  प्राणु चाराक्षरी
स्पर्धेसाठी
चित्र  आधारित चाराक्षरी

मंत्र मुग्ध
झाले क्षण
एकरुपी
अंतर्मन..

एक चित्त
निरंतर
नसे जीवा
ते अंतर..

सात्विकता
मुखावर 
पहा कशी
क्षणभर..

कृष्णा  सवे
येता क्षणी
सुखावली  
राधा मनी..

जीवा लागे
एक छंद
मिळे सदा
स्वर्गानंद..

मिटलेल्या 
नयनात
कृष्ण छबी
अंतरात..

जळी स्थळी
तीज मात्र 
दिसे कृष्ण
 एकमात्र..

मन तिचे
सुखावले
पहा कसे 
विसावले..

वैशाली वर्तक






चाराक्षरी
स्पर्धेसाठी
विषय- राधा कृष्ण


जळी स्थळी
तीज मात्र 
दिसे कृष्ण 
एकमात्र

जीवा लागे
एक छंद
तिला मिळे
स्वर्गानंद

कृष्णा सवे
येता क्षणी
सुखावते
राधामनी

त्या राधेच्या
चिंतनात
कृष्ण  नाद
कंकणात

नको नेऊ
मथुरेस
 तू आक्रुरा
श्रीकृष्णास

विनवते 
ती राधिका
कोसताती
 त्या गोपिका

कैसे कंठु 
एक दिन
तुजवीण
जीव क्षीण 

वेड लावे
तो मुरारी
राधा भोळी
ती बावरी

प्रेमभक्ती      
 चे प्रतिक          
 प्रेम त्यांचे
ते सात्त्विक    


वैशाली वर्तक
अहमदाबाद 
गुजरात 



स्वप्न गंध साहित्य समुह
विषय..कृष्णाची विविध रुपे 
शीर्षक.. कृष्ण लीला वरुन नावे
प्रकार चाराक्षरी

सोड वाट 
"नंदलाला"
जाऊ दे ना 
बाजाराला.

सोड "कृष्णा "
तू ओढणी
आल्या बघ
गवळणी

"बंसीधर"
वृंदावनी
वेणु वाजे
रानी वनी

नाव तुझे
रे "माधवा"
राही मुखी
तो गोडवा

यशोदेचा 
"घननीळा"
वाटे तिला 
लडिवाळा

वाजविता
वेणु "कान्हा"
गाईनांही
फुटे पान्हा

खेळ चाले
चेंडू फळी
"घनश्याम"
नील जळी

"राधेश्याम"
काढी खोडी
दुभत्याचे
माठ फोडी.

रास लीला
गोपी संग
रणछोड
त्यात  दंग

विश्वरुप
पाही मैया
दाखविता
तो "कन्हैया"

वैशाली वर्तक
अहमदाबाद







शुक्रवार, १७ जुलै, २०२०

ओढ तुझी छळते मजला

शब्द रजनी आयोजित
उपक्रम- दशपदी काव्य

विषय-  ओढ तुझी छळते मला

कसे सांगू मी तुला, आठवण येते सदा
कधी येशील  तू, हाच प्रश्न मनी सदा

भरारी घेण्या जीवनी जाणे तुझे जरुरी
सारे समजते मनाला तरी खंत वाटे ऊरी

होता सांजवेळ पाहे मी सदा वळूनी
वाटे आलास  तू दारी  आई हाक मारुनी

तव येथे असण्याचा होतो सदाची भास 
तव संगे रहाण्याचा मनी लागलाची ध्यास

आला श्रावण मास येतील  ते सणवार
ओढ तुझी छळते रे वाट  तुझी पाहणार

वैशाली वर्तक

जंगल झाडीत बालकविता

जंगल सफारीत जाऊ चला     
कुतुहल मनी  प्राण्यांचे  तुला    

समोर  पहा हे वानर प्राणी   
खात आहे सारे मानवा वाणी   
देताच पोळी घेऊन पळाला   
कुतूहल मनी प्राण्यांचे  तुला    


हरीणाची जोडी आली धावत   
बसले  दोघे  गवत  चावत   
भित्रट चपळ धावूनी गेला 
कुतूहल   मनी प्राण्यांचे   तुला

अक्राळ विक्राळ हा  ऐटदार   
सिंह गर्जना त्याची जोरदार    
आली ती डरकाळी ऐकायला   
कुतूहल मनी प्राण्यांचे तुला   

पक्षी  सरपटणारे  हे प्राणी  
पहातच हिंडलो गात गाणी    
गंमत वाटली, आनंद झाला   
कुतूहल  मनी प्राण्यांचे तुला  


वैशाली वर्तक

गुरुवार, १६ जुलै, २०२०

एकाच छत्रीत दोघे

उनाड वारा साहित्य परिवार भव्य राज्य स्तरीय  काव्य स्पर्धा

विषय-  एकाच छत्रीत  दोघे

चल आहे  छत्री  एक
आला बघ हा पाऊस
एका छत्रीत चालण्याची
पूरी करु आज हौस

डौलदार आहे छत्री
देते पावसात निवारा
ये अजून जवळ अशी
झोंबतो मुजोर वारा

पावसाने दिली संधी
 जवळ येण्याचा बहाणा
कळतय मला  पण सारे
तेवढा तू आहेच शहाणा

पडो असाच पाऊस
चालू जरा दोघे खेटून
कोणी जन  नाही बघत
नको जाउस तू लाजून

एका छत्रीत चालण्याची
आली का नाही गंमत
तेवढाच थोडा वेळ गेला
वाटली तुला पण जंमत

वैशाली  अविनाश वर्तक.
अहमदाबाद (गुजरात)
8141427430





अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा आयोजित
आला पाऊस प्रेमाचा या व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धेत मी वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद गुजरात मधून सहभागी होत आहे
माझ्या कवितेचे शीर्षक आहे .
..एकाच छत्रीत दोघे



 पहाता पहाता आली सर
सुखावले बघ तन मन
मिळणार नाही अशी संधी
 दवडवू नको एक क्षण 

चल आहे  छत्री  एक.  
आला रिमझिम प्रेमाचा पाऊस 
एका छत्रीत चालण्याची
पूरी करु आज हौस. १

 छत्री आहे डौलदार
 घेऊ तिचाच सहारा
ये अजून जवळ अशी ...२
झोंबतोय मुजोर वारा

मिळता पावसाची संधी 
 जवळीक साधणे हा बहाणा
कळतय मला  पण सारे
तेवढा तू आहेच शहाणा. ३

पडत राहो असाच पाऊस     
चालू जरा दोघे खेटून
कोणीsssss ही  जन  नाही बघत
नको जाउस तू लाजून.      ४

एका छत्रीत चालण्याची
 सांग आली की नाही गंमत
तेवढाच थोडा वेळ गेला
वाटली ना तुला पण जंमत.     ५

प्रीत पावसात अंकुरता
बीजांकुरे फुटे अलवार
*मातीला लागलेले डोहाळे*
पुरविले .पावसाने हळुवार  ६


पाऊस असतोच ग प्रेमाचा
भिजूनी चिंब जाहली धरा
उगा का वाट पहाते  सख्याची
कधी बरसतील वर्षाधारा. ७












विधीलिखीत

रचियता साहित्य मंच आयोजित
भव्य  चौरंगी महा काव्य स्पर्धा 2020
स्पर्धेसाठी
विषय - विधिलिखित           13/7/2020


सामान्यतः असे  वदती जन
जे होते ते असते विधी लिखीत
मग कशाला करायचे प्रयत्न 
व्हायचे ते होणार हे...  खचित

कधी कोणास मिळते चिमूटभर 
तर कोणास मिळते ओंजळभर
ते तर असते विधीलिखीत फळ
तयासाठी लागते सत्कर्माचे बळ

म्हणती वृषभ रास असे भाग्यवान
चुकले का तयांना दुःखाचे पहाड
देवत्व पावूनी पण, कृष्ण अन् रामाला
सुटली नाही  दुःखाच्या नशिबाची पाठ

नैसर्गिक  आपत्तीत दगावतात माणसे
देवाच्या कृपेने तरली जाती लहान अर्भके
तिथे म्हणावे खेळ  विधी लिखीताचा
न करिता सायास जीव वाचविण्याचा

घडायचे ते घडणार ते नाही चुकणार
विश्वास हवा बाहुवर नको हस्त रेखांवर
अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर
मग विधी लिखीताची होते कृपा दृष्टी  आपणावर



वैशाली वर्तक
नोंदणी क्रमांक 189
अहमदाबाद 
गुजरात  स्टेट
8141427330

गीत.... साद मनाची भावगीत

काव्य स्पंदन 02राज्य स्तरीय समूह 
काव्यप्रकार -- भावगीत लेखन
विषय - साद मनाची

तुची असता आमुचा त्राता
घालू कोणाला रे साद आता   .....धृवपद

तू सर्वांचा असशी पालक
तुझे आम्ही अजाण बालक
तुझ्या  कृपेची वाट पाहता
घालू कोणाला रे साद आता

भक्तांचा तू असे कनवाळू
माते सम तू सदा दयाळू
दिन न सरे तुज स्मरता
घालू कोणाला रे साद आता

नयनी आस त्या चरणाची
एकच चिंता ती दर्शनाची
अंत नको पाहू भगवंता
घालू कोणाला रे साद आता

तूची असता आमुचा त्राता
घालू कोणाला रे साद आता

वैशाली वर्तक

बुधवार, १५ जुलै, २०२०

अष्टाक्षरी वाट पहावी चंद्राने

मोहरली लेखणी समूहआयोजित
अष्टाक्षरी काव्य
विषय- वाट पहावी चंद्राने

रोज येते अगोदर
नभी तयास बघून
शशी आला का पाहते
वाट पाहते लाजून

गर्दी  नभात मेघांची
होते दुर्लभ दर्शन
खंत करिते मनात
मनी दाटे आकर्षण

चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय

रोज येतीच चांदण्या
तरी ओढ वाटे मनी
वाट पहावी चंद्राने
मेघ दाटिलेल्या क्षणी

पौर्णिमेच्या त्या रातीला
दिसे नक्षत्रांचे देणे
वाट पहावी चंद्राने
करुनिया नभी येणे
वैशाली वर्तक


बाल कविता.. चल पावसात भिजू. . नदी

यारिया साहित्य  कला
अष्टाक्षरी बाल कविता
विषय- चल पावसात भिजू

शीर्षक- हौस भिजण्याची

चला पावसात भिजू
झेलू पावसाचे पाणी
भिजण्याची  मजा न्यारी
खेळू नाचू गाऊ गाणी

पावसात भिजण्याची
 पूरी करु आज हौस
सरीवर सरी येती
आला रे मोठा पाऊस

नभी गडगडे ढग
मधे वीज चमकते
नका घाबरु वीजेला
बघ म्हातारी दळते

फाडा वहीची ती पाने
करु कागदाच्या  होड्या
सोडू पाण्यात  तयांना
मस्ती करु ,थोड्या खोड्या

पहा पागोळ्या पडती
भरु    थेंब ओंजळीत
फेकू अंगावर  पाणी
मजा येते पावसात

वैशाली वर्तक


बाल कविता.  नदी

नादी

आनंददायी


किती  लांबून आलीस 

नाही का तू थकत

बस ना घटकाभर

कशी येते धावत


येता तुझ्या  जवळ

वाटे प्रसन्न  मनाला

किती डुंबतो पाण्यात

स्फूर्ती  देतेस तनाला


किती वेळ घालवावा

 येऊन तुझ्या  कुशीत

 समाधान  मिळवण्या

येती सारे जन   खुशीत


बदक मासे बगळे

सारे रमतात जलात

पाहून वाटे आनंद

आम्हा मुलांना मनात


येता पावसाळा

घेते तू रौद्र रूप

भासे जणु नागीण

भय वाटे तेव्हा खूप 



वैशाली वर्तक 

अहमदाबाद
















मंगळवार, १४ जुलै, २०२०

भाव भोळा हरी अभंगविठ्ठल

प्रेमाची अक्षरे
महास्पर्धे साठी

अभंग
विषय- भाव भोळा हरी

राजा पंढरीचा  ।         
भक्त गणा साठी ।       
 उभा सदा पाठी ।           :
पांडुरंग ।।                   1

भावाचा भुकेला ।
भाव भोळा हरी ।
धावे भक्ता घरी ।
सदाकाळ ।।               2

नको त्यासी  धन ।                   
हवा भक्ती भाव                       
घेई त्याचा ठाव ।                   
भक्तालागी    ।।               3       


भोळ्या श्रीहरीने  ।
दळण दळिले  ।
अभंग तारिले  ।
भक्तांचेते  ।।                 4

सावळ्या विठ्ठला  ।
ऐक आराधना  ।
करिते अर्चना  ।
भक्तीभावे  ।।                 5         

चला दर्शनाला  ।
आपुल्या अंतरी  ।
आली ही पंढरी  ।
भक्ताघरी ।।                       6

पहा विठु उभा ।
आपुल्या शेजारी ।
सेवाव्रत धारी  ।
पांडुरंग ।।                        7

वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)

रविवार, १२ जुलै, २०२०

मन माझे हे बावरले

मोहरली लेखणी
आजचा उपक्रम - काव्य बत्तीशी
विषय- मन माझे हे बावरले

होते मी चालत माझ्या च
विचारांच्या  तंद्रीत
समोरच उभे ठाकला
येऊनी अवचित

क्षणभर मी गोंधळले
बोलणे न उमजे
मन माझे हे बावरले
काहीच न समजे

उभे दोघेही अबोलच
वदले मी प्रथम
हसुनिया केले स्वागत 
झाले सुरु नमन

केले विचारांचे देवाण
गुज गोष्टी दोघात
ठरले भेटण्या ठिकाण
केले नक्की  झोक्यात

वाढली मैत्री  अपुल्यात 
ओढ ती भेटण्यात
माझे मलाच न कळले
आवडे तू मनात

वैशाली वर्तक

बीज अंकुरे अंकुरे....

रचियता साहित्य  मंचआयोजित
भव्य  चौरंगी महा काव्य स्पर्धा - २०२०
स्पर्धेसाठी                   ११/७/२०२०
        विषय- बीज अंकुरे अंकुरे

     बरसता वर्षा धारा
     रान झाल ओल चिंब
     थेंब मुरता मातीत
    ऊभारुन आले कोंब

    कोंबातून डोकवती
    ईवलीशी दोन पान
    वा-यासंगे देती टाळी
     गात समृध्दीचे गान

     बीजे अंकुरे अंकुरे
     छोटी झाली पहा रोप
     नभाकडे पहाताती
     देण्या शिवारा निरोप

      शेते हिरवी दिसती
      किती पहा ती रेखीव
      जणु रेखाटल्या कोणी 
      ओळी हिरव्या आखीव
    
      दिसे सर्वत्र  हिरवे
      जणु  पाचू पसरले
      बळी राजा सुखावला
      मन प्रसन्न  जाहले

वैशाली अविनाश वर्तक
 

         

वैशाली अविनाश वर्तक
 नोंदणी  क्रमांक 189

अहमदाबाद         
गुजरात  स्टेट
8141427430

चहा आणि पाऊस

शब्दरजनी साहित्य  समूह
उपक्रम आठोळी
विषय - चहा आणि पाऊस

आकाशातील ढगांना
झाली  बरसण्याची घाई
लगेच शब्द येती कानी
चला चहा टाका ताई माई


रिमझिम पडतोय पाऊस
गरम चहा ची वेगळी लज्जत 
घोट घोट गरम पिता चहा
 पावसाच्या थेंबाची पहा गंम्मत

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...