*स्पर्धेसाठी*
शब्दसेतू साहित्य मंच पुणे
तृतीय वर्धापन दिन स्पर्धा
अष्टाक्षरी काव्य रचना
विषय. *धागेदोरे*
धागे दोरे या शब्दात
किती कल्पना आशय
पहा झाल्या अभिप्रेत
हाताळता हा विषय
पाहिजेत धागेदोरे
माळाआणि हारसाठी
बनविण्या सालंकृत
पुष्पमाळ देवासाठी
शोधा तर सापडेल
मुलमंत्र आहे खरा
मिळतील धागेदोरे
शोध अखंडची करा
गत काळाला उजाळा
देत विणतात धागे
जुन्या आठवणी येता
मन जाते मागे मागे
वीण गुंफण कशिदा
काम सुबक सुंदर
विणकामा हवे धागे
दोरे पण मनोहर
असा शब्द धागे-दोरे
सर्व व्यापी विचारात
लागतात लागे बांधे
बहुसंख्य विषयात
वैशाली वर्तक
अहमदाबाद