सोमवार, २ मार्च, २०२०

**जेव्हा लेखणी बोलते**

उपक्रम
**जेव्हा लेखणी बोलते**

न उच्चारता  एक शब्दही
जेव्हा लेखणी बोलते
भाव मनीचे दाविते
गुज मनीचे सांगते

अक्षर  अक्षर  जोडूनी
 शब्दाने गुंफिते मालिका
होते तयार सुंदर  कविता
उमलते मनीच्या भाव कलिका

कधी पडखर शब्दांनी
वाचा फोडते भष्टाचारास
उपयोगी  ठरते त्याक्षणी
थांबविण्या अत्याचारास

अशीच स्फुरली  लेखणी
मिळविण्या स्वातंत्र्यासाठी
हक्काची  करविली जाणीव
बोलली लेखणी जनतेसाठी

लेखणी असतेच तत्पर
बोलण्यास मनीचे भाव
जेव्हा लेखणी बोलते
 भावनांचा लागे ठाव

वैशाली वर्तक   2/2/2020

काव्य पूर्ती......नको निराशाच्या ओळी

रविवार, १ मार्च, २०२०

हृदय मंदिरी दशपदी

हृदय मंदिरी शारदे तुझीच मूर्ती
 तव चिंतन करिते मज दे  तू स्फूर्ती

माते शारदे हृदय मंदिरी ठेवीते तुजला
जड बुद्धी हरण्या ,कृपेचा आशीष दे  मजला

शुभ्र  फुलांच्या माळा धवल वस्त्र परिधान
शांत सोज्वळ तव मूर्ती देई जनास  समाधान

हृदय मंदिरी  नित्य ठेवूनी करिते नमन
तूच विद्येची दायिनी तुला मी शरण

हृदय मंदिरी तुझीच नित्य प्रतिमा  देवी
कृपा प्रसादाचा आशीर्वाद  शीरी तूच ठेवी

वैशाली वर्तक

धरा का रडते

आजचा उपक्रम

अष्टाक्षरी
विषय ---धरा का रडत आहे?

झाली उजाड अवनी
भुमी सारी भेगाळली
तोंड पसरुनी सदा
पाण्या विना तरसली

किती घाव सहणार
उंच  उंच  इमारती
खोल खोल  ते खणूनी
कस तियेचा शोषती

विकासाच्या नावाखाली
मानवाचा अती लोभ
-हास केली राने वने
थांबवुया अती क्षोभ

धरा का रडते आहे
प्रश्न विचारा स्वतःला
तुला उत्तर  मिळेल
देता कौल तो मनाला

करितोस तू मानवा
रोज उठूनी  वंदन
थांबवना -हास तिचा
कर  कर्माचे स्मरण

वैशाली वर्तक

शहर आणि गाव

उपक्रम
शहर आणि गाव

विजेच्या प्रकाशाने  न दिसे
नभीचे तारे शहरात
 रात्रीच्या  चांदण्याचे सौंदर्य
पहाण्यास जावे गावात

गावी शांत निर्मळ जीवन
कधीच नसे धावपळ
 अन्  नेत्रास मात्र  मिळे
पहावयास सर्वत्र  हिरवळ

वहानांची न वर्दळ
रहदारीचा न त्रास
प्रदुषण नसलेले
जीवन गावात खास

आवडे सुख सोयीचे जीवन
त्यासाठी  शहराकडे धाव
पण खरे सुख समाधान
मिळे  गावात हेच नसे ठाव

 आधुनिक औषध उपचार
मिळवण्या शहराकडेच बरे
 गावात कुठून मिळणार सुविधा
जीव वाचविण्या शहरच योग्य ठरे     

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...