सोमवार, २७ मे, २०२४

वस्त्र पात्र प्रक्षालिका. पुणेरी पाटी


वस्त्र,पात्र,प्रक्षालिका..

किती हे शुद्ध मराठी 
अर्थ लागेना सहज 
पुणेकरांचेच डोके
 शब्द -फोडची गरज

 पाटी पहा समोरची
धैर्य, न करी ते मन
काय अर्थ लावायचा
वेडे समजतील जन

रोटी ,कपडा, मकान
जशा मुलभूत गरजा
वस्त्र ,पात्र ,*प्रक्षालिका*
पण गरजेचीच समजा

आता कळले मजला
शब्द आहे परिचित 
*प्रक्षालिका* तर हवीच
वेळोवेळी सदोदित

पाट्या तर पुणेरीच
गोड शब्दी प्रक्षालिका 
मोलकरीण न वदता 
मान देण्याची प्रणालिका

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...