गझल कार्यशाळा उपक्रम क्रमांक 4
वृत्त लवंगलता
मात्रा 8-8-8-4=28
रदीफ.. बाकी काही नाही
अलामत --आ
वैशाली वर्तकवृत्त लवंगलता
8-8-8-4
गुरू जनांच्या आधाराने बाकी काही नाही
प्रयत्न केले आनंदाने बाकी काही नाही.
काय मिळाले काय गमविले हिशोब याचा बघता.
सदैव जगलो व्यवहाराने बाकी काही नाही.
मार्ग न दिसता निराश होणे माहित नाही मजला.
मेहनतीच्या. (आत्मबळाच्या) कर्तृत्वाने बाकी काही नाही
केंव्हा केले सत्कार्य कोणा माहित नाही
जगा सांगतो अभिमानाने बाकी काही नाही
गळता पाने बघवत नाही उजाड राने सारी
आता नटली वैविध्याने बाकी काही नाही
बोलआठवा गुरू जनांचे येतात सदा कामी
होते प्रगती संस्काराने बाकी काही नाही.
वैशाली वर्तक