गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

चित्र काव्य सावली सोबती




सावलीची सोबत

स्वच्छ निर्मल जलात
उभा राहिला  निश्चल विहंग
नजर  सर्वत्र फिरवित
 जलाशय पाहण्यात दंग

बाजुला दिसली  सावली
होती त्याचीच, तया  संगतीला
तसेच मागे जलात प्रतिबिंब
ते. S ही होतेच सोबतीला

जरा करिता हालचाल
बदले  छायेची आकृती
पण प्रतिबिंबित छबी दावी
हुबेहूब .स्व-रुपाची प्रतिकृती

जलातील स्वरुपाला निहाळता
विहंग करी विचार  मनात
जलातील बिंब आहे निरागस
 जैसे  दिसते  दर्पणात 

पण  ,उडून येथून जाता
सावली असेल सोबतीला जीवनी
राहिलं तिच सदैव जवळी
अगदी जीवनाच्या अंतिम क्षणी

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
२६\९\२३

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

लेख..गाय हंबरते

देवाने मानवाला विचार करण्यास आणि  त्या प्रमाणे वागण्यास मेंदू दिला आहे.ऐवढेच नव्हे तर वाच्यता करण्याची अद्भूत शक्ती दिलीआहे . त्यामुळे मानव काय हवे  नको ते   वा त्याचे विचार तो वाणीने संवादातून...वाच्यतेतून सांगू शकतो. .. विचार प्रगट करू शकतो. त्याच्या विचारांचे मंथन करून
एकमेकांत विचारांची देवाण-घेवाण करुन विषयाला पूर्णत्व देऊ शकतो.
     पण प्राण्यांचे तसे नाही. प्राण्यांना आपल्या सारखी वाच्यता करता येत नाही.  पण, प्रेम भावना तयांच्यात पण झरत असते. 
     गाई अथवा सारे प्राणी त्यांच्या हालचाली तून प्रेम व्यक्त करत असतात.ठराविक वेळेनुसार  गाय पिल्लाला चाटून मनुष्यप्राणी जसे बाळास कुरवाळतात ना तसे गाई  पिल्लांना प्रेम करतात. पिल्लास माया करतात.
    गोरज मुहूर्तावर म्हणजे राना वनातून चरून  जेव्हा गुराखी घराकडे परततो तेव्हा  गाय हंबरुन परतण्याची वेळ झाली हे पिलास सांगत असते. हे तिचे  हंबरणे म्हणजे काळजी करण्याचे वा  काळजी   करण्याची पावती असते वा गाईंची  पिल्लांशी सांकेतिक भाषा आहे . 
      माता  असो,  मानवाची  वा प्राण्यांची .... ती प्रेम करतेच. काळजी घेते, निगा घेते. जोवर पंखात  बळ येत नाही तोवर काळजी घेतेच , उगाच का म्हणतात, "घार उडे उंच आकाशी पण लक्ष तिचे असे पिल्लांशी".
   तसेच गाईचे असते. तिचे हंबरते वासराला कळते. हंबरणे ऐकून वासरू धावत गाई माये जवळ येते. तिची वासराला साद कळते.  जेव्हा  गाय व्याते  , पिलास जन्म  देते. जन्म दिल्यानंतर त्याला चाटून साफ करते. हंबरते.प्रेम व्यक्त करते.
        तेच प्रेम माणसात आपण पहातोच. आई बाळाचे प्रेम .मातेच्या प्रेमावर तर लिहावयास बसता
काव्य खंड तयार होतील.आईचे बालका प्रति प्रेम म्हणजे काळजाच्या तुकड्यासमान. यशोदा कन्हैया चे
राम कौसल्येचे प्रेम अजरामर आहेच
       आई मातीच्या गोळ्याला आकार द्यावा तसे संस्कार करून बालकांचे उज्वल भवितव्य घडव�

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

चित्र काव्य. ...रक्षण पर्यावरणचे

*स्पर्धेसाठी*
स्वप्नगंध स्पर्धा समूह आयोजित
स्पर्धा क्रमांक 35
चित्र आधारित
शीर्षक....रक्षण पर्यावरणाचे

येणार घरी माझा बंधुराया 
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाला 
तयासाठी केले नारळी जिन्नस 
करवंटीचा उपयोग वृक्ष-संवर्धनाला

हृदयी  अनुराग  भरलेला
सांगे नसे तो धागा केवळ
मातीत जसे अंकुरले बीज
हृदयी जागा मायेची प्रेमळ


माती रुपी ताई करेल माया
बनुया रक्षक  रानावनाचे
बनवुया  हरित वसुधेला
सुटतील प्रश्न पर्यावरणाचे

सणवारात आणू आधुनिकता
परंपरेला करिता जतन
 मिळेल समाजास संदेश
पर्यावरणचे होईल रक्षण

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...