बुधवार, ९ एप्रिल, २०२५

माझे गाव

पंच रत्न महास्पर्धा
काव्य स्पंदन राज्यस्तरीय शब्द सेतू साहित्य मंच पुणे, समाजोन्नती प्रतिष्ठान, सूर्य गंध 
प्रकाशन आयोजित 
पंच रत्न महास्पर्धा 
फेरी क्रमांक 1
6/4/25
विषय.  माझे गाव
  शीर्षक... माझे अहमदाबाद 

माझे गाव माझे गाव चा
करु नका बरं  गजर,
माझ्या गावाचे गुणगान 
गाण्या आहे ना मी हजर.

 कापड गिरण्याचे औद्योगिक 
 काय वर्णावी तयाची महती
भारताचे मॅनचेटर  म्हणून ख्याती
जूने नाव होते कर्णावती 


 सहाशे वर्षे पूर्ण शहरास
गाव माझे गुजराथची राजधानी 
अहो तेच ते नाव अहमदाबाद 
लोक आहेत सुखी समाधानी 

जनांच्या वाणीत गोडवा 
आदरातिथ्य करी अपार 
कृष्ण भक्तीत सदा लीन 
गरबा रास प्रसिध्द फार

   
 अहमदशहाने वसलेले
  देशाच्या प्रमुख शहरातील एक
  आहे तसे समृद्ध शहर.
  प्रेक्षणीय स्थळे अनेक 

   
   लोक आहेत मन मिळावू
    प्रवीण कुशल व्यापारात
   सण उत्सव करीतात साजरे 
   रहातात एकत्र कुटुंबात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...