मूळ
नदीचे मुळ ऋषीचे कुळ
म्हणे, नव्हे शोधु
न शोधिता नदीचे मुळ
तिचा उगम कसा जाणू.
मानवाची वृत्ती
जिज्ञासु मुळात
पायामुळे शोधण्याचा
छंद भारी जीवास .
छंद जोपासता
मिळे,इतिहास न संस्कृती
संशोधकां नी शोधिली
मानवाची उत्क्रांती.
अंतराळातील प्रगती
दावि जिज्ञासू वृत्ती
मुळात शिरून जाण्याने
प्रगत केली विज्ञान सृष्टी.
न जाता सखोल
भूगर्भ शास्त्रात
कसे मिळाले असते
सूर्य मंडळ मानवास.
मुळ नसते नुसते
झाडात वा वृक्षात
तर मूळ असते
तर्कात, स्वभावात .
मूळ मुद्दा सोडून
करी जो वाच्यता
फोल ठरतो सदा
वादात वा विवादात.
मूळ स्वभावा वरून
व्यक्तिचे ठरते वर्तन
स्वभावातील गुण दोषांचे
होते वागणुकीत दर्शन .
काम कठीण मोठे
मुळारंभ जाणण्याचे
म्हणूनच वदति जन
नव्हे शोधू, मुळ नदीचे
वा कुळ ऋषीचे
नदीचे मुळ ऋषीचे कुळ
म्हणे, नव्हे शोधु
न शोधिता नदीचे मुळ
तिचा उगम कसा जाणू.
मानवाची वृत्ती
जिज्ञासु मुळात
पायामुळे शोधण्याचा
छंद भारी जीवास .
छंद जोपासता
मिळे,इतिहास न संस्कृती
संशोधकां नी शोधिली
मानवाची उत्क्रांती.
अंतराळातील प्रगती
दावि जिज्ञासू वृत्ती
मुळात शिरून जाण्याने
प्रगत केली विज्ञान सृष्टी.
न जाता सखोल
भूगर्भ शास्त्रात
कसे मिळाले असते
सूर्य मंडळ मानवास.
मुळ नसते नुसते
झाडात वा वृक्षात
तर मूळ असते
तर्कात, स्वभावात .
मूळ मुद्दा सोडून
करी जो वाच्यता
फोल ठरतो सदा
वादात वा विवादात.
मूळ स्वभावा वरून
व्यक्तिचे ठरते वर्तन
स्वभावातील गुण दोषांचे
होते वागणुकीत दर्शन .
काम कठीण मोठे
मुळारंभ जाणण्याचे
म्हणूनच वदति जन
नव्हे शोधू, मुळ नदीचे
वा कुळ ऋषीचे