बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

ऋण आई वडीलांचे


 विषय -- ऋण  आई वडिलांचे

आई असते प्रत्येकाची आद्य  गुरु
वडील  असतात पालन कर्ता
दोघांचेही   जीवनभर  असे ऋण
पाल्यांसाठी सदा  ते दुःख हर्ता

तयांच्याच कृपा दृष्टीने
घडते पाल्यांचे भावी उज्वल
ठेवावी ह्याची सदा जाण मुलांनी
स्मरण ठेवावे त्यांचे  हेच मत प्रांजल

उपकारांची न वाचता बाराखडी
बनावे तयांची आधार काठी
ख-या अर्थाने परत फेड करावी
सदा सेवा करुनी रहावे त्यांच्या  पाठी

हौस मौज मुलांची पुरविण्यात
स्वतःच्या  सुखदुःखाचे करुनी दुर्लक्ष
मुले कशी सतत रहातील  सुखी
यात मात्र  सदाची असती दक्ष

 जीवनात नित्य स्मरावे
देवुनिया तयांचा सदा मान
व्हावे श्रावण बाळ समान
राखावा  आई वडिलांचा सन्मान

वैशाली वर्तक  १९/९/२०१९

चिंतन लेखावर नारी लगत चारोळ्या

उपक्रम
चिंतन लेखावर चारोळ्या (5)

1   जिथे पूजनीय असे नारी
     वसते देव देवता तिथे सदा
     मिळे सतत सौख्य सुख तया
      थारा नसे तिथे दुःखास कदा

2     विविध रुपात दिसते नारी
        आई,ताई,वहिनी ,भार्या, मावशी
        सदा वाहे ममता हृदयातूनी
        सर्वच रुपातील ती वाटे हवी हवीशी

3       बहिणीची तर मायाच वेडी
          आई च्या सम ताई वाटे
           वहिनी  पण प्रेमळ सदा
          तिच्यासाठी मनीं आदर प्रेम दाटे

4       आजी तर करुणेचा  सागर
          तिचे प्रेम सर्वात आगळे
          मायेची ऊब सदाच मिळे
          आजीचे प्रेम तर जगा वेगळे

5       अशा विविध रुपातूनी
          नारी असते देवी समान
           तिच्या विणा अशक्य जीवन
          कधी न  करावा तिचा अवमान

  ....,,,,वैशाली वर्तक  23/9/2019




जाग रणचंडीके

 वेळआली नारीशक्ती जागृतीची
सज्ज  हो  तू प्रतिकाराला
नव्हती कधीच तू अबला
आठव तुझ्यातील  नारी शक्तीला

फोड वाचा  अन्यायाला 
अधमांना दे कर्माचे फळ
होऊनी रण चंडीका तूची
दाखव तयांना मनगटाचे बळ

आठव काळ, मर्दानी लक्ष्मीबाईंचा
शौर्य ,धैर्य  अन् पराक्रमाचा
घेऊनी  हाती , कर वार शस्त्राने
राक्षसी दानवी  त्या क्रूर कर्माचा

मात करण्या संकटावरी
स्व-रक्षणाचे घे तू धडे       
नराधमांचा अंत करण्या
तुझे बळ कधी कमी न पडे

जाण्या  सामोरे  नराधमांच्या
धैर्याचे  ठेव सदा हत्यार
नकोच ती , कधी म्यानात
आत्मविश्वासाची तळपती तलवार

आदी काळातील तुझीच रुपे
 आठव दुर्गा ,काली , अंबिके
करण्या  दृष्टांचा संहार 
जागी हो , तू रणचंडीके

वैशाली वर्तक



         
         


       

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

अभंग ...गणेश वंदना ...रुप गणेशाचे

स्पर्धे साठी 
सुधाकरी  विषय -- गणेश वंदना

विनायक तूची   ।
असशी ज्ञानाचा   ।
सकल जनांचा     ।
ज्ञानदाता    ।।

देवांचा ही देव  ।
विश्वाचा पालक  ।
कलेचा जनक  ।
तुची देवा   ।।

प्रथम पूजेचा   ।
असे तुज मान  ।
करिती सन्मान  ।
सदाकाळ   ।।

घेता तव नाम  ।
दुःख  निवारण  ।
आनंदी जीवन  ।
होत असे  ।।

गणराया तुची  ।
आधार विश्वाचा  ।
सा-याच जगाचा  ।
तुची एक  ।।

रणांगणावर  ।
तु ही धुरंधर  ।
दुष्टांचा  संहार  ।
करण्यास  ।।

तुला विध्नेश्वरा  ।
आले मी शरण  ।
करिते नमन  ।
रात्रंदिन  ।।

करी कृपा आता ।
आम्हासी रक्षावे ।
दुःख हे हरावे  ।
सकळांचे ।।

वैशाली वर्तक 9/9/2019


अभंग
*स्पर्धेसाठी*
शब्दसेतू साहित्य  मंच पुणे
आयोजित  राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा
दि .४/२/२२
विषय - रूप गणेशाचे
        *दृष्टांचा संहारी*

रूप गणेशाचे  । तीन अवतारी ।  
दृष्टांचा संहारी  । गणराया  ।।           1

रूप गणेशाचे   ।  दिसे  मनोहर । 
प्रसन्न  सुंदर      ।  स्नेहदायी      ।।     2

भाद्रपद  मासी  ।  पार्थीव रूपात । 
स्मरती मनात    ।  गणेशाला       ।।      3

   नाश करण्यास ।  नामे नरांतक  । 
  तूची विनायक    ।  प्रगटला        ।।       4

गोजीरे ते रूप     ।  बघते मी डोळा  । 
भक्त  झाले गोळा । जन्मदिनी          ।।     5

चौसष्ट कलांचा    । असे अधिपती   । 
तूची गणपती       ।  गणराया          ।।       6

  अथर्वशीर्षाचे       ।  करते  पठण     । 
विध्नांचे हरण       ।  होतअसे         ।।         7

मनी एकाग्रता      । लाभावी मजला । 
स्मरते  तुजला      ।  सांगे वैशू    ।।        8


 वैशाली वर्तक 
अहमदाबाद





आगमन बाप्पाचे

आगमन बाप्पाचे

लागलेच डोळे आता
तुझ्या  आगमना कडे
मनीं रचिते सदाच
कल्पनांचे आराखडे

कशी करावी आरास
याचा करिते विचार
करु काही नाविन्याचा
खास काही तो प्रकार

आतुरता दाटे मनी
लवकर  या हो घरी
पहा केली सजावट
स्वागताला उभी दारी

ओवाळण्या तुम्हा दारी
रेखाटली  ही रांगोळी
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी

झाली हो आगमनाची
मनाजोगी ती तैयारी
दावा रुप मनोहर
तुची आमुचा कैवारी

वैशाली वर्तक.....   28/8/2019

चित्र चारोळी

उपक्रम
चिंतन लेखावर चारोळ्या (5)

1   जिथे पूजनीय असे नारी
     वसते देव देवता तिथे सदा
     मिळे सतत सौख्य सुख तया
      थारा नसे तिथे दुःखास कदा

2     विविध रुपात दिसते नारी
        आई,ताई,वहिनी ,भार्या, मावशी
        सदा वाहे ममता हृदयातूनी
        सर्वच रुपातील ती वाटे हवी हवीशी

3       बहिणीची तर मायाच वेडी
          आई च्या सम ताई वाटे
           वहिनी  पण प्रेमळ सदा
          तिच्यासाठी मनीं आदर प्रेम दाटे

4       आजी तर करुणेचा  सागर
          तिचे प्रेम सर्वात आगळे
          मायेची ऊब सदाच मिळे
          आजीचे प्रेम तर जगा वेगळे

5       अशा विविध रुपातूनी
          नारी असते देवी समान
           तिच्या विणा अशक्य जीवन
          कधी न  करावा तिचा अवमान

  ....,,,,वैशाली वर्तक  23/9/2019

         
         

       

लेकी कन्या सुन सर्मपित

सिध्द  लेखिका
कन्या सुन सर्मपित काव्य

अनघा अनुजा मुग्धा
तीन असती मम कन्या
दोन पहिल्या  असती स्नुषा
मुग्धा माझी कन्या जणु अनन्या

        स्नुषांनी ही सहज घेतली
        घरची जवाबदारी स्वखुशीने
        मुक्त केले मला जीवनात
        जगण्या माझ्या  आवडीने
दोघी सुना झाल्या मुली घरच्या
कौतुक करण्यात मज देती सुख
कन्या तर आहेच गुणाची माझी
कधीच न देते  ती कोणास दुख        
         अशी मी भाग्यवान   गृहिणी
         वसंत फुलविला त्यांनी सदनी
         सदा सौख्य लाभो त्या तिघींना
         ह्याच शुभेच्छा तयांना जीवनी
अशा कन्या लाभता मला
लाभले स्वर्ग  सुख मजला     
सदा मी राहीन ऋणी तयांची
मम घर संसार त्यांनीच सजला.

वैशाली  वर्तक  23/9/2019

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...