गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

पाश मोहाचे सुटेना

लालित्य नक्षत्रवेल
आयोजित 
उपक्रम अष्टाक्षरी

विषय -  पाश मोहाचे सुटेना


मन असते चंचल
काम आहेची कठीण
क्षणा क्षणाला धावते
मनी विचार  नवीन

षडरिपू सहा पहा
ठेव संस्काराची मनी
तरी  ग्रासती मनास 
भूल पाडी शिकवणी

मन कसे आवरावे
मना कधी उमजेना
मन चंचल पाखरु
पाश  मोहाचे सुटेना

माझे माझे सुटेचना
भव ताप जरी फार
जीव अडके मोहात
होता  यातना अपार

पाश मोहाचे सोडण्या
हवी अध्यात्माची जोड
संत वाणी ऐकू  सदा
करी जीवन ते गोड

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

उंबरठा


काव्यलेखन

विषय ... "उंबरठा"


ओलांडूनी जया प्रवेशते घरा 

आहे मान तव उंबरठ्याला

कुंपण आहे तेची कुटुंबाचे

मान मर्यादा असती तयाला !


नित्य कौटुंबिक घडामोडी

सदैव चालीरीती घरादाराला 

आणू नयेत चव्हाट्यावरी 

चूकभूल द्यावी उंबरठ्याला !


वधू माप ओलांडून जाते

पतीच्या घराचा उंबरठा 

उजळण्या दोन कुळे

चालविते संस्कृतीच्या वाटा !


 संस्काराचे जपते बंधन

 राखून थोरांचा सन्मान 

 ध्यानी उंबरठाची मर्यादा 

वाढविते कुटुंबाची शान !


मर्यादा आपापल्या घराची

पाळावी लागते प्रत्येकाला 

तरच कुटुंब आदर्श ठरते

वेळोवेळी मान उंबरठ्याला !


आपले संस्कार व संस्कृती

कर्माचरणाने टिकवून ठेवा 

समतेचे महान राष्ट्र म्हणवून 

जगाला वाटू द्यावा हेवा





आ भा म भा प ठाणे जिल्हा 2

आयोजित उपक्रम क्रमांक 592

विषय - उंबरठा


ओलांडूनी. प्रवेशितो घरा

 मान असे त्या उंबरठ्याला

कुटुंबाचे असते  ते कुंपण

देई मान -मर्यादा  वागण्याला



कुटुंबाच्या नित्य घडामोडी

चालती सदैव घराघरातूनी

न आणाव्या चव्हाट्यावरी

उंबरठ्याची मर्यादा असे मनातूनी


वधू ओलांडून प्रवशिते

उंबरठा पतीच्या घरचा 

उजळण्या दोन कुळे

चालविण्या वारसा संस्कृतीचा.


 जपते संस्काराचे  बंधन

 राखून सन्मान थोरांचा

 ध्यानी  उंबरठाची मर्यादा 

मान वाढविते कुटुंबाचा


कुंपण मर्यादा  घराची

पाळावी  लागते प्रत्येकाला 

तरच कुटुंब  ठरते आदर्श

मान  देत उंबरठ्याला


आपले संस्कार व संस्कृती

करिताती वेळोवळी जाण

म्हणूनच टिकेल राष्ट्र- धर्म 

मनाच्या उंबरठ्याला द्यावा मान


वैशाली वर्तक

अहमदाबाद


मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

आदर्श

सर्वधर्म  समभाव साहित्य मंच
आयोजित 
उपक्रम 
काव्य लेखन 
विषय - आदर्श 


जीवनात दिले संस्कार 
सांगून गोष्टीच्या  चार
करण्या वर्तन जीवनात
थोर व्यक्तीचे ऐका विचार 

बोल मातेचे असती सदा
बनविण्या जीवन आदर्श 
अनुसरता विचार  तियेचे
जीवनात होतो उत्कर्ष

निसर्गाचा पहा आदर्श  
सूर्य चंद्र तारे येती नेमाने  
प्रकाशतात म्हणूनच
ऋतुचक्र घडती क्रमाने

 स्वातंत्र्य वीरांच्या आदर्शाने
भारतभूला शोभवू विश्वात 
आत्मनिर्भयाने करु प्रगती 
हाच रुजवू विचार  मनात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

भूक

भरारी प्रीमियर लीग पर्व ४
फेरी क्रमांक ६ 
सुवर्णसंधी फेरी
प्रकार - मुक्त छंद
विषय - भूक


भूक  ही आंतरिक जाणीव.. मनाची.
नसते ती जाणीव  फक्तनी फक्त
रसनेची वा जीभेची
पोटात उठता आगीचा डोंब
रसना  दाविते इच्छा अन्नाची.
भूक असते ईच्छांची जाणीव
आंतरिक मनाची   आशा
मिळण्याची प्रबळ कामना.
ती असते शाररिक ,मानसिक
कधी आध्यात्मिक  तर कधी बौध्दिक .
भूक असते वाचनाची
होता जाणीव वा प्रबळ कामना
पाय वळतात वाचनालयाकडे
जेथे मिळते खाद्य  वाचनाचे
मन होते प्रसन्न  आनंदित.
भूक असते मायेची
प्रेमाने डोक्यावरून  
हात फिरवावा या जाणीवेची,
माहेरीआलेल्या लेकीला
आईच्या प्रेमळ कुशीची.
भूक असते कानांना पण,
बाळाचे बोबडे बोल ऐकण्याची
तशीच भूक संगीत प्रेमींना
आवडते संगीत स्वर
ऐकण्यास अधीर झालेल्या कानांना सूरांची.  
एवढेच नव्हे  भूक असते 
धरेला  पण,तप्त मातीला
मृग जलधारांची
आसुसलेली भेगाळलेली  तिची काया
जलधारा पडताच 
काळी माय तृप्त होऊनी
मृदगंध पसरवूनी
देते  समाधानाची पावती.
भूक असते  सर्वांना लक्ष्मी प्राप्तीची
एक दोन तीन  गाड्या,तसेच
 घरे मिळवण्याची
भूक आहे अनादी काळापासून.
कधी भूक बनविते 
माणसास अमानुष
भूक वासनेच्या बळी नेणारी.
मानव होतो महत्वाकांक्षी
प्राप्त करण्या भूकेला
अशी ही भूक आहे नितांत.

कोड क्रमांक 5181

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...