सिध्द साहित्यिका समूह
आजचा उपक्रम अष्टाक्षरी रचना
विषय- **सुख आले माझ्या दारी**
सुख वसे मनातच
सांगे साधु संत जना
नका शोधु तया जगी
आहे ते आपुल्या मना
हेच भाव मनी माझ्या
राखियले मी संसारी
भासे मजला सदाची
**सुख आले माझ्या दारी**
कृपा दृष्टीही देवाची
मजवरी सदा साठी
नाही भासली उणीव
हरी उभा माझ्या पाठी
भाग्यवान मी मानीते
वाहे आनंद सरिता
सर्व सौख्य लाभे मज
सांगे ही मम कविता
वैशाली वर्तक
=============
क्षण सुखाचे*
================
क्षण सुखाचे शोधावे
भरलेल्या जीवनाते
आनंदाने सदा जगा
बहरतील ते क्षणाते
पहा ऊषा उजळली
घेत नव्या आशेचा साज
क्षण सुखाचे वेचावे
आनंदाचा लावूनी ताज
होता मना सारखे वाटे
सुख आले माझ्या दारी
उपभोगा क्षण सुखाचा
मनी समाधाने वाटे भारी
ऊषे नंतर येता निशा
टिपूर चांदणे मोहीते मन
लुटा अनामिक आनंद
वाटती हे पण सुखाचे क्षण
भरले हे जग मोदाने
नको उदासिनता मनात
मोद विहरतो चोहीकडे
मिळतात सुखाचे क्षण क्षणात
वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात) 29/10/20
विषय .. सुखाचे चांदणे
सुख वसे मनातच
सांगे साधु संत जना
नका शोधु तया जगी
आहे ते आपुल्या मना
हेच भाव मनी माझ्या
राखियले मी संसारी
भासे मजला सदाची
सुख आले माझ्या दारी
कृपा दृष्टीही देवाची
मजवरी सदा साठी
नाही भासली उणीव
हरी उभा माझ्या पाठी
दिले संस्कार मातेने
राहा सदा समाधानी
तेच ठसविले मनात
सुखी आहे मनोमनी
फुलले सुखाचे चांदणे
वाहे आनंद सरिता
सर्व सौख्य लाभले मज
सांगे ही मम कविता
वैशाली वर्तक
अहमदाबाद
============