मंगळवार, ११ जून, २०२४

प्रणु शब्दावली धुंदी प्रेमाची

स्वप्नगंध  स्पर्धा समूह 
आयोजित स्पर्धा 
प्रणु शब्दावली  काव्यलेखन स्पर्धा 
विषय.. धुंदी प्रेमाची 
शीर्षक..मन रंगले प्रेमात 
पहिली दुसरी ओळ. 2शब्द.... तिसरी चौथी ओळ 3शब्द...1,2,3, ओळीत. यमक स्वर यमक
प्रत्येक कवड्यांची अंती. सम यमक. पाहीजेत उदा. अवचित सदोदित खचित आनंदित धुंदीत 



निहाळते  दर्पणी
आनंदते मनोमनी
 फुलले गुलाब  क्षणी
 येताची मितवा अवचित.       १


 आठविता  मीत
ओठांवरती गीत 
 मस्त धुंदीची प्रीत
आतुरता मनी सदोदित          २

अनुराग ऊरी
नाव तुझेच अधरी
गंधप्रीत दरवळली अंतरी 
धुंदीत सांजवेळ खचित             ३

नकोची बहाणे
 ऐकना  शहाणे
गाऊया प्रितीचे तराणे
होईल मन आनंदित           

उजळले दीप.  
साजणा समीप
पावसाची रीप रीप
अबोल प्रीतीच्या धुंदीत 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

भुजंगप्रयात वृतांत प्र‌यत्न आंबा

किती गोडवा रे  वसे तो हृदयी 
फळांचा असे तूच  राजा खराची 
कितीरे अधीरे मनाने  करूनी
 जिवाला  प्रतिक्षा रहाते   सदाची



किती नाव जाती असे तुझ्या ची
अमृतापरी गोडवा दावी सदाची
किती ही चवीने करीता सेवन
अवीटच चवीने रहातो सदाची

सोमवार, १० जून, २०२४

वाढदिवसाच्या शुभेच्छा / वाढदिवस

 


शुभेच्छांचा वर्षाव*

दिन असे आनंदाचा
करु साजरा मिळूनी
देउ  तयांना शुभेच्छा
अष्टाक्षरी काव्यातूनी

लाभो सृदृढ आरोग्य 
घडो  नित्य रूग्ण  सेवा 
 देवासम  तुम्हा मान
ज्ञानरूपी  तव ठेवा          

लाभो सौख्याचा बहर
मिळो सदा यश किर्ती
सा-या जगी उजळावी
नामांकित तव मूर्ती 

देवी शारदेचे तुम्हा
मिळालेले वरदान
प्रज्ञावंत साहित्यिक 
सर्व  क्षेत्रात  महान

सारे देती शुभाशीष
होण्या तुम्ही औक्षवंत
आईबाबांचे आशिष
तुम्ही खरे भाग्यवंत

काव्यातूनी पाठविल्या
शुभ आशिष शुभेच्छा
पूर्ण  होवोत कामना
ह्याच आमुच्या सदिच्छा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


अ भा म सा परिषद ठाणे जिल्हा 2

आयोजित उपक्रम

1/6/23

विषय. वाढो जगात किर्ती 


आनंदाच्या दिनी आज

लाभो सुखाचे चांदणे

होवो ईच्छांची  पूर्तता  

हेच देवाशी मागणे


लाभो सौख्याचा बहर

मिळो सदा यश किर्ती

सा-या जगी उजळावी

नामांकित तव मूर्ती 


देवी शारदेचे तुम्हा 

मिळालेले वरदान

प्रज्ञावंत साहित्यिक 

सर्व  क्षेत्रात  महान



सदा  चेहरा हासरा  

आकर्षक व्यक्तीमत्व

साहित्यिक क्षेत्रातून

 आगळेच ते प्रभुत्व 


काव्यातूनी पाठवीते

शुभ आशिष शुभेच्छा

पूर्ण  होवोत कामना

ह्याच आमुच्या सदिच्छा


वैशाली वर्तक

अहमदाबाद

अखंडित कल्याणकारी काव्य

9/10/23

उपक्रम स्पर्धा क्रमांक 56

विषय ...   माझा वाढदिवस

   शीर्षक... निरंतर सत्कार्य 


काय योगायोग  पहा

याच मासात माझा वाढ दिन 

सांगा कशी मी राहीन मागे

 रचण्यात काव्य कधीच नसते  क्षीण


 कधी मी, न उच्चारते झालं वय

 असते सदा मी उत्साही 

वय काही फारसे हो नाही !

अवघं पाऊणशे च, फार नाही 


वाचन लेखन रेकॉर्डींगने आजही 

 करिते  नित्यानेअंध जनांना  मदत

समाज कार्यात   समाधान मिळाले

मनाला सात्विक  आनंद, हेच मनोगत


दिधले सर्व काही  विधात्याने

मस्त आनंदी जगले या जीवनी

ऋण आहेत माय पित्याचे

ठेवते जाण त्यांची  प्रत्येक क्षणी


अशीच ठेव सदा देवा 

होवो न तुझा कधी विसर

घडो मज करवी सत्कार्य 

हीच मागणी वाढदिवशी, देवाला निरंतर.


वैशाली वर्तक

अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...