- जीवन कसे जगावे
मानव जन्म हा लाभला करु सोने सर्वस्वाने
दिधले आयु ते देवाने जगु जीवन आनंदाने ... धृ
निशेत दडली पहाट नसे तम सदाकाळ
का बाळगी भिती मनी नको खंत कदाकाळ
आशेची सकाळ येता ,हो सज्ज स्वागता हर्षाने 1
गाणे देई मना आनंद भरु सप्त स्वर मनात
होता संगीतमय जीव, व्यथा जाती दूर क्षणात
मनी राखता हे भाव, भरे जीवन सौख्याने 2
नदी धावे जीवन देण्या, मग का रडत बसणे
करिते का खंत सरिता, काट्यात फुलाचे हसणे.
राहू सदा समाधानी ,सुख येईल नित्याने 3
वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजराथ )
8141427430
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक आयोजित उपक्रम
विषय..जीवन उत्सव व्हावे
इंद्रधनुष्यी रंग सात
स्वर सात संगीतात
सप्त वसती आरोही
अन् तेच अवरोहात
जीवन जगा सप्तसुरांत
घेत साथ संगीताची
म्हणजे उजळे जीवन
येई मजा जगण्याची
येता रवी राजे नभी
ऐका सुरेल भुपाळी
होते मनही प्रसन्न
सूर ऐकता सकाळी
ठेवा सकारात्मक भाव
चाले सुखदुःखाचा खेळ
सुख उद्या येईल दारी
आनंदाचा जमेल मेळ
नदी धावे जीवन देण्या
मग का रडत बसणे
करिते का खंत सरिता
काट्यात फुलाचे हसणे.
ठेवा समाधान मनी
दिधला जन्म देवाने
जीवन करा उत्सव सोहळा
जगुया उत्साही आनंदाने
वैशाली वर्तक
अहमदाबाद