नाती शृंखला
मी माहेरी आले होते .मैत्रिणींना भेटणे वगैरे झाल्यावर एक दिवशी जुन्या कपाटा-कडे गेले. जेथे माझ्या जुन्या वस्तू ठेवल्या होत्या . त्या कपाटात हुसका हुसकी करता एक डबा मिळाला .ज्यात चिमुकला संसार लिहिलेला खोका होता. मी लगेच तो उघडला . तर त्यात माझी बालपणीची खेळ बोळकी मिळालीत. मी अधीरतेने सर्व खेळणी बाहेर काढून त्यावरून हात फिरवू लागले. तो तवा ,तो कुकर , चिमटा ,शेगडी सर्व तसेच होते. त्यावरून हात फिरविता फिरवता मला बालपण डोळ्या समोर आले . त्या खेळा बरोबर मी दिवसाचे किती तरी तासन तास खेळले होते. माझी मामे बहीण स्नेहा पण यावयाची. आम्ही दोघी मिळून आईच्या साड्या नेसून , नेसून कसल्या गुंडाळून खेळायचो. मग मी आईच्या भूमिकेत शिरावयाची व आई ज्या प्रमाणे बोलते तिच्याच पध्द्तीने , आटपा लवकर मला ऑफिसला जावयास उशीर होत आहे, किती कामे बाकी आहेत वगैरे तिची वाक्ये बोलायची . आज आता आम्ही दोघी आपापल्या संसारात रमलो आहोत .
खरच, आई माझ्या साठी किती करावयाची, सतत आमच्या मागे पुढे असावयाची . आई शिवाय क्षणभर पण करमायचे नाही . लहान पणी मी, तशी म्हणे रडकीच होते. आई जरा दिसली नाही तर झाले. संपले. रडून गोंधळ घालायची. सर्व जण मला आईचे शेपूट म्हणून चिडवावयाचे . कित्येकदा तर आई पोळ्या करताना मला तिच्या जवळ दुपट्ट्याने बांधून ठेवावयाची . पुढे मला भाऊ पण झाला . बहीण- भाऊ या नवीन नात्यात बांधले गेले . त्याच्या बरोबर खेळण्यात, मस्ती करण्यात , भांडण्यात वेळ जावयाचा . आमच्या शेजारीच आमची आत्या रहावयाची . आई ऑफिसला जातांना शेजारच्या मावशींकडे आम्हास ठेवायची . पुढे शाळेतून आल्यावर आम्ही त्या मावशीं कडे खेळावयाचो. व. आई येताच तिला बिलगावयाचो .
हळू हळू मी व भाऊ मोठे झालो. मोठे होताना आई बाबा , आत्या , शेजारच्या मावशी याशिवाय आमचे पण वेगळे मित्र मैत्रिणींच्या नात्याचे नवे वर्तुळ तयार होत गेले . मनुष्य जन्मास येतो त्याला तीन जणांचे ऋण असते . पाहिले आई बाबा तसेच नातेवाईक जे त्याच्या आगमनाची वाट पाहत असतात व समाज ज्यात आपण वावरतो, मोठे होतो. तेव्हा माझे पण तसेच झाले. या नात्याच्या गोतावळ्यात अडकत गेले. पुढे शालेय , महाविद्यालयाचे शिक्षण संपवून मी नवीन नात्यात , संसारात गुरफटले . त्यामुळे अजून नवीन नात्याचे अनेक पदर वाढत गेले . पती, सासू- सासरे, दीर, नंणद, जाऊ, भाचे अशी अनेक नात्यांची गुंफण वाढत गेली. व लहानपणी भातुकली खेळणारी मी ,ख-या आई व मुलीच्या नात्यात पदार्पण करती झाले . तासन तास घर घर खेळणारी आता प्रत्यक्षात आईच्या भूमिकेत येऊन ठेपले. गोंडस मुलीची आई झाले. तेव्हा मला तीव्रतेने आईची आठवण झाली. आई म्हणते, त्या प्रमाणे तिने किती रात्र रात्र माझ्या साठी जागून काढल्या असतील , मोठे करताना तिला किती कष्ट झाले असतील याची जाणीव झाली. प्रत्येक आई आपल्या पाल्यांवर जिवापार प्रेम करतेच . तसेच माझे झाले आहे. . मला पण दोन गोंडस मुली झाल्यात . त्यांना गोंजारण्या . मोठे करण्यात , वाढविण्यात, त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्यात दिवस जात आहेत . जे काही आपल्यास नाही मिळाले ते सर्व मुलींना मिळावे यात मी लक्ष देत आहे. कधी तरी एखाद गोष्टींकडे लक्ष देण्यात कमी पण पडते. कारण नौकरी करून घरदार, पै- पाहुणे,येणारे - जाणारे , सर्व पहात संसार सांभाळणे , म्हणजे तारेवरची कसरत असते, पण माझा जोडीदार माझा सखा 'पती' या दृढ नात्याची मला योग्य व सतत साथ करतो. तसेच माझे आई- बाबा, व त्याच प्रमाणे सासू- सासरे यांची फार फार मदत होते. सासूबाई तर अति उत्साहाने माझ्या मुलींना अवांतर शिक्षण देण्यात दंग असतात. त्यामुळे मी या सर्व नात्यांच्या शृखंलेत अडकून आनंद उपभोगते आहे,अनुभवते आहे. आता मोठी मुलगी पण समंजस झाली आहे . ती पण धाकटीला छान सांभाळते. काळजी घेते. लहान असताना तर माझ्याच प्रमाणे ती लहान बहिणीस थोपटवून अंगाई गीत गाऊन झोपवावयाची. तिचे ते छाया- चित्रण मी जपून ठेवले आहे व बरेचदा ती चित्र फीत मी पहाते.
सुरुवातीस या सिंगापुरात आल्यावर ,कोणी ओळखीचे नव्हते पण महाराष्ट्र मंडळात येऊन मला अनेक मैत्रिणी मिळाल्या व मैत्रीचे नाते वाढत गेले. अजून आमचे नाते गुंफण चालूच आहे व यातून आनंद मिळविणे हेच खरे जीवन आहे ना !