शनिवार, ७ मे, २०२२

रंग जीवनाचे

अभा ठाणे जिल्ह्या समूह 1
आयोजित  उपक्रम
7/5/22
विषय -  रंग जीवनाचे

      सप्त रंगी जीवन

आहे बहुरंगी जीवन
हवे तसे  भरावे रंग
भरता रंग होतो आनंद
रंगीत  जीवनी  व्हावे दंग

 होता सोनसळी उषा
रंग उधळे उत्साहाचा
देई मनाला नव्या दिशा
सोहळा भासे चैतन्याचा

नभी येता रवीराज
देती ऊर्जा तना मनाला
कार्यरत होता कामात
वेग येई  उत्कर्षाला

  जीवनात रंग नभीचे 
संध्याकाळी  मोद उरी
शांत सोज्वळ रंगी सांंज
घाव घेती भेटण्या घरी


सुख दुःख तर उन सावली
हर्ष संतोष राखा मनी
जीवन  आहे सप्त रंगी
सार्थक करु क्षणोक्षणी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, ५ मे, २०२२

सासूबाई

माझी  लेखणी साहित्य  समूह आयोजित  
उपक्रमासाठी
विषय - सासूबाई
 आधुनिक सासू

पद मिळता सासूचे
मुठभर चढे  मास
मान वाढणार घरात
असे वाटे मनी खास


 आता राहिले न  ते दिन
देऊन जवाबदारी  सूनेहाती
सासूबाई झाल्यात ख-या ज्ञानी
 जीवनानंद उपभोगण्या जाती

काय हवे ते बनवा सूनबाई
घातले खाऊ  सर्वा आजवर
आता खाऊ तुझ्या  हातचे
फिरुन येऊ आम्ही जगभर

 वेळोवेळी घेईन काळजी
 टाळणार नाही जवाबदारी
देण्या मदतीचा हात सदैव
मनात असेल सदा उभारी

खरे जीवनाचे मर्म 
आता समजले सासूला
आनंदे नांदती दोघीही आता
देत घेतआनंद कुटुंबाला

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, २ मे, २०२२

लय

विश्व शारदा सा म ( मुख्य )
विषय - लय


लय हवी संगीतात
खुलते गाणे खरोखर 
पण लय संगे ताल 
धरावा लागतो बरोबर 

लय ताल चा जुळता
सुंदरसा सहज मेळ
गाणे वाटते मधुर
मजेत जातो वेळ


ठराविक लय राखून 
चालावे जीवनात
नित्य नियमीत कामे
होतात  सारी  झोकात

लय दिसते पशु पक्षात
विहरता नभी खग
एका लयीत जाताना 
रांगेत  जातात मग

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...