गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

अष्टाक्षरी मार्ग दुर्गम

काव्यस्पंदन 
अष्टाक्षरी

कसा नागमोडी मार्ग 
दिसतोय काळाशार 
रहदारी तुरळक
कधी करणार पार


सावलीचे नाही नाव
आहे रूक्षता भकास
नाही ओलावा पाण्याचा
दगडांची भारी रास

मार्ग  आहेच दुर्गम
नाही कुठेच वर्दळ
थांबण्यास न ठिकाण
रस्ता मात्र तो नितळ


कुठे  मैदाने सपाट
येथे खडक दुस्तर
निसर्गाची ही किमया
आहे पहा खरोखर

एका बाजूस  रस्त्याने 
कडे कपारी अपार
घाट आहे वळणाचा
 अवघड  वाट फार


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

श्रावणी सोमवार. भोलेनाथ

शब्दरजनी साहित्य  समूह
विषय - श्रावण सोमवार
*स्पर्धेसाठी*
      *भोलेनाथ*

असे पावन श्रावण
सोमवार त्यात खास
सर्व  सणांचा महिमा
शिव शुंभुचा हमखास    1


बिल्वपत्र वाही शिवा
 भक्त सारे होती गोळा
उपवास करी जन
 भासे  मंदीरी सोहळा    2

सोमवारी शिवामुठ
नामजप बेलपान
ओम नमः शिवाय
ऐकता हरपते भान 3

सोमवार आवडीचा
शाळा सुटे लवकर
शिवालया जाण्यासाठी 
होउ तयार भरभर   4

भक्ती भावे पुजू शंकरा
करु नित्य आराधना
होई प्रसन्न  महादेव
आळविता त्याची प्रार्थना  5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

छंद मजला निसर्गाचा

छंद असती अनेक
कुणा असे लिखाणाचा
कुणी नादिष्ट गायनाचा
छंद मजला निसर्गाचा 

छंद असे विरंगुळा
मना मिळतो आनंद
वेळ जातो सहजच
नित्य जपावे छंद


रोजचाच सुर्योदय
पाही मी नवीनतेने
भासती किती छटा
रंगते  सृष्टी सहजतेने

 कलिका होती रात्रीत
  उमलते कशी अलवार 
 गंध पसरतो आसमंती
  फूल हसते हळुवार 

समुद्राच्या  लाटा येती
भेटण्या किना-यास उफाळून
येता किनारा लाट ती
चूर चूर होई लाजून

उषःकाल होता ऐकते
किलबिलती पहा पक्षी
कशी जाती विहरत
दिसे  नभी सुंदर  नक्षी

निसर्गच खरा चित्रकार
सृष्टीवर दृश्य अविरत
रंगवी तयांना मनोहर
मोद देई सदा खचित


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...