शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

सहाक्षरी इंद्रधनु

सहाक्षरी रचना
षडाक्षरी रचना
इंद्रधनु प्रेमाची अक्षरे

इंद्रधनु

बांधले तोरण
नभास सुंदर 
कमान रंगीत
दिसे मनोहर

सूर्य किरणाचे
ते  पृथक्करण 
दिसे सातरंगी
ते वर्गीकरण 

कोणी हा बांधला
क्षणार्धात  पूल 
खेळ तुझा न्यारा
 दिसे अनुकूल 

निसर्ग दाखवे 
त्याची कलाकृती
इंद्रधनु दिसे
सुंदर  आकृती

 इंद्रधनु रंगी  
रंगवा जीवन
लाभे जीवनास
नवे संजीवन

वैशाली वर्तक

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

अभंग तूच मार्ग दाता / शरण तुजला (भक्तीगीत)

काव्य स्पंदन 02 राज्य स्तरिय 
उपक्रम 
काव्य प्रकार  - अभंग 

रामा रघुराया
तुझाच आधार 
जगताचा भार
सावराया                1

कोण दाखवेल
मार्ग  मानवाला
सा-या जगताला
तारण्यास                2

सुचते  न काही
प्रसंग हा बाका
देतो आम्ही हाका
मार्ग दाता                   3

काय कैसे करु
ये ना उध्दाराया
तूच रामराया
जगताला                      4

करीती प्रयास 
जरी सारे जन
निराशले मन
मार्ग दाता                    5

तूच मार्ग दाता
कर रोग मुक्त
आले तुझे भक्त
चरणाशी


रामराया तूला 
आले मी शरण
करिते नमन
मार्ग दाता


वैशाली वर्तक







 
काव्य स्पंदन 02 राज्य स्तरिय 
घड्याळ

मातृभुमी.. तिरंगा/जल्लोष भारत मातेचा /चिरायू होवो प्रजासत्ताक दिन आज तिरंग्यात पावन झालो

अष्टपैलू संस्कृती  कला अकादमी मुंबई आयोजित
राज्य स्तरीय काव्य लेखन स्पर्धा  क्रमांक 5
विषय -- मातृभुमी

काव्य प्रकार अष्टाक्षरी

         मातृभुमी

माझी  मातृभुमी मज
जिचा मला अभिमान
प्राणाहून असे  प्रिय
तिच्या  गौरवात शान

भाव वसे समतेचा
नांदी धर्म ते अनेक
नसे भेद- भाव जना
अशी भुमी , जगी एक


पहा किती एकात्मता 
होती संस्थाने अनेक
मान ठेवून शब्दांचा  
अखंडित  झाली  एक


भुमी स्वातंत्र्य वीरांची
आहे शूर वीरांची गाथा
लाल- बाल- पाल स्मृती 
स्मरताच , टेके माथा

देश हा आत्म निर्भर
येता प्रसंग तो बाका
स्वावलंबी होती जन
येता मदतीच्या हाका

नव्या युगाचे बदल             
प्रगतीची ती चाहुल
राही सतर्क शास्त्रज्ञ 
जगी पुढेची पाऊल

        
  वैशाली वर्तक  15/10/2020



सावली प्रकाशन समूह 
विषय -- तिरंगा


...तिरंगा

पहा   फडकतो तिरंगा नील गगनी 
 वाटे अभिमान तो मजला क्षणो क्षणी 
        
  तीन रंगात पहा ,भाव दावितो शुध्द
  हिरवा दावी देश ,आहे सदा समृध्द
  भगव्यात त्यागाची, भावना सांगे मनी
 वाटे अभिमान तो, मजला  क्षणोक्षणी      1

पाहून तिरंग्यास ,उर  येतो भरुनी
क्रांती वीर लढले, तया कवटाळूनी
हुत्म्यास पांघरता  , दुःख दाटते मनी
वाटेअभिमान तो, मजला  क्षणोक्षणी           2

शान तिरंग्याची ती , मोद देई मनाला
श्वेत रंग संदेश  , शांतीचा जगाला
कार्यरत रहाण्या, सांगे  तो चक्रातूनी
वाटे अभिमान तो , मजला क्षणो क्षणी           3

सदा राखूया मान, आपुल्या तिरंग्याचा 
नाही होऊ देणार अवमान कधी त्याचा
राहिल फडकत ,अखंडित गगनी
वाटे अभिमान तो, मजला क्षणोक्षणी             4

वैशाली वर्तक














शब्दरजनी साहित्य  समूह 
विषय -- जल्लोष भारत मातेचा

जल्लोष भारत मातेचा

आज दिन प्रजासत्ताक 
करिती साजरा जन सारे
हर्ष अन्  उल्हासात
लावूनिया देशभक्तीचे नारे
 
जल्लोष भारत मातेचा
  देश प्रेम नागरिकांच्या मनात
समतेचा समानतेचा भाव 
दाविती गौरवाने जगतात

मनी ठेवती आदर भाव 
स्वातंत्र्यासाठी अर्पून प्राण
घरा दाराची करुनी होळी
देशासाठी  शहिदांनी केले बलिदान

तिरंगा  देशाचे मान चिन्ह
तयाची  आहे आगळी शान
फडकत राहो तो अविरत
मनी नागरिकांच्या असे मान


 करु जल्लोष  भारत मातेचा
 संपन्न समृद्ध करण्या देशाला
  बनेल आत्म निर्भर नागरिक
  लहरत ठेवण्या तिरंग्याला

वैशाली वर्तक


विषय .. ..*चिरायू   प्रजासत्ताक दिन*


ठेवू मान स्वातंत्र्य दिनाचा
नाही प्राप्त झाले  ते सहज
स्वातंत्र्य वीरांनी अर्पियले
प्राण त्यांनाच स्मरणे गरज.


नव्हते स्वातंत्र्य आपणास
केल्या चळवळी अविरत
किती सोसावा त्यांचा अन्याय
आधी करावा स्वतंत्र भारत

 केले देशासाठी दुर्लक्षित       
 स्वतःची कुटुंब  व संसार. 
 देश केला पारतंत्र मुक्त
 स्वातंत्र्य प्राप्ती हाच विचार 


 प्रजासत्ताक दिन साजरा
 करिती स्वतंत्र भारताचा
 प्रजेच्या सत्तेने चाले देश
 आनंदी दिन सा-या देशाचा


 बलसागर होवो भारत
 असती  आपुल्या अभिलाषा
 चिरायू  प्रजासत्ताक दिन
जगी  उन्नत भारत आशा





माझी लेखणी साहित्य  मंच शहापूर , जि  ठाणे
आयोजित 
स्वातंत्र्य  दिननिमित्ताने विशेष , भव्य दिव्य  महास्पर्धा
विषय -  आज तिरंग्यात  पावन झालो मी. 
   
       "देशासाठी प्राण अर्पण"

होते ध्येय  स्वातंत्र्य प्राप्तीचे
भारतमातेला स्वतंत्र  करण्याचे
आपल्याचा देशात आपण गुलाम 
कधीच मनास न रुचण्याचे

केले प्रयत्न  देशभक्तांनी
तिरंग्याचा सदा राखिण्या मान
धरूनी स्वातंत्र्याची कास मनी
"वंदे मातरम्" चा सदा अभिमान

हसत साहिला तुरूंगवास
करुनी घराची राख रांगोळी 
आस स्वतंत्र भारत पहाण्याची 
हटले नाही मागे झेलता गोळी


 होते  असे वीर देशप्रेमी
वदले मरणांन्ती प्रसन्न  मनाने
"आज तिरंग्यात पावन झालो मी"
 अर्पीला प्राण देशाभिमानाने.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा 
दि 24/1/24
काव्यलेखन
विषय... प्रजासत्ताक दिन देशाचा अभिमान 
 शीर्षक...चिरायू   प्रजासत्ताक दिन

ठेवू मान स्वातंत्र्य दिनाचा
नाही प्राप्त झाले  ते सहज
  अर्पीले प्राण शूर वीरांनी
 स्मरण करणे त्यांचे गरज
 
नव्हते स्वातंत्र्य आपणास
केल्या चळवळी अविरत
किती सोसावा त्यांचा अन्याय
आधी करावा  स्वतंत्र भारत

 केले देशासाठी दुर्लक्षित       
 स्वतःचे कुटुंब  व संसार. 
 देश केला पारतंत्र मुक्त
 स्वातंत्र्य प्राप्ती मनी विचार 

बाबासाहेब आंबेडकर
 संविधानाचे खरे शिल्पकार
तोच दिवस प्रजासत्ताक 
म्हणून त्यांचा जयजयकार 

 प्रजासत्ताक दिन साजरा
 करिती स्वतंत्र भारताचा
 प्रजेच्या सत्तेने चाले देश
 आनंदी दिन सा-या देशाचा

 बलसागर  भारत होवो 
विश्वात शोभावा अभिलाषा 
 चिरायू  प्रजासत्ताक दिन
  उन्नत भारत  ही मनीषा

वैशाली वर्तक
अहमदाबाद



मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

गीत.....आले लावण्य भरास

विषय - आले लावण्य भरास 


वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप
येता जाता चाळा लागे बघण्याचे ते स्वरुप


विचारते दर्पणाला सांग कशी मी दिसते
उगा पदर ढळता  मान वेळावून बघते
 माझे न मी  रहाते ,मोदभरे मनी खूप 
           वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप      1

चोळी झाली घट्ट सर आले लावण्य भरास 
गाली फुलले गुलाब छंद जडे नटण्यास
घेई चाहुल मन ते उगा वाटे हुरुप
              वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप      2

ओढ लागे सांजवेळी  कुणीतरी यावे वाटे
पारिजात गंधाळता  फूलासंगे हर्ष दाटे
 यावा अवचित पाहुणा  मजसी अनुरुप
                वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप      3


बट लाडिक भाळीची उगा बोटाने  सावरे
वारा खट्याळ तिजला पुन्हा पुन्हा  न आवरे
मनी भावला खेळ हा  झाले तया एकरुप
                    वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप   4

भावगीत ...... भेट आपुली स्मरते

भेट आठव अपुली, चंद्र  साक्षीत घडलेली   16
  हाती घेवूनीया हात वचने ती  दिधलेली   16


    गंध  येई सुमनांचा थंड हवेचा  गारवा       16      
धुंद रात्री मिळुनिया, गोड गायिला मारवा      16
किती  मधुर सुरात चांदरात  रंगलेली   16
          भेट स्मरे अपुली, चंद्र  साक्षीत घडलेली   16

  फुले  हसली गंधित पाहूनी अबोल प्रीत   16  
  वदली  ती हळुवार  ,  हीच असे प्रेम रीत   16   (  हीच का प्रेमाची रीत)
  ऐकून शब्द कानी,   अलवार  उमलली   16
    भेट स्मरे अपुली, चंद्र  साक्षीत घडलेली   16

 अवचित आलो  आज   चंद्र  पहा तो  हसला    16
आठवून ती रात्र, वृक्ष  फुलांनी बहरला   16         
तया आपुली प्रीती ही , मनातून  स्मरलेली  16
भेट स्मरे अपुली, चंद्र  साक्षीत घडलेली   16

  .....वैशाली वर्तक10/11/20





 
 चित्र   काव्य
 
आठव ती भेट आपुली
चंद्राच्या साक्षीत घडलेली
 घेऊनिया हात हाती
 वचने ती  दिधलेली

स्मरतो तो गंध सुमनांचा
मंद हवेतला गारवा
धुंद रात्री  दोन जीवांनी
गोड गायला मारवा



 उमलेली गंधीत फूले ती
हसली पाहूनी अबोल प्रीत
कुजबुजली एकमेकात
 अशी असते प्रेमाची रीत

आज आलो पुन्हा  तेथेच
तोच चंद्र  पहा  हसला
आठवता  ती मुग्ध रात्र
वृक्ष फुले उधळीत बहरला

  .....वैशाली वर्तक








सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

चित्र काव्य

रंग मोहक तुझे रे
वेड लावतसे जीवास
पसरलेल्या  पंखांनी आता
घे स्वानंदे भरारी उडण्यास

शोध तव साथीदारांना
विहरताती मस्त  नभात
आठव तुझे जोडीदार
फिरण्या हिरव्या राना वनात
 

 उषःकालच्या   किलबिलीत
 ओळखतील तुझा  रव
   मनास होईल समाधान
 असता सकाळ ती निरव

भेट तुझ्या  सवंगडींना
घेता झोके फांदीवर 
लुट स्वच्छंदे जगण्याची
दाणे टिपण्यात भरभर

पाहून तुझी भरारी
दिला मनास आनंद
क्षणभर लागला मनी
तुला पहाण्याचा छंद

वैशाली वर्तक
रंग मोहक तुझे रे
वेड लावतसे जीवास
पसरलेल्या  पंखांनी आता
घे स्वानंदे भरारी उडण्यास

शोध तव साथीदारांना
विहरताती मस्त  नभात
आठव तुझे जोडीदार
फिरण्या हिरव्या राना वनात
 

 उषःकालच्या   किलबिलीत
 ओळखतील तुझा  रव
   मनास होईल समाधान
 असता सकाळ ती निरव

भेट तुझ्या  सवंगडींना
घेता झोके फांदीवर 
लुट स्वच्छंदे जगण्याची
दाणे टिपण्यात भरभर

पाहून तुझी भरारी
दिला मनास आनंद
क्षणभर लागला मनी
तुला पहाण्याचा छंद

अभंग साहित्याची गोडी....साहित्य

सावली प्रकाशन समुह
काव्य प्रकार -- अभंग
विषय -- साहित्याची  गोडी

स्पर्धेसाठी

वाचन आवड   । 
करीते मनन     । 
देतसे स्फुरण   । 
विचारास ।।           1

असता मनात   । 
वाचनाची गोडी   । 
लिखाणास जोडी  । 
मिळतसे ।।              2

ओढ साहित्याची । 
मनी संकल्पना । 
मिळते  कल्पना । 
लिखाणास ।।        3

किती पहा त-हा  । 
मोठाच पसारा । 
गद्य पद्य धारा । 
साहित्याच्या ।।      4

मराठी साहित्य । 
आहेच सखोल  । 
जाणा त्याचे मोल । 
वाचुनिया ।।          5

संताचे वाङमय । 
देते मना शांती । 
नुरतेच भ्रांती । 
जीवनाची ।।        6

विनोदी रहस्य । 
मार्मिक सात्विक । 
प्रतिभा प्रतिक । 
प्रकार ते ।।             7

म्हणूनच ऐका । 
साहित्याची  गोडी। 
मना मना जोडी । 
सांगे वैशू  ।।    8

वैशाली वर्तक

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...