सिध्द साहित्यिकका समूह
विषय - माझा आधार कुटुंब
कुटुंब नसे चार व्यक्तींचा
सहज एकत्र रहाता मेळावा
तर असे प्रेमाचा जिव्हाळ्याचा
एकमेका जीव देणारा गोतावळा
आई करीतसे संस्कार सिंचन
बाबा असती कुटुंंब आधार
प्रेमळ नाते भाऊ बहीणीचे
ताई उचले आईसंगे घराचा भार
भिंती घराच्या असती खंबीर
जिव्हाळ्याच्या घेती ठाव
सदा एकमेकांना देती साथ
नित्य एकमेकांशी प्रेम भाव
नाती गोती जपत कुटुंब
सदा मनी कुटुंब अभिमान
सुख आनंद मिळवे जीवनात
कुटुंब जनांचा वाढे जगी मान
रहातो सदा गुण्या गोविंदाने
नसतो विचार स्वार्थाचा
देणे आनंद सुख कुटुंब जनांना
हाच विचार सदा मनाचा
वैशाली वर्तक