गुरुवार, २६ मार्च, २०२६

चित्र काव्य


नसे चिंता उन पावसाची 
 मिळविण्या रोजची भाकरी
निघाली पहा ललना
नाही करित कोणाची चाकरी

नवीन घेऊनी भांडी
सांभाळीत डोईवर भार
तान्हास बांथून कडेवर
कष्ट करायला तयार

जुने घेऊनिया कपडे 
 मुखाने भांड्यांची आरोळी
देते नव नवी भांडी
वणवण फिरे घरांच्या ओळी .

 ताई माई ऐकता तिची हाक
   बोलावी तिजला त्वरित 
वाट बोहारणीची पाहून 
वस्तू विनीयम करित

असा रोजचा शिरस्ता 
 नाही वाटे कधीच शीण
रोज वेगवेगळ्या पेठेत 
 फिरता होत नाही क्षीण

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...