शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

पाणपोई

सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच 
आयोजित उपक्रम 
विषय...पाणपोई 

नाही सहन  होतोय
 गर्मी नि उन्हाळा 
होई अंगाची काहीली
वाटे यावो पावसाळा.

सूर्य ओकतोय आग
नाही जरा दया माया
भाजून काढी अंगाला
सारे जन शोधी छाया

ठेवा पाणी पक्षांना 
व्याकुळ होती तहानेने 
मिळता पाणी पहा कशी
भिरभिरती आनंदाने 

 
पथिकाची शमविण्या तृष्णा 
पाणपोई करा तयार 
पाणी पिऊन मिळे शांती
जल असे जीवन अपार 

गुरे शोधती निवारा
चारा सारा वाळलेला
ठेवा पक्षांना पाणी
उन्हाने जीव कासावलेला



वैशाली वर्तक
अहमदाबाद

लेख. अनुभुती

अनुभूती ही आपल्या विचारांना तसेच, आपल्याला विचार सरणीने म्हणा   वा  मनातील भावनांना ,आणि
 आपल्या विश्वासाला... श्रद्धेला,  जीवनात केलेल्या कामाची,  आपल्या इंद्रियांना जाण करून देणारी 
प्रक्रिया वा नकळत  घडणारा अद्भुत योग म्हणूया.   अनुभवावरून आपण तारतम्य काढू शकतो पण अनुभुती ही कदाचित नेहमीच्या अनुभवाने तयार झालेली दृढ विश्वासाने न घडणारी गोष्ट घडते व मनास आनंद देते. 
माणसाला कष्ट पडले वा  कष्टापेक्षाही दु:ख झाले ..... कठीण बाका प्रसंग आला.. तर लगेच आपण ईश्वरास स्मरतो. व त्याचा धावा करतो. व आपली श्रद्धा असतेच की देव नक्कीच मदतीस येईल . व त्या कठीण प्रसंगातून आपण तरून जातो . तेव्हा जो अनुभव आपणास भावनात्मक आनंद मिळतो. ती दु:ख दूर करणा-या देवाची आपणास झालेली सुखद अनुभुती होय.
       माझ्या मैत्रिणीला शिर्डी च्या साईबाबा वर खूप श्रध्दा. दर गुरुवारी ती साई मंदिरात जाणारच, घरी 
पण संध्याकाळी सांजवात करून गुरूवारी आरती प्रसाद ठेवणार. काही मनाजोगे होता शिर्डी ला पण जाणारच. ..असतो ना? काही लोकांचा पूर्ण विश्वास जणु की त्यांच्याच मुळे काम होत आहेत अशी मनी धारणा असते.
   असेच आम्ही तिच्या बरोबर  शिर्डी स गेलो.  खर तर शिर्डी हा प्रोग्राम मधे नव्हता ,पण इतक्या जवळ आलो आहोत तर दर्शन घेऊन जाऊ, हा तिचा हट्ट .  .सर्वांना माहीत च आहे .साई भक्त किती सारे आहेत. दर्शन घेणे फार वेळ घेणारे काम . आणि आमच्या जवळ वेळ कमी . भक्तांची गर्दी ,नेहमी प्रमाणे रांग च राग.जोडून सुट्टी आल्याने पण गर्दी फार होती. दर्शन कसे होणार या विवंचनेत आम्ही होतो.काय करायचे. असे विचार करत उभे असता एक स्वच्छ कपड्यात माणूस जवळ  आला. मैत्रीणीच्या नव-यास म्हणाला
 या दर्शन करायचय ना ?,
आम्ही हो म्हटले. 
त्याच्या मागे मागे गेलो. थोड्या वेळात मूर्ती समोर आलो. मूर्तीचे दर्शन घेतले. पण तो माणूस कुठे केव्हा गायब झाला कळलेच नाही .
 दर्शन घेऊन पुन्हा परतण्यास गाडीशी आलो  . मनात दर्शन घडल्याचा आनंद होता.
गाडी सुरू केली. गाडी ने वेग घेतला तर तोच माणूस दिसला. हसत मुखाने त्याने हात हलविला.
पुन्हा पहावे तर तिथे कोणी नाही. 
 माझी मैत्रीण म्हणाली पहा माझी तीव्र इच्छा होती व श्रध्दा पण आहेच  साई बाबांनी
आपल्यास दर्शन घडविले.
   तर ही असते अनुभुती ...दृढ श्रद्धा असेल तर कधी कधी अशी अनुभूती येते. व आपणास आपल्या मनातील भावना अजून दृढ करते.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 



कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...