शनिवार, ५ मार्च, २०२२

षडाक्षरी विषय -- भक्तीत रंगलो

उपक्रम
षडाक्षरी
विषय -- भक्तीत  रंगलो

भोळा भक्ती भाव
मनात दाटला
नामाचा गोडवा
आवडू लागला          1

घेता तव नाम 
दुःख  निवारण
होते पहा सदा
आनंदी जीवन          2

उठता बसता
स्मरते तुजला
ध्यास तो नामाचा
लागला मजला             3

वाटे सदा ध्यावे 
रमावे भक्तीत
जगण्या आगळ्या
अशा त्या स्फूर्तीत          4

लागली जिवाला
भक्तीचीच आस
भक्ती भजनाचा
लागलासी ध्यास              5

तुला विध्नेश्वरा
आले मी शरण
स्विकारा नमन
दाखवा चरण                  6

करा कृपा आता
आम्हासी रक्षावे
सकळ जगाचे
दुःख हे हरावे                 7


वैशाली वर्तक  
अहमदाबाद 
गुजरात

गुरुवार, ३ मार्च, २०२२

फूलले हे क्षण माझे

फूलले हे क्षण माझे


  माझ्या मनीच्या इच्छा 
केल्या पूर्ण  सहजीवनी
 साथ  तुझी  मिळता
 भाग्यवान वाटे मनी

भाव मम अंतरीचे
तू जीवनी जाणिले
सहज देत हात हाती
सप्त रंगी  रंगविले


सहवास तुझा माझा
प्रीत गंध पसरला
एकमेका देत साथ
संसार ही फुलवला


आहे मज समाधान
दिधले तू सर्व  काही
भर भरुनी जीवनी
मागणे उरत नाही


फूलले हे क्षण माझे
तव कृपा प्रसादाने
मन माझे आनंदले
जगले जीवन मोदाने

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

माघ शुध्द चतुर्थी *श्री गणेश जयंती*निमित्त

 

अष्टपैलू  संस्कृती  कला अकादमी , मुंबई (रजि)

आयोजित 

अष्टपैलू काव्यमंच साहित्य  समूह

उपक्रम क्रमांक 63

साप्ताहिक उपक्रम

माघ शुध्द  चतुर्थी *श्री गणेश जयंती*निमित्त 

विषय - गौरीनंदन

*गणेश वंदना* 


तव नामाचा महिमा

शब्द नसे गुण गाया

तुची असे सुखकर्ता

गजानना  गणराया         1


शुभंकर गौरी नंदना

बाप्पा वाटे आपला

तूचीअसे दुःख हर्ता  

किती नांवे रे तुजला        2


असे माघी जन्मोत्सव

माघी गणेश जयंती

  केला  दृष्टांचा संहार 

तीलकुंद चतुर्थी वदती     3


असे प्रथम पुजेचा 

तुजलाची  सदा मान

देतो आनंदी जीवन

करी  तुझाची  सन्मान          4


वेद सिद्ध , एकदंत

रणांगणी  धुरंधर

करी दुष्टांचा संहार

ठेव कृपा निरंतर                 5


चौदा विद्या अवगत

तव महिमा अपार

अधिपती स्वामी तूच

कुणी म्हणती मंदार               6


सौ वैशाली अविनाश वर्तक 

अहमदाबाद 

गुजरात 

  

मंगळवार, १ मार्च, २०२२

धरु विज्ञानाची कास

सिध्द  साहित्यिक  समूह
आयोजित  उपक्रम क्र 387
काव्य प्रकार अष्टाक्षरी
विषय - धरू विज्ञानाची कास


जग झालेय प्रगत
धरू विज्ञानाची कास 
अंधःश्रध्दा दूर सारू
प्रगतीची हवी आस 

विज्ञानाने जग सारे
किती गतीशील झाले
दूर दूरचे अंतर 
क्षणी समीप ते आले

घर बसल्या भेटतो 
मैलो लांबच्या पाल्यांना
विज्ञानाने केले शक्य
सुखी आनंदी क्षणांना

 सुखावला बळीराजा 
झाली कष्टात बचत
सोपे झाले शेतीकाम
करी विज्ञान मदत

सुख मिळते जीवनी
नव नवीन शोधाने
धरू विज्ञानाची कास   
विज्ञानाच्या  सहाय्याने

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

माझ्या च गीत पंक्ती

अभामसापसमूह2
उपक्रम 381
काव्य लेखन
विषय - माझ्याच गीत पंक्ती
       जणू आपत्य
माझ्याच गीत पंक्ती
सहज पडल्या कानी
होता गायन समारंभ
ऐकून हर्षिले मनोमनी
 
वाटले आपलेच बालक
धावत आले कुशीत 
शब्द ऐकताच माझे
आनंदले मी स्व खुशीत

 प्रेम असते स्वलिखाणावर
अपत्यासम आपुले वाटे
रस-स्वाद घेता वाचकांनी
आभिमान उरी दाटे

गुण गुणते मी  झाले
भावना दाटल्या मनी
लेखणीस विनयतेने
मनात स्मरले त्याक्षणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...