शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

सहाक्षरी...दुपारच्या पारी... प्रीत मैत्रीतली

अभा म सा प  ठाणे जिल्हा
उपक्रमासाठी
क्र 87
विषय -  दुपारच्या पारी

*विरंगुळा*

दुपारच्या पारी
वेळ विश्रांतीची
सवय जडली
ती वामकुक्षीची  1


दारात उभ्याने
गप्पाच रंगती
कधी गंमतीच्या
 मैत्रिणी  संगती  2

मग सय येई
दुपाराच्या पारी
गप्पा फार झाल्या
झोप आली भारी     3

तरी न संपती
फड तो गप्पांचा
खेद वाटे मना 
 झोप चुकल्याचा      4

कधी ऐकायला 
मौज वाटे गाणी
दुपारच्या पारी
जुनी ती पुराणी       5

कधी गमे मज
घेऊन लेखणी
कविता रचावी
असेल देखणी           6

म्हणूनच आज
दुपारच्या पारी
रचिली पहा मी
सहाक्षरी भारी           7

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित उपक्रम
२९\७\२३
विषय प्रीत मैत्रीतली 


प्रीत मैत्रीतली 
दोनही जीवात
वाहे प्रेम झरा
सदैव मनात 

नसे दुजाभाव
 मदतीस साथ
 प्रेमळची भावे
घेत हाती हात

प्रीत मैत्रीतली
दावीती महती
कृष्ण सुदाम्याची
सारेची जाणती

नातेच  मैत्रीचे 
असतेच गोड
कदा दोन मनी
 दिसेनाची खोड

सर्वां  मिळो सखा
द्रौपदीचा  हरी
प्रीत मैत्रीतली
मोद जग भरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

लपंडाव

कल्याण  डोंबिवली महानगर 2
उपक्रमा क्र  181
दि 17/12/21
विषय -लपंडाव

खूप खेळलो लपंडाव
बालपणाच्या काळात
 पण तेव्हा नव्हती समज
हा तर खेळायचाय जीवनात

कधी सुख तर  कधी दुःख 
चालत असते जीवनात
दुःखाने कधीच न खचता
मजा लुटायची सुखात 

निसर्गात पण पहा चाले
कधी निष्पर्ण पानगळ
येता वसंत सुरु बहरणे
मनीची पळवतो मरगळ

रवीराजचा तर चाले
 खेळ लपंडाव श्रावणात
क्षणात पसरे  उन चहुकडे
तर मधेच सुरु बरसात
 
वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

रंग निसर्गाचे

 पहा रवीराज नभी

सोनेरी किरणांनी लाजत

दिसे गगन केशरी  रंगात

मुरडत येते ऊषा हासत


 फुले उमलली गंधित

पानोपानी हळुच डुलत

विविध रंगाची उधळण

सुंदर  निसर्ग खुलवत


जलाशय घेई रंग नभीचा

सुंदर  नभ सुनील रंग

रुप तयाचे पहाण्यात

मन सदैव राही दंग



येता वर्षा अवनी बहरे

 सखा तिज नटवे सजवे

रुप तिचे पार बदले

नववधू सम दिसे बरवे


  दाखवी  रंग नवे नवे

निसर्ग च चित्रकार खरा

ऋतु चक्रा प्रमाणे  दावी

निसर्गाच्या विविध त-हा


बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

खैरात पुरस्कारांची

मज जडली सवय
 सदा लेखन करण्याची
मिळता पुरस्कार एकदा
मन गुंतले सदाची

 करीता लिखाण रोजची
धार  चढली लिखाणास 
होत गेली खैरात आता
रांग लागली पुरस्कारास

देती  समूह प्रशासक 
वाढावे लिखाण म्हणून
वेळोवेळी न चुकता
पुरस्कार  आवर्जून 

होतेय आता समुहावर
खैरात पुरस्कारांची
तरी पाहून पुरस्कार 
ओढ लागे लिखाणाची

नसावे लेखन पुरस्कारासाठी
होते वाढ आपल्या साहित्यात 
मिळते विचारांस गती
निपुणता  वाढे लेखनात

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...