शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

अष्टाक्षरी. गणपतीकाव्य 3/ तुझेरुपपचित्तीराहो/विराजले गणपती/अष्टाक्षरी /अभंग


काव्य - अष्टाक्षरी ओळ काव्य
ओळ -  तुझे रुप चित्ती राहो

गणराया गजानना
मुखी  राहो तव नाम
महिम्यात नावाच्याच
दिसे सर्व तीर्थ धाम

शुभंकर तू सर्वांचा
बाप्पा वाटे तू आपुला
येता कठीण समय
स्मरताती जन तुला

तुझ्या नामात  आनंद
गुण गातो आवडीने
*तुझे रुप चित्ती राहो*
सदा पाहतो भक्तीने


कार्यारंभी तुला बाप्पा
पूजताती भक्तीभावे
तुझे नाम ओठी येता
यश मिळे सर्वा ठावे

होता आगमन  तुझे
घर भासते मंदीर   
पूजा पाठ भक्ती भावे
दर्शनास मन अधीर  

वैशाली वर्तक 

विषय -- विराजले अधिपती
ओळ काव्य
      *आनंद सोहळा*

वेध लागे गणेशाचे
येता भाद्रपद  मास 
कशी करुया आरास
मनी विचार ते खास           1

 स्वागताला खास दारी
रेखाटली  ही रांगोळी
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी          2

ढोल ताशे वाजवित
केले स्वागत   आनंदे
*विराजले आधिपती*
मन भरले स्वानंदे                  3

रुप तुझे पाहुनिया
मन माझे झाले शांत
तूची आहे सुखकर्ता
कसलीच नसे भ्रांत           4          


विराजले अधीपती      
पाहताच चित्ती ठसे 
 ऐटदार ते बसणे      
 मना मनातूनी वसे              5

अधिपती आले घरी
भक्त येती दर्शनाला
वाटे अपूर्व  सोहळा
येतो  हुरुप मनाला          6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



*स्पर्धेसाठी*
सावली प्रकाशन  समूह  आयोजित 
राज्यस्तरिय  अभंग लेखन स्पर्धा
विषय -- *तूच सुखकर्ता*
        
            
तूची  असे कर्ता  । तूची करविता  । 
तूची सुखकर्ता  ।  श्रीगणेशा  ।।              1

कार्यारंभी तुज   !   प्रथम पुजितो l
 तुलाच स्मरतो ll   विध्नेश्वरा l                2

सर्व  व्यापी  तूची l  तूची लंबोदर l
ज्ञानाचा  सागर  l  तू  ओंकारा   ll            3


राहो आम्हावरी l    तव कृपा दृष्टी l
नको करु कष्टी l     सुखकर्ता  ।।             4

*तूची सुखकर्ता*  । तारी अवदसा  
दावी कवडसा  ।  तूचीआता                       5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद ( गुजरात)
      



     



शब्दवेड साहित्य  समूह
काव्य - यंदाचा गणेश उत्सव
  
     *काळजी आरोग्याची* 

सण आला गणेशाचा
उत्साहाला येणार उधाण
भाग्य आपले यंदा चांगले
महामारीची उतरती कमान

काळजी घ्यावी प्रत्येकाने 
मास्क लावणे आवश्यक
अंतर पाळा सुरक्षितेने
नका करु गर्दी  अनावश्यक

आपले आरोग्यआपल्या हाती
सरकारचे नियम  पालन
लसी करणात नको दिरंगाई
रोगाचे  बंद करु दालन

कायम स्वरुपी हवी मूर्ती 
विसर्जनाची युक्ती नामी
घरीच करु विसर्जन 
गर्दीत  टाळण्या येते कामी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




शब्दशिल्प कलाविष्कार  संघ आयोजित 
गणेशोत्सवानिमित्त दहा दिवसीय  राज्यस्तरिय 
काव्य लेखन स्पर्धा क्रमांक  16
विषय - देवा तुझ्याच चरणी

अष्टाक्षरी रचना
        

 श्रीगणेशा मिळे  मज
सुखानंद अविरत
*देवा तुझ्याच चरणी*
अनुभवे मी खचित

दूर होती सा-या चिंता
जाते शंकेचे मळभ
मिळे मना सुख शांती
कामे होतात सुलभ

 येता प्रसंग कठीण
तूच असता तारक
धाव घेती तुझे पायी
तूची विश्वाचा पालक

घेता तव नाम ओठी
दुःखे  होती दूर  सारी 
देवा तुझ्याच चरणी
भासे मज जादू न्यारी

देवा तूची विध्नहर्ता
आले मी तव चरणी  
 मज दे तव आशीष
हीच करिते मागणी   

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

*स्पर्धेसाठी*
सावली प्रकाशन समूह आयोजित  गणेश जयंती निमित्त 
अष्टाक्षरी काव्य स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय - माझा गणपती बाप्पा
         
      *अधिपती गणपती*

*माझा गणपती बाप्पा*
रूपे सुंदर  गोजीरा
भासे सदा स्नेहदायी
श्रीगणेश तो साजिरा        1

चौदा विद्या  अवगत
तव महिमा अपार
अधिपती तूची बाप्पा
कुणी म्हणती मंदार            2

*माझा गणपती बाप्पा*
बाप्पा, वाटे तू आपुला
येता कठीण समय
स्मरताती जन तुला              3

रूप तुझे पाहुनिया
मन माझे होई शांत
तूची आहे सुखकर्ता
नुरतेच  सारी भ्रांत                  4

दिन असे चतुर्थीचा
आले भक्त दर्शनाला
जन्मदिन आज असे 
मोद होतसे मनाला                 5
  

करू साजरा सोहळा
गणेशाचा पहा थाट
तीलकुंद चतुर्थीला
आनंदाची आली लाट   6


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


अष्टपैलू  संस्कृती  कला अकादमी , मुंबई (रजि)
आयोजित 
अष्टपैलू काव्यमंच साहित्य  समूह
उपक्रम क्रमांक 63
साप्ताहिक उपक्रम
माघ शुध्द  चतुर्थी *श्री गणेश जयंती*निमित्त 
विषय - गौरीनंदन
*गणेश वंदना* 
श्री गणेश जयंती
तव नामाचा महिमा
शब्द नसे गुण गाया
तुची असे सुखकर्ता
गजानना  गणराया         1

शुभंकर गौरी नंदना
बाप्पा वाटे आपला
तूचीअसे दुःख हर्ता  
किती नांवे रे तुजला        2

असे माघी जन्मोत्सव
माघी गणेश जयंती
  केला  दृष्टांचा संहार 
तीलकुंद चतुर्थी वदती     3

असे प्रथम पुजेचा 
तुजलाची  सदा मान
देतो आनंदी जीवन
करी  तुझाची  सन्मान          4

वेद सिद्ध , एकदंत
रणांगणी  धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर                 5

चौदा विद्या अवगत
तव महिमा अपार
अधिपती स्वामी तूच
कुणी म्हणती मंदार               6

सौ वैशाली अविनाश वर्तक 
अहमदाबाद 
गुजरात 
  





मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

भोजनालय

सावली प्रकाशन समूह आयोजित 
 काव्य लेखन 
विषय - भोजनालय 
 *उदरभरण* 
होता सकाळ प्रश्न जेवणाचा
 असतो गृहीणीच्या मनोमनी
 काय करावे भोजनास याचा
 विचार करीते त्या क्षणी 

 आता काळ बदलला असता
 भोजनालय  असतीठाव 
जाता नोकरी शिक्षणाने दुजे गावी 
भोजनालयाकडे घेती धाव 

 चव बदल म्हणूनी जाती 
सर्व सामान्य सुध्दा जन 
आस्वाद घेण्या भोजनालयी 
भक्षण करुनी होई संतुष्ट मन 

 गतीशील जीवन मानवाचे
 भोजन बनवण्या वेळनुरे 
 कधी लवकर जावे लागता
उदरभरण तर हवेच हे खरे


 म्हणूनच संबोधती तयांना 
अन्नपूर्णा , उदर भरण नावे
 खरोखर असती नावा प्रमाणे
 भोजनालये सर्वत्र गावे 


 वैशाली वर्तक अहमदाबाद




रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

चित्र काव्य

चित्र काव्य भेळ खातानाचे






सप्तरंग कला , क्रीडा,विज्ञान, साहित्य  व संगीत अकादमी

आयोजित 

राज्य स्तरीय चित्र काव्य स्पर्धा २०२१


होते  खात मजेत चविष्ट भेळ  
गेले लक्ष पेपरातील चित्राकडे
काय योगायोग  आला जुळूनी
चित्रातील मुले पाहती भेळेकडे.


लहान  पोरे, करीती याचना
जणू चवदार भेळेकडे पाहूनी
 दीनवाण्या मुलांचे चित्र  पाहता क्षणी
घास भेळेचा माझा राहिला , अडूनी.


होती ती चमचमीत चविष्ट भेळ
पण चित्राने मन  माझे गहिवरले
भेळ तशीच पेपरात ठेवूनी
मन विचारात  गुरफटले


लहान मुले गोजीरवाणी
हट्ट करिती भुकेने भेळेसाठी
अन्,.. मी मात्र , आस्वाद घेते
भरल्यापोटी   स्वानंदासाठी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...