सोमवार, २ जून, २०२५

रुबाई लेखन प्रकार

स्वप्न गंध साहित्य समूह 
लेखन प्रकार रूबाई
पहीला पाऊस 


सुटलाय सोसाट्याचा वारा
प्राणी पक्षी शोधतील निवारा
नभात सुरु मेघांचा गडगडाट 
पहाता पहाता सुरू झाल्या जलधारा 

 तृप्त होईल संतप्त धरणी
 जल धारांनी आनंदले मनी
पहिल्या पावसाची मजा आगळी 
 लहान मोठे  सारे संतोषले मनोमनी 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...