*स्पर्धेसाठी*
उनाड वारा साहित्य परिवार आयोजित
राज्यस्तरिय काव्य स्पर्धा
(विशेष कारण - उनाड वारा साहित्य परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त)
विषय - साहित्यातून समाजसेवा.
समाजिक परिवर्तन
साहित्य पण असे माध्यम
करण्या समाजाची सेवा
लेखणी ने तर आजवर
दाविलाय तिचा अमुल्य ठेवा
करण्या जन जागृती वा संघटना
लेखणीच दावी नामी युक्ती
गद्य पद्य व्यंग-चित्रातून
लेखणी दावीते तिची शक्ती
होते सहज साहित्य प्रकाशन
आहे साहित्याच्या दोन धारा
करण्या ज्ञान ,भक्ती ,आरोग्याचे प्रबोधन
गद्य - पद्य चा अमाप पसारा
प्राकृत भाषेतील मायबोली
सुधा-रसापरि अभंग वाणी
ओतप्रत भक्ति -रसांची
विराजली ओठावरची गाणी
विविध वाङमय येते सामोरे
योजित करिता साहित्य संमेलने
मासिक , पाक्षिक , दैनंदिने
करिती सर्वची ज्ञाना-र्जने.
साहित्यातूनी अंधश्रध्दा निर्मुलन
घडविण्या सामाजिक परिवर्तन
देऊन समाजास ज्ञानाचा मेवा
शिकवणीतूनी होई अमुल्य दर्शन
नवरसांचे संपन्न साहित्य
भाषेला तर करतेच, सदा समृध्द
दुहेरी काम घडते साहित्यातून
सहज राही समाज सेवेला सिद्ध
वैशाली वर्तक
अहमदाबाद