गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

वृत्त बध्द कविता आनंद कंद. आई

 वृत्त आनंद कंद

लगावली गागालगा  लगागा

आई


आईच शब्द कानी, ऐकून मोद दाटे

पाहून तव मुखाला, भेटीस  वाट पाही


मिळवून सर्व काही, हर्षीत मी मनाने

स्वर्गीय तोष लाभे ,आईस भेटण्याने

चिंतेत  जीव तीचा , हाची‌  विचारी राही.      

 पाहून तव मुखाला भेटीस वाट पाही


नजरेत तीच येता , मन हर्षते खुशीने 

सुखस्वर्गची पहाते ,माझेच मी मजेने 

शब्दात सांगण्याते, अपुरेच शब्द राही

पाहून तव मुखाला , भेटीस वाट पाही

सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

अबोल मी अबोल तू

 अभा म ठाणे जिल्हा समूह१

आयोजित 

विषय - अबोल मी अबोल तू


अबोल तू अबोल मी

भावना मी मनीच्या जाणेल

प्रीतीला नसतेच गरज

शब्दा विना सारे उमजेल


पक्षांना असते कुठली भाषा 

तरी कळतात  भावना

मन जुळता अबोल पणे

पूर्ण  होतात  मनीच्या कामना


 बासरीचे सूर ऐकता 

 राधा होई बावरी

अबोल पणात खूप  सारे

सहज उमजे कधीतरी


  नयन असती बोलके

 नजर ईशारे  असती ठाव

 भाव मनीचे डोळ्यात 

  अचूक पणे सांगती भाव 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

वृत्त बद्ध मनोरमा वृत. चाहुल गणेशाची. निरोप गणपती ला

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

आयोजित सराव लेखन 

वृत्त मनोरमा

लगावली.  गालगागा गालगागा 

चाहूल गणपती ची

###############


गणपती येणार वदता

खास यंदा गणपतीची 

कोणती आरास घ्यावी

 वेळ होते ठरविण्याचे


मोद वाटे सर्व लोकां

वाट पाही  आतुरीने.   

सामग्री ही आणलेली.   ,

नीट पाही जाणिवेने


होत आली वेळ आता

धीर माझा   राहवेना

वाट पाही लोचनेती

वेळ आता काढवेना


टाळ झांजा खास आहे

आरतीला वाजवूया

भक्ति भावे गात भजने

रात्र सारी जागवूया 


तूच येतो सर्व काळी 

संकटाशी झुंज द्याया

बोलताती दु:खहर्ता 

तूच माझा देव राया


भक्त येती दर्शनाला

सोहळा तो मोद कारी               

हर्ष भासे तूच येता

 भास तव हा हर्षधारी.                       


मोरयाचा नाद येतो

ऐकण्यासी तोच कानी

श्रीगणेशा पूजताना

गात राहू गोड गाणी

वैशाली वर्तक



मोहरली लेखणी साहित्य समूह 

विषय.      निरोप 

वृत्त मनोरमा

लगावली.  . गालगागा गालगागा 

 

रोज रात्री आरतीला

मोद वाटे सोहळ्याचा

टाळ झांजा घेत हाती 

घोष चाले गणपतीचा


आजच्या त्या आरतीला

आल पाणी  लोचनांना 

कंठ भारी दाटलेला

नाम त्याचे गर्जताना


ठेवताना ती शिदोरी

मोरयाचा नाद चाले              

आपुल्या सदनी निघाले

आज  ओठी. शब्द आले. 


मखर वाटे ते फिके हो

सदनही वाटे भकास

धूप दीपक मंद झाले

जन मनाने ती उदास 


नाव घेता गणपतीचे

दु:ख. क्षणी  दाटलेले

जड मनाने परतले जन

नयन ते पाणावलेले


  वैशाली वर्तक 

अहमदाबाद

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...