शनिवार, ११ जून, २०१६

थंड पाण्याचा ग्लास

                                   
                                                                  ** थंड पाण्याचा ग्लास**    

              मार्च महिन्याची ३१ तारीख होती .  उन्हाने  जीव घाबराघुबरा  होत होता . मी बँकेत आले. खुर्ची सरसावून शांत खूर्चीत बसले . एसी च्या  गारव्याने मन संतोषले . जरा हु ssश झाले. आज  नोकरीचा शेवटचा दिवस होता. म्हणजे रिटायरमेंटचा दिवस होता .
      " हं ,पाणी घ्या ताई "म्हणत हिराबाई पाण्याचा ग्लास धरून उभ्या होत्या . क्षणभर मी त्या ग्लासकडे पहातअसता, मला बँकेत रुजू झाल्याचा  पहिला दिवस आठविला . जेव्हा मी  तोंडी ,लेखी सर्व परीक्षा  पार  करून नियुक्तीचे पत्र घेण्यासाठी   बसले होते.
      माझ्या नावाचे  उच्चारण करत चपराशी आला . व म्हणाला," तुम्हाला कॅबीन मध्ये बोलविले आहे".
मी उठून आत गेले.
    आत गेल्यावर  म्यानेजर जर साहेबांनी बसावयास सांगितले
मँनेजर साहेब म्हणाले ," अभिनंदन. हे घ्या तुमचे नियुक्ती पत्र"
  त्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिले . चपराशाने पाण्याचा ग्लास पुढे केला . त्या पहिल्या ग्लास  पासून ते  हा आजचा ग्लास मी SBI चे नियमित पाणी पीत होते. काय योगायोग पहा ! पहिला व आजचा शेवटच्या दिवशीचा थंड पाण्याचा ग्लास .. या दोन्ही  ग्लासांनी मला  बालपणाच्या आठवणीत ओढून नेले.

          क्षणात  शालेय जीवन डोळ्यासमोर उभे झाले . शाळेत असतांना त्यावेळी आमच्या शाळेत, रीसेस मध्ये पाणी पिण्यास रांगेत उभे राहून, क्रमाने पाणी प्यायला मिळायचे. . पाणी वाल्या ताराबाई प्रत्येकास पाणी प्यायला द्यावयाच्या.  हो......त्यावेळी हल्ली सारखे वॉटर बॉटल घेवून जाणे फार प्रचलित नव्हते .
      सकाळी  ते संध्याकाळी ५ ची शाळा असावयाची . दोन लहान सुट्ट्या व एक मोठी डबा खाण्याची सुट्टी . माझे घर तर शाळेच्या अगदी जवळ होते. इतके जवळ कीं  धावत जाऊन दोन मिनिटात पाणी पिऊन परत वर्गात येवू शकायची . मोठ्या डबा-खाण्याच्या सुट्टीत  तर, मी  घरी जायची,  आजीने पाट मांडलेला  असावयाचा खाऊ खाऊन परत  शाळेत यावयाची .
     खाऊ खाल्ला की आजी म्हणायची," हं , हे घे पाणी पी. आणि आजीने माठाला स्वच्छ ओले  कापड गुंडाळून, त्यावर सतत पाण्याची धार सोडून , ती कापड ओले ठेवावयाची, की जेणे योगे... पाणी माठात थंड राहील . कधी कधी पाण्यात ती वाळा पण टाकावयाची .त्यामुळे मंद सुगंधी पाणी पिण्यास मिळायचे.  माझ्या मैत्रीणी पण रीसेस मध्ये माझ्या  घरी पाणी पिण्यास यावयाच्या .
         असे सर्व असता आमच्या वर्गात एक जोशी नावाची मैत्रीण होती .तिचे वडील शाळेच्या जवळ पास असलेल्या बँकेत सर्वीस ला होते. ती पण त्या दिवशी माझ्या घरी पाणी पिण्यास आली होती . आम्ही मैत्रिणी माझ्या घरून पाणी पिऊन शाळेत परत जात होतो.
  ती सहज म्हणाली," मी आज आले तुझ्या कडे पाणी पिण्यास , पण माहित आहे का?. मी तर नेहमी माझ्या वडिलांकडे जाऊन पाणी पिऊन येते. वडिलांकडे म्हणजे कुठे माहित आहे का ? माझ्या बाबांच्या बँकेत .
 मी माझ्या बाबांकडे जाते .  मग ते चपराशास सांगून ,त्याचे करवी मला पाणी देतात.
  तो थंड पाणी आणून देतो. आणि काय सांगू ?..आत वातावरण वाळ्याच्या ताट्यानी कसे थंड असते. "
असे वर्णन करुन तिने सांगितलं .
 पुढे म्हणाली, " ए,ऐक ना, तुला यावयाचे आहे का ? माझ्या बाबांच्या बँकेत थंड पाणी पिण्यास ?
 मी तिला खुशीने हो ssओ   म्हणत ,मानेने होकार दिला .
  मग  ती ऐटीत ,आणि ठसक्यात म्हणाली ,"जाऊ  या तर, आपण माझ्या बाबांच्या बँकेत पाणी  पिण्यास ."
 मला पण मजा वाटली .
 ती पुढे थांबली, व म्हणाली," पण,...तुला एक काम करावे लागेल . "
 मी सहजतेने विचारले,"काय ग?"
 त्यावर ती म्हणाली, जेव्हा केव्हा माझा गृहपाठ बाकी राहिला असतो ना ,त्या दिवशी तू पूर्ण करून देण्यास मला मदत करायची. थोडे लवकर तर ,आपण शाळेत येतोच की .!  तेव्हा तू थोडा करावयाचा." .
मी लगेच म्हटले ," एवढेच ना ? करीन कीं त्यात काय मोठे ?"
तिचे घर   शाळे पासून बरेच लांब होते. त्यामुळे तिचा गृहपाठ बरेचदा बाकी रहावयाचा . काय करणार खेळण्यात अभ्यास राहू जायचा. शाळेत तर वेळेवर आले पाहिजे. ... पण मग आमचे ठरल्या प्रमाणे मी तिला नेहमी गृहपाठ पूर्ण करण्यात मदत करावयाची . आणि तिच्या बरोबर रीसेस मध्ये तिच्या बाबांच्या बँकेत पाणी पिण्यास जावयाची .
       काय मजा वाटायची  त्यावेळी . तिच्या बाबांच्या बँकेत जावयाचो . बँकेत दारात शिपाई उभा असावयाचा . तेव्हा कुठे माहित होते त्याला वॉचमन म्हणतात. त्याला ती तिच्या बाबांचे नांव सांगावयाची. बरेचदा ती जात असल्याने तो आता तिच्या ओळखीचा वा तो तिला ओळखू लागला होता. आम्ही तिच्या बाबांच्या टेबलापाशी जायचो . आम्हाला पाहून तिचे बाबा चपराशाला बोलवून सांगावयाचे कीं ," ये बच्चीयोंको  पाणी दे ना जरा."
. मग तो पितळी स्टान्ड मधे स्टीलच्या ग्लासात थंड पाणी घेऊन यावयाचा . तो पाणी घेऊन येई स्तोवर मी आजूबाजूलाच्या टेबलखुर्च्या , त्यावर काम करणारे लोक , हे पहात रहायची. पाहून मजा वाटायची सारे कसे खाली मान घालून काम करत असायचे .काही ठिकाणी टेबलाशी , खिडकीशी (तेव्हा त्याला काउंटर म्हणतात) हे पण माहित नव्हते. त्या काउंटरशी रांग असायची. हे सारे पहात, आतील थंड वातावरणाचे सुख अनुभवत उभी रहायची. बँकेची ही मजा अनुभवायला मजा वाटायची.
  असे आमचे त्या वर्षात अधून मधून चालले होते. पुढे  त्या मैत्रिणीच्या वडिलांची बदली झाली असावी आणि मी पण पुढे तिला बालपणात विसरले . मी पण तेव्हा फार तर 4/5 यत्तेत असेन त्यावेळी.
         पुढे मी माझे प्राथमिक शिक्षण , हायस्कूल चे तसेच महाविद्यालयाचे शिक्षणपूर्ण केले. पदवीधर   बी कॉम झाले. नोकरीसाठी अर्ज करत  होते . अर्ज करीत असता योगायोगाने  त्याच बँकेत पुढे नोकरीस लागले . जेव्हा मैत्रीणी   बरोबर थंड पाणी पिण्याच्या आशेने व बँकेच्या कुतुहलाने
 पाणी पिण्यास येत होते. आणि .....त्यासाठी तिचा होमवर्क करुन देत होते.. तेव्हा, कधी तरी वाटले होते का ? कीं  पुढे त्याच SBI  चे  मी ३१/३२ वर्षे पाणी पिणार होते म्हणून .
         मी मनात पाण्याच्या ग्लासाकडे पहात योगायोग वर हसले . आणि हिराबाईंने दिलेला थंड पाण्याचा ग्लास हाती घेतला व संतृप्त मनाने पाणी प्यायले.

  वैशाली वर्तक 















सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...