शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

पुस्तक विषयक अष्टाक्षरी... १पुस्तकमाझासखा||२वाचाल तर वाचाल|३|मैत्री करु पूस्तकांशी|४अभंग|पुस्तक / पुस्तक संगतीत

पण

 माझी  लेखणी 

आजचा उपक्रम 23/4/21

विषय - पुस्तक  माझा सखा


वेळ मजेत जायला

हवा एक सवंगडी

देई मनाला उभारी 

असे जो मन कवडी


पाहताच तया मनी

आनंदाचा पार नसे

खरा जीवलग मित्र 

 याची  ग्वाही देत असे


येता कठीण प्रसंग

 सख्यासम  उभा पाठी

 संयमाचा दावी मार्ग 

 हवा तो आधारासाठी


असा असे एकमेव 

*मित्र  माझा तो पुस्तक* 

भरलेला  जो ज्ञानाने

भेटीसाठी मी उत्सुक 


खरा तो मार्गदर्शक 

पहा ज्ञानाचा सागर

नसे उणीव ज्ञानात

घ्यावी भरुन घागर


वैशाली वर्तक 


अ भा म सा प स्वप्नगंध समूह

उपक्रम 





.                                                 

                                        


विषय - वाचाल तर वाचाल
     शीर्षक  *उचित कथन*
23/4/21
वाचाल तर वाचाल
किती उचित कथन
अन्न  पाणी जगण्यास 
तसे हवे ते वाचन

युग असे विज्ञानाचे 
शोध लागताती नवे
ज्ञान मिळविण्यासाठी
वाचनच सदा हवे

वाचनाची गोडी जया
करी तो नित्य वाचन
होई ज्ञानाने पंडित 
देण्या लोका प्रवचन

खत पाणी वृक्षा जसे
हवे सदा फुलण्यास
वाचनाने भर होई 
यश प्राप्ती करण्यास

जैसे वाढते वाचन
मना देतसे संगत
वाचनाची ही सवय
आणी जीवनी रंगत

किती वाचाल तेवढे 
कमी वाटते जीवनी
वेड लावीते जिवाला
मिळे हर्ष सदा  मनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद






सिध्द  साहित्यिकका समूह
जागतिक पुस्तक दिनानिमित्त
ओळ काव्य लेखन
ओळ -- मैत्री  करु पुस्तकांशी

जीवलग असती मित्र 
येती वेळोवेळी कामास 
तैसे पुस्तक  पण असती
धावूनी येती कठीण प्रसंगास


जरा वाटले एकटेपण
जाते लक्ष पुस्तकाकडे
हळुवारा पाने उलगडता
लक्ष वेधते स्वतःकडे

न रागावता बोलता
देई ज्ञान देई संगत
*मैत्री करु पुस्तकाशी*
जीवनात येते रंगत

अंतरात ज्ञानाची साठवण
देई विविध विषयांचे ज्ञान
मैत्री  करु पुस्तकांशी
मनी ठेवू ज्ञानाची जाण

पुस्तके असती मार्गदर्शक 
दावीती अचूक  वाट जीवनी
कधी काळी संभ्रमात पडता 
मित्रासम देती संजीवनी

करा मैत्री पुस्तकांशी
तेची असती आधारा विश्वाचे
वृध्दी करिती ज्ञानात
जीवन घडविण्या यशाचे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





विषय - पुस्तक

करा वाचन
सदा पठण
ते अज्ञानाचे
करे हरण          1


ज्ञानाची खाण
अगाध छान
पुस्तकातील 
घ्यावे हो ज्ञान       2

वाचावे ग्रंथ
सांगती संत
मिळवा ज्ञान
मिळे सुपंथ         3

मनीची आस
हवा हो ध्यास
वाचनालय
त्यासाठी खास      4

नसे लहान
असे महान
पुस्तकं देते
जगी सन्मान      5

असे सोबती
करी गंमती
वाचनासाठी
नको संमती        6

मनोरंजन
बुध्दी व्यंजन
ज्ञान वर्धन
मानती जन           7

येताची घरी
पुस्तक  करी
आनंद वाटे
तो क्षणभरी    8

वैशाली वर्तक


काव्यस्पंदन राज्य स्तरिय 02

दैनंदिन उपक्रम 

विषय -- *पुस्तकांच्या संगतीत**

अष्टाक्षरी

पुस्तकाच्या संगतीत

    *जीवनाची रंगत*


पुस्तकाच्या  संगतीत

भान नुरते वेळेचे

कधी न उमजे मना

गुंग होणे नेहमीचे.


जरा नजरेस येता

घेतो सहज  हातात

थोsडे पाहू येते मनी

मन रमते क्षणात


पुस्तकाच्या संगतीत

होई रंजन मनाचे

गुरु समान पुस्तक 

खुले द्वार ते ज्ञानाचे


भासे पुस्तक  अखंड 

ज्ञाने वहाणारा झरा

किती भरल्या घागरी

अखंडित वाहे खरा


किती प्रकारचे ज्ञान

जणु ज्ञानाची खाण

सदा पानापानातून

मिळे ज्ञान, ठेवा जाण



पुस्तकाच्या संगतीत

दिनरात्र होते एक

घेता तया हाती वाटे

काढू वाचूनी अनेक.


 नाते  असे पुस्तकाचे

 वाटे हवीच संगत

विना पुस्तक म्हणजे

नसे जीवनी रंगत


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


अभंग



भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सातारा

आयोजित उपक्रम

विषय .. पुस्तकाचे पान


जपावे पानांना  | नुसते न पान |

परिपूर्ण ज्ञान.   | भरलेले ||.        १


शब्द शब्द असे  |ज्ञानाचे ते कण |

उजळे जीवन.   | आपणांचे ||.     २


पाकळी फुलांची | पसरले गंध|

पान लावी छंद | वाचनाचा ||.        ३


 लावे जिवा वेड |एक एक पान |

 हरवते भान.   | वाचकांचे.     ||.     ४


पानोपानी पहा | ज्ञानाच्या घागरी|

पुस्तक सागरी. | भरलेल्या||.           ५


पुस्तकाचे पान  | देई जगी मान |

असे ज्ञान खाण | सर्वजना ||.         ६


पुस्तक पानांची  | आहेच महती |

 सर्वच जाणती   |     सांगे वैशू  ||. ७


वैशाली वर्तक

अहमदाबाद

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

नव चैतन्याची पालवी फुलू दे

सावली प्रकाशन समुह 
स्पर्धेसाठी
ओळ काव्य
विषय - नव चैतन्याची पालवी फुलू दे
शीर्षक -  *कृपेच्या ओंजळी*    20/4/21

आला पहा ऋतुंचा राजा वसंत
संपली शिशिरची ती पानगळ
दिसे लाल कोवळी तांबूस पर्णे
दूर सारा मनातील मरगळ                  1

येता वसंत, सृष्टी ची शोभा न्यारी
रानोमाळी पक्ष्यांची ऐकावी गाणी
दिसे सर्वत्र  नव चैतन्य  भारी
कोकीळ कुजन ऐकावे  ते  रानी


वाहू द्या वारे मनी  आशेचे
निसर्ग देई संदेश उत्साहाचा
सृष्टी  देतसे सदैव संजीवन
भाव सकारात्मक तो चैतन्याचा

पहा कशी पळेल ती महामारी
नव चैतन्याची फुलू  दे पालवी
 लतावृक्ष  सम मने करु पल्लवित 
सहजच नैराश्यास दूर घालवी


नव चैतन्याची फुलू दे पालवी
फारच निराशाची आली काजळी
देवा तुलाच सारे आले शरण
तव कृपेच्या भरुन दे ओंजळी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 












बुधवार, २१ एप्रिल, २०२१

गीत प्रार्थना (गीत) देवा का रे रुसलासी

शब्दरजनी साहित्य  समूह आयोजित उपक्रम 
शब्दवेड साहित्य  समूह 
आजचा विषय - प्रार्थना 
शीर्षक    *याचना*

 देवा का रे रुसलासी कशी आणलीस  वेळ
कुणा कडे पाहू आम्ही कसा मांडियला खेळ


देवा तुला विनवणी, कर कृपा जगावरी
किती भयावह  वेळ,  कर कृपा क्षणभरी
काय चुकले जनांचे ,भेटीचा नाही मेळ
कुणा कडे पाहूआम्ही,कसा मांडियला खेळ


सारे व्यवहार  ठप्प, घरीच बसणे नित्य
भूक लागणारच हे तर सदासाठी सत्य
काय झाला असा गुन्हा ,आली अशी जगी वेळ
कुणा कडे पाहूआम्ही,कसा मांडियाला खेळ


आता तरी ऐकना रे,आमची ही आराधना
कर जग पूर्वीवत ,हीच विनम्र प्रार्थना
धीर उरला ना कोणा , करना कृपेचा मेळ
कुणा कडे पाहूआम्ही,कसा मांडियाला खेळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद






मंगळवार, २० एप्रिल, २०२१

शोधू आंनदाच्या वाटा/ धुक्यात हरवली वाट/

अ भा म सा प स्वप्नगंध समूह
उपक्रम  32
उपक्रम--- ओळ काव्य 
विषय -- शोधू आनंदाच्या वाटा
शीर्षक --  **सुखाची सकाळ**

येवो कठीण प्रसंग
धीर राखू सदाकाळ
*शोधू आनंदाच्या वाटा*
पाहू सुखाची सकाळ

निशे नंतर पहाट
करी मना प्रफुल्लित
दुःखा नंतर प्रमोद
हेच घडे सदोदित

दिन रोजचाच नवा
करा उत्कर्षे साजरा
पहा सांजवेळी मग
होई चेहरा हासरा

करु आशांचा उदय
उजळेल जग सारे
जाता नैराश्य मनीचे
वाहे चैतन्याचे वारे

क्षण हे पण जातील 
नवे लागतील शोध
*शोधू आनंदाच्या वाटा*
ऐकू  संताचे ते बोध.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




शब्दांकुर साहित्य  समूहउपक्रमासाठी
*धुक्यात हरवली वाट*
     
    *धुक्याची वाट*
आले रवीराज नभी
दूर करीत  धुक्याची
शाल तलम  नभीची
सोनसळी शलाकांनी

जरी आभा पसरल्या
धुक्यात हरवली वाट
दूरवर दिसत नसे
सकाळचा रम्य थाट

चालत होते दूरवर
वाहे मंद शीतल वात
पक्षी गण पण विसरले
झालेली रम्य पहाट

अशा मंद धुंद  समयी
दवबिंदु  पानोपानी
 गुज सांगती पर्णांना
हळुवार  मनोमनी

मधेच हलकी सर 
 हळुवार  पावसाची
हरवलेली वाट दिसे
दूर  करिता  धुक्याची

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम
विषय. दाटले धुके आसमंती

दिन  आलेत थंडीचे
 दिसेनात रविराज
झाकोळले नभ सारे
वेगळाच आज साज

पांढरट धुसर शाल
 अवनीने पांघरली
मधेच घडे दर्शन रवीचे
धुक्यात वाट हरवली

दव बिंदू पानावर
भासे जणु मोती माळ
थंड झुळुक वा-याची
शहारली सकाळ

चाले सुंदर खेळ रवीचा
पहा निसर्गाची महती
अलवार उमलती कळ्या
गंध  दरवळे आसमंती


वैशाली वर्तक
अहमदाबाद

जरा विसावू या वळणावर

अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित
विषय - जरा विसावू या वळणावर

श्रमलो दमलो पळूनी  सदाकाळ 
*जरा विसावू या वळणावर*
नव्हता निवांत क्षण तेव्हा
आता उपभोगू आनंद क्षणभर

कर्तव्याच्या पठडीत चालता
सदैव राहिलो  त्यात रममाण
गृहस्थाश्रम सांभाळण्यात 
स्वतःला झोकून झालो बेभान

आयुष्याच्या सायंकाळी  
आता जगुया स्वतःसाठी 
पूरे करुया राहिलेले छंद
सुंदर  आयुष्य  असता गाठी

जीवन धावपळीत राहिलेल्या
स्वप्ने इच्छांची करुया  फुलवात
साथीदारा सह तेजाळूया
सुंदर  मस्त वळणावर सांजवात

 निहाळुया  सुंदरता या निसर्गाची 
 देणे  लागतो आपण समाजाचे
समाज कार्यास  हातभर लावूनी
कर्तव्य  करुया सुजाण नागरिकाचे 


वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

माझी पहिली कविता/ कविता

सावली प्रकाशन समूह
स्पर्धेसाठी
काव्यलेखन
विषय - माझी पहिली  कविता 
        *गर्विता

जपलीय  मनात मी
*माझी पहिली कविता*
अगणिक जरी रचल्या
तीच ठरली *गर्विता*

केले होते वर्णन तयात
माझ्या  बागेतील फुलांचे
एका एका फुलांनी वर्णिले
महत्त्व  आपापले स्वतःचे

लिहीली होती कन्येसाठी
भावली  तिला अतिशय
सहज केली तिने तोंडपाठ
समजून घेऊन आशय

साध्या सोप्या शब्दात 
केली शब्दांची  मांडणी
बालभारती पुस्तकासाठी
आली की, तिजला मागणी

कखुष झाले मी  मनातून
पहिली रचिली, कविता सहज 
रंगवूनी  भावना  मनीच्या
तिचे गुण गाण्याची नुरली गरज

वैशाली वर्तक 
अहमदाबाद














    *माझे लेखन
करिते लिखाण मी नेमाने
मज मिळे आत्म समाधान
माझ्या मनीचे भाव उमटे
मानते  मी शारदेचे वरदान

सहज घडते लिखाण 
जसा मिळता  विषय
करुनिया विचार  मंथन
घेते ध्यानी आधीच आशय

कधी लेखणी रंगवी शब्द
प्रबोधन वा जपण्या संस्कृती 
तर कधी महत्त्व  आरोग्याचे
पण लिखाण  ही झालीय प्रवृत्ती 
  

माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
 सुंदर कसे ठेवावे पर्यावरण

मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे

देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची


वैशाली वर्तक
अहमदाबाद


     
















सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...