मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

राहून गेले

आयुष्य म्हणजे जीवनाचा प्रवास . जसे आपण मोठे होत जातो तसे मेंदू च्या विकासाने आपले मन इथे तिथे धावू लागते. ब-याच कल्पना आपण करीत असतो. मनांत स्वन्प रंगवित असतो. अगदी बालपणा पासून आपल्या काही ईच्छा आकांक्षा मनात तयार होत असतात . आपण त्या बालपणीच्या गोष्टी, आई वडील वा मोठ्यांकडून पूर्ण करुन घेत असतो. तेव्हा एखादी इच्छा होणे ती पूर्णत्वाला आणणे अशी क्रिया चालूच असते. जसे बालपणी पोलीस पाहून ,त्याचा दरारा , त्या वेळच्या वयास आकर्षक वाटून , मी पण शूर शिपाई होईन .वा आईने, आजीने शूर लढवैय्यांच्या सांगितलेल्या गोष्टी तून त्या वेळी बाल मनात तशा ईच्छा तयार होतात. . रेलगाडीच्या आकर्षणाने रेल्वे गाडी चालविन वगैरे वगैरे .या सा-या बाल मनातील बाल कल्पना . पण मोठे झाल्यावर क्रिकेट मॕच पाहून आपण पण sports मधे निपूणता मिळवावी. एखादा गेम शिकावा व नाव कमवावे. वा एखादी कला शिकून त्यात नाव मिळवावे . संगीत - गाणे शिकून , अगदी लता, आशा ,ऊषा नाही पण चार लोकांत , "वा छान गाते हं ,"असे उद्गार निघतील इतपत गाणे शिकावे . तर गाणे शिकणे अशी गोष्ट इच्छा मनात येते. आपल्या वेळी सध्या सारखे मुलांना विविध classes ला घालण्याचे वेड नव्हते , पण लहान /मोठे class मधे आई वडील पाठवायचे. तर प्रत्येकाच्या मनात कांही ना काही गोष्ट असतेच .तसे च मोठे झाले की एखादा छोटा व्यवसाय करावा तसेच विदेश प्रवास करावा. अरे हो! ..आता तर प्रवास ही गोष्ट पण सहज शक्य होत आहे .त्यामुळे , एखादी गोष्ट राहून .........गेली असे कमीच दिसते. कारण सध्या वरिष्ठ नागरिक सधन म्हणा वा आर्थिक दृष्टीने स्वतंत्र आहे वा परावलंबी नाहीत. मला पण बहुतांशी गोष्टी मिळाल्या तशी मी समाधानी वृत्तीचीच आहे हं. हो ! खरच सांंगते .आजीची बालपणाची शिकवणच तशी. तर ,त्यामुळे म्हणा वा इच्छाच कमी आहेत म्हणा. आणि आता वाढत्या वयाला आकांक्षा पण कमी होतात. तरी आजकालच्या युगाकडे पहाता "वेहीकल चालविणे" राहून गेले. असे म्हणायला हरकत नाही, त्याच काय आहे .पहिली गोष्ट ,अगदी बालमंदीरा पासून ते शाळे पर्यत सर्वच ठिकाणे घराच्या दोन मीनीट अंतरावर .त्यामुळे सायकलची पण गरज भासायची नाही. कारण सायकल पहिले वाहन शिकण्याचे. पुढे काॕलेजमधे गेले तर बस स्थानक घराच्या 2/4 मिनीटाच्या अंतरावर . तिथे पण वेहीकलची गरज भासली नाही .पोहणे मात्र शिकले,.. ....अगदी निपुणता मिळविली .थेट नॕशनल लेव्हल पर्यंत पोहचले .व अजुन ही या वयात पण वरिष्ठ नागरिक मधे सुवर्ण पदक नॕशनल लेव्हलला मिळवत आहे. पण तो swimming pool तेव्हा घरापासून सहज खेळत जाऊ येऊ शकेल अशा अंतरावर . पुढे , बँकेत सर्वीस लागली. ती पण इतकी जवळ की आई ने फोडणी घातली तर घमघमाट बँकेत पोहचायचा. ...इतकी जवळ. तेव्हा सांगायचे हे की, घराच्या आजुबाजुलाच माझा सतत वावर राहिला .त्या मुळे वेहीकल शिकणे जरुरी भासले नाही .त ssसे नाही म्हणायला भावाकडून सायकल शिकण्याचा प्रयत्न केला .पण दोन्ही गुडघे घासले गेले त्यावर मलम पट्टीत करणे व swimming ला न जाणे. घरी रहाणे हे शक्य नव्हते. कारण swimming competition सतत असत. त्या साठी पोहणे रोजचे करावे लागे. शेवटी सायकल शिकणे लांबले. ते इतके लांबले की , .....राहूनच गेले. त्यामुळे सायकल नाही म्हणजे balancing करणे जे दुचाकी वेहीकल ला जमलेच पाहिजे. ते आलेच नाही. कारण एकदा का व्यवस्थित balancing आले तर मग two wheeler वाहन चालविण्यास पटकन जमते .पण तेही नाही . तरी देखील मुलीने मोठे पणी टू व्हिलर शिकविली .रात्री घराजवळच्या ओपन मैदानात नेऊन शिकविण्याचा प्रयत्न केला .व मी शिकले पण . नाही म्हणायला 3/4दा जवळच्या दुकानात वस्तू आणावयास गेले .पण समोरून वहान येताच जीव घाबरायचा . भिती वाटायची. त्यामुळे भर रहदारीत स्कूटी चालविणे शक्यच झाले नाही. त्यामुळे टू व्हीलर चालविली नाही. तसेच मिस्टरांनी फियाट घेतली तर शिकविण्याचा प्रयत्न केला. चांगले 7/8 दिवस जात होतो. जातांना हे दहा वेळा clutch break एक्सलेटर चे सांगून ही चूक व्हायचीच. तसेच करत ५/६ दिवस गेले मी गाडी चालवायला. एकदा तर भर रहदारीत सर्व रहदारी माझ्या मुळे आडली . लोक horn देत होती.. मला काहीच सुचेना .मी गाडी कशी सुरु करु समजेना. लाजून खाली उतरले व मिस्टरांना म्हटले तुम्ही च पहा मला जमतच नाही. त्यावर त्यांची बोलणी तर खाल्ली च.... पण तोवर लोक ओरडत होती, ते वेगळच ... ती बोलत होती, " ओ ताई काय येत नाही आणि निघाल्या गाडी चालवायला. आम्हाला उशीर होतोय .या बायकांना काय ? उचलतात वेहीकल निघाल्या . उगाचच खोटा हव्यास .ओ ! ताई किती खोळंबा करताय " मी गांगरून गेले. त्यानंतर दुस-या दिवशी नीट गाडी चालवित घरा पर्यंत आले. ..university च्या मैदानावर मी आठचा आकडा चालविला . ब्रीजवरुन पण न घाबरत गाडी चालविली .व आता घरा जवळ आले. .. तर मेन गेट मधे आत शिरणार तर गेटशी पुरूष मंडळी गप्पा मारत उभी होती. त्यातून ओळखीचे पहात आहेत हे पाहून अजून बावरले . आधीच confidence नाही , घाबरत वळवून गाडी आत तर घेतली ... पण बाजूला उभ्या असलेल्या गाडीस ठोकून दिले. बरे कोणा लोकांना ठोकर दिली नाही पण बाजूला उभी असलेल्या गाडीचा व माझ्या गाडीच्या अंतराचा माझा अंदाज चुकला . व त्या गाडीला टक्कर दिली .... झाले....त्याच्या व आमच्या गाडीला खर्चाची भर झाली . तरी .मग गाडी दुरुस्त होऊन येऊ दे .मग चालवू .पण, मग .... ते ..मगच... राहिले .पुन्हा काही गाडी चालविण्याची हिंमत केली नाही. त्या मुळे गाडी शिकण्याची ईच्छा तेथेच राहिली. त्यामुळे गाडी वा टूव्हीलर चालविलेच नाही असे नाही .पण सध्याच्या बायका कशा बिनधास्त वाहन चालवितात. मुलांना सोडायला वा भिशीला कशा ऐटीत गाड्या घेऊन जातात, अथवा कधी नवरा म्हणतो बायकोला ,"आज तूच गाडी चालव .मी बसतो आरामात ."असे सुख मी त्यांना कधी च दिले नाही. अथवा आमची " ही गाडी घेउन आली होती मला सोडायला. "असे यांनी माझ्यासाठी काढलेले शब्द ऐकायला मला कधीच मिळाले नाहीत . उलट एवढी swimmer पण वेहीकल कसे चालवण्यास नाही शिकली हे मात्र वारंवार ऐकण्यास मिळाले. पण खर सांगू मला त्यात जराही वावगे वाटले नाही. कदाचित भिती वा आवड कमी दोन्ही कारणे असावीत . तरी पण काही ही म्हणा, वाहन स्वतंत्र बिनधास्त चालविणे.... राहूनच गेले. हे मात्र खर . .बर आहे माझ्या मुलांना आताच्या मुलांप्रमाणे आई गाडी चालविते वा आईने गाडी चालवावी असे तेव्हा फार कौतुक नव्हते. हल्ली, आपल्या नातवंडाना आईने गाडी चालविणे आवडीचे ,कौतुकाचे वाटते. काळा काळातील फरक दुसरे काय! आता माझे तरी या जन्मी तरी शक्य नाही.. "वेहीकल चालविणे" ही गोष्ट राहिलीच वैशाली वर्तक ( अहमदाबाद )

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...