गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

घर ... कविता/कथा / पत्र लेखन / लेख / ..अभंग बाल कविता



शब्दसेतू साहित्य  मंच

साप्ताहिक  स्पर्धा क्रमांक  6/22

विषय - घर / घरकुल


   1  अष्टाक्षरी रचना

     *स्वगृह*


सांजवेळ येता क्षणी

सय येते स्वगृहाची

जिथे मानव मिळवी

मनःशांती ती जीवाची

           भिंती असती खंबीर

           जिव्हाळ्याच्या घेती ठाव

           द्वारी बोगन फूलली

            सदा वसे प्रेम भाव

ओढ लावूनी जीवास

गृहलक्ष्मी पाही वाट

देई घरा घरपण

वाढवून त्याचा थाट

'              दिसे लोभस पाखरे

             खेळतांना अंगणात

             उद्या  घेतील भरारी

              स्वबळाने जीवनात

असो ती आरामदायी

तारांकित असे जरी  

परतूनी येता गृही

स्वर्ग सुख मिळे घरी

               सायंकाळी देवा-ह्यात

               भक्ती पूर्ण  सांजवात

                प्रातंकाळी ऐकू येते

                ज्ञानेश्वरी ती घरात

काडी काडी मिळवूनी

पक्षी घरटी बांधती

नाती विणीली प्रेमाने

सारे प्रेमाने नांदती.


वैशाली वर्तक 

अहमदाबादळ




2  लेखन पत्र 

प्रती

बोरसली अपार्टमेंट

शहापूह

अहमदाबाद 




वास्तू पूरुषास

सविनय नमस्कार 

        तुझे किती  उपकार मानू तेवढे कमीच आहे. खरच ४/५ वर्ष भाड्याच्या घरात राहून मी म्हणजे आम्ही  बोरसलीत  फ्लैट घेतला. किती आनंद झाला होता सांगू. 

वास्तू  मूर्ती  मुंबई  हून दिरांकडून मागविल्या  व रीत सर गुरुजी ब्राह्यणाकडून होम हवन करून वास्तू  पूजन केले. घरचे सासू सासरे दीर नणंद सर्वांची पोरे वगावातील आई बाबा भाऊ वहीनी भाजे मस्त  गोतावळा जमला होता. जोशीगुरुजी समवेत चार ब्राह्यण  मंत्र  उचचारात घार कसे प्रसन्न  झाले. 

     त्या वास्तूत  माझीमुले मोठी झाली.  शालेय शिक्षण घेतले उत्तम  प्रगति झाली. यांची पण छान प्रगती झाली. नोकरी सोडून धंद्यात  पण उत्कर्ष साधला. विदेश दौराची संधी मिळाली. व सर्वागीण प्रगति झाली. 

   म्हणतात ना रोज सांज वेळी दिवा लावावा. घरात वास्तू  पूरुषाचा वास असतो. अभद्र

बोलणे टाळावे. अगदी मला मनोमन पटले. आपण कितीही ही प्रयत्न  करा पण वास्तू  पुरूषांची  साथ हवी. ते मला पटले. 

      तेथे राहून मोठ्या स्वतंत्र  घरात तुझ्या  कृपेने आगमन झाले तेथे पण वास्तू  पूजन

केले .त्या घराची वास्तू  अजून मोठी वर खाली खोल्या केल्या मुले पण इंजीनीअर 

त्यांच्या  ज्ञानाचा उपयोग घेत वर खाली सुंदर  twin बंगला झाला .माझी  बाग बगीचाची हौस पण पूर्ण  झाली. मुलांचे शिक्षण संपून त्या तिघांची लग्ग होऊन  आम्ही पाच होतो. ते  10 झालो. सासू बाई सासरे पण फूल झाडांचा आनंद घेण्यास मधून येत .कारण अहमदाबाद चा उन्हाळा मुंबई  पुणेकरांना सहन होता नाही म्हणून थंडी त रहावयास येत.  त्या वास्तू चे पण किती गुण गाऊ दोन्हीही  मुले शिकून नोकरीस लागली त्यांची कुटुंबे तयार झाली सारे तुझ्या च कुशीत रहात होतो. पण लहानास सिंगापूर नोकरी निमित्त  जावे लागले. मुलली साठी गावात असल्याने माहेरचे झाड लावले आहे. 

    आता तूझ्याच कृपेने अहमदाबाद मधेच बंगले वजा वास्तू  झालील व आता तेथे ,तर समोर मोठे लाॕन की आता माझ्या ने पण होत नाही तर माळी ठेवलाय.

अगदी निसर्गात  रहावयास मिळत आहे. रोज मोरच्या आवाजाने जाग येते. विविध  पक्षी अंणात येतात. 

हे सारे कसे तर   तूझीच कृपादृष्टी  . गाणे मनात  गुणगुणते 

   "लागोन न दृष्ट माझी माझ्या  वैभवाला."

  तुला शतशः  कोटी कोटी वंदन

तुझ्या  आशीर्वादात वाढलेली

वैशाली 

प्रेषक

वैशाली वर्तक 

शरणम 7

सेटेलाईट

अहमदाबाद 

3       संवाद लेखन संवाद लेखन

 .वास्तू पुरुष आणि  मी


मी -                आज  नवीन वास्तू त प्रवेश केला आहे. तुला नमस्कार  करते. आधीच्या    

                    वास्तूला    सोडून नव्या वास्तू त आले. 

वास्तू पुरुष  ---   काही हरकत  नाही. सदैव आशीर्वाद आहेतच

मी ---              नाही रे तेथील घर पण छानच तूझ्या सान्निध्यात सतत प्रगतीच झाली. 

                      सदैव तू पाठीशी ठाम उभा राहिला. 

वास्तू पुरुष ----- अग मी एकच आहे  तिथे माझा च वास होता. इथे पण मी तुझ्या  

                     जवळ बरोबरच आहे. असे नको समजू तू मला तेथेच सोडून आली. 

                       तू यथासांग पूजा केली ..स्थापना केलीस.तेथे मीच होतो येथे मीच 

                      आहे. 

मी              -- हो रे मी परवा त्या वास्तूत गेले .तेथे जाऊन गुरुजींच्या सांगण्या प्रमाणे

                     तुला जेथे ठेवले होते. त्या जागेला तुला स्पर्शून मनोभावे नमस्कार 

                      केला.  तुझे अनंत उपकार मानले. 

वास्तू पुरुष --- तू फार भावूक होतेस . अग मी सर्वत्र  आहे. चराचरात आहे.

      मी ------  खरच रे   नाहीतर ही तिसरी  वास्तू   पण तुझी साथ सदैव मिळाली. माझी     

                   म्हणजे आम्हा दोघांची प्रगती करत सदैव मनाला शांती दिलीस. तू  खरच

                   दयावान आहेस. रे

                   अरे आठवत का तुला एकदा सासू बाई बोलल्या होत्या   मला.

                    मला जरा आमच्या पुरुषार्थाचा म्हणजे  प्रयत्न मेहनत ची  आठवण 

                     होती. मी म्हटले होते  . काय पूर्वजांची कृपा  ...आमचे कर्तृत्व काहीच 

                       नाही.

वास्तू पुरुष --   हं  आठवतय  ना पण तुझा तो अभिमान बोलत  नव्हता.  तुम्ही शुन्या

                     तून निर्माण  केलेली  मेहनत  प्रयत्न होते. 

  मी           -- अजून मला आठवय आजी आई कायम म्हणायची नेहमी शुभ बोलावे

                    म्हणजे तू आशीर्वाद देण्यास  तयारच असतो. अगदी खर आहे रे ते

                   आता आपण सकारात्मक विचार  करा म्हणतो ते काय तेच आहे ना.

वास्तू  पुरुष  -- हं  हीच शिकवण तू नातवंडास देत आहेस . छान वाटते

                    आणि उगाच त्या वास्तू त मला सोडले    म्हणून वाईट वाटून घेऊ 

                    नकोस  .

                     मी जळी स्थळी पाषाणी  एकच आहे. ते आमचे मूर्ती  स्वरुप आहे.

    शब्दसेतू साहित्य  मंच

 29/4/22

साप्ताहिक उपक्रम  5/22

5   लेख लेखन  लेख लेखन 

विषय - घर


                       घर

             वर्षभरात असती तीन ऋतू

              पावसाळा हिवाळा उन्हाळा

              पण  घराच्या प्रेमाला मात्र 

               असे एकच ऋतु जिव्हाळा


        घर म्हटले की जिव्हाळा आलाच ,आणि हो !  का नसणार ?  मनाला शांती,  तनाला विसावा  , सर्व  ऋतुतून निवारा देणारे.. शांती स्थान असते...  ते घर. म्हणूनच, तर बाहेरून आलो की,

" चला आलो बाबा एकदाचे घरी  असे निश्वासाचे."  उद्गार  निघतात ते काय उगीचच. 

       घर , लहान असो वा मोठे ते महत्त्वाचे  नसते. घरात मिळणारे सुख ,आनंद आपलेपणा हा महत्त्वाचा असतो. कारण त्या घराला गृहीणी घरपण देण्याचे काम करत असते. त्या मिळणा-या घरपणाने -आपलेपणाने  प्रत्येक  व्यक्ती ला घराची ओढ असते. थकून आलेल्या पतीला दारात वाट पहाणारी बायको दिसली की तन- मन सुखावते. कारण आत्मियता मिळते. 

   हे सारे घराला  ... घरपणा बरोबर देण्यात येणा-या संस्कारात  येते. मुले शाळेतून येऊन पाटी पुस्तक ठेवून अंगणात खेळतांना पाहून , कामावरुन आलेल्या आईबाबांचे  मन सुखावते . कारण आजी आजोबा वडील धारी मंडळी  यांचे  संस्कार मनास आनंद देतात. आणि हे सारे या चार भिंती व वरचे छत यात घडतात म्हणून त्याचे *घर* बनते. 

घर स्वच्छ ठेवणे तर महत्त्वाचे  आहेच . कारण जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मीचा वास असतो.  अस्वच्छता म्हणजे आळस.... आळस असता मग कसा घडणार विकास ..आणि विकास नाही प्रगती नाही  ... तर लक्ष्मी नाही हे ओघाने आलेच. 

     तर ,अशा रीतीने घर या शब्दा बरोबर  सारे संलग्न  असते. घरात सर्व  सुख सोयी प्रत्येकाला  उपलब्ध  असतात असे नव्हे . घरात रहाणारी व्यक्ती  असलेल्या  सुख सोयी  व  असलेल्या कमतरतेशी तडजोड  करीत  आनंद मिळवित रहाणे ही घराची शिकवण असते. वेळेनुसार मग सुखसोयी  करुन घेता येतात. त्याच बरोबर येणारे  सणवार ,  उत्सव साजरे होतात. पाहुण्यांची ये- जा चालते. घरात नेहमी गप्पांच्या मैफिली रंगतात. हास्याची कारंजी  उडतात. आणि मग म्हटले जाते. वा काय हसते घर आहे. आता   हे घर कुठले हसणार ?

  .तर घरातील व्यक्तींचे स्वभाव ..विचारांचे देवाण घेवाण.. हे सारे  घरास जीवंतपणा देण्यात अपसुकच काम करत असतात. व त्यामुळे घरातील वातावरण सदैव प्रसन्न रहाते.  

   आणि , त्या साठी  घरापुढे बाग बगीचा पुष्करणी हे असले पाहिजेच असे नाही. ते सारे शोभनीय आहे. मंद प्रकाशात तेवणारी  देव घरातील समई घराचे पावित्र्य  दाखवून जाते. प्रकाशमय करते. आणि असे घर मंदीर  वाटू लागते. म्हणून

प्रत्येकाला  त्या घराशी  जिव्हाळ्याचे  नाते जुळते  जिव्हाळा वाढतो.

 

वैशाली वर्तक 

अहमदाबाद



शब्दसेतू साहित्य  मंच पुणे

साप्ताहिक उपक्रम 6/22

   विषय - घर 

    6/22  अभंंग रचनाअभंग रचना


               निजधाम


निजधाम माझे  । मांगल्याचे रुप  । 

आवडीचे खूप    ।  मजलागी   ।।  


सदन  शुमम् ।  आनंदाचे धाम  । 

सदा हरी नाम ।  चालतसे   ।। 


येता सणवार  ।  जमे गोतावळा  । 

आनंद सोहळा  । भासतसे ।। 


भुकेलेल्या अन्न ।  तहान्हेल्या पाणी । 

सदा गोड वाणी ।  मुखी असे   ।। 


आतिथी सन्मान ।  होई सदाकाळ  । 

प्रसन्न सकाळ ।    भासे सदा ।। 




बाल कविता


थांबा मी दाखवितो तुम्हाला माझे घर

पहा  मी काढले आहे  तसेच कागदावर


पुढे  आहे अंगण तयात तुळस वृंदावन

नित्यनेमाने सकाळी होते सडा समार्जन


झुला आहे लावलेला खास माझ्या साठी

शुभंकरोती म्हणून मग पाढे म्हणण्या साठी


प्राजक्ताचा सडा पडता उचलतो मी फुले

एक एक उचलताना ताईचे कानातले डुले


आजी आजोबा सांगती घराची महती

आम्ही मुले दंगा करीत  ऐकतो  सभोवती


 कसे काढयल ना चित्र  घराचे उचित  छान

जेजे वदलो तेची दिसते घराची शान 




हसरे  सदन  ।  नामे ओळखती । 

अशीच महती !  शुभमची  ।। 


माझे  हे  शुभम्   ।  प्रेमाचा  उमाळा । 

मायेचा जिव्हाळा ।  सांगे वैशू   ।। 



वैशाली वर्तक 

अहमदाबाद



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...