विश्व लेखकांचे
आयोजित उपक्रम
लेख लेखन
विषय ...पाहुण्यांची रेलचेल व मनात पडलेले प्रश्न
काही म्हणा पाहूणे येणार म्हणताच एक उत्साह अंगात संचारतो
मला पहिल्या पासून लोकांचे येणे जाणे मनापासून आवडते. आईकडे पण असेच होते व येथे सासरी पण तसेच वातावरण लाभले. त्यातून आम्ही अहमदाबाद मधे बाकी दोन्ही दीर नणंद मुंबई पुण्यात.व आमच्या कडे आमच्या सास-यांनी दिवाळी फिरती म्हणजे प्रत्येकाकडे एक एक वर्षी साजरी करायची अस ठरविले होते. त्यामुळे घरी
पाहुणे येणार तर आमची मुले, पुतणे भाच्या असा गोतावळा जमायचा.त्यामुळे पांघरुण,गाद्या, दिवाळीचा फराळ बनविणे वगैरे ची मस्त धमाल व्हायची. पण आम्ही तिघी जावा अगदी उत्साहाने एकत्र होऊन, काम करण्याचा कंटाळा न करता मस्त
सण साजरा करायचो.
प्रत्येक जणींचा एक एक विशेष पदार्थ ठरलेला असायचा. जशी माझी दालमुठ व चिरोटे. अशी एकही दिवाळी झाली नसेल की माझी दाळमुठ व चिरोटे बनले नाहीत
आता मुले मोठी झाली पंख विस्तारून परदेशी गेलीत . त्यामुळे आता ती मजा नाही.पण स्वभावात पाहुणे यावेत ही मनापासून आवड. त्यामुळे अजून ही कोणी घरी येणार म्हणताच उत्साह तोच असतो.
पाहुणे येणार म्हणता जितके दिवस रहाणार त्या दिवसांची काय भाजी ,कोशिंबीर वगैरे ची तयारी मनात व प्रत्यक्षात केली जाते.
सकाळ रात्री चा स्वयंपाक ठरला जातो. कुठे फिरायला जाणे वगैरे पण नक्की होते.
एकुण काय पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजेचे शिस्तबद्ध आयोजन करण्याची
मनाला सवय पडली आहे.
आता पाहुणे येणार यात. प्रश्न हेच पडतात की कामवाली ने रजा पाडू नये.
अर्थात आम्ही दिवाळीत एकत्र व्हायचो तर आम्ही तिघी मिळुन मिसळून करायचो.
कधी प्रश्न नाही पडायचा.
आता तर काळ बदलला आहे. संस्थेच्या बायका पण रोजची कामं वाली येणार नाही म्हणता सोय करता येते. तसेच स्वयंपाक करणारी नाही आली तर घरगुती डबे देणा-या
गृहिणींची पण सोय करता येते. बाहेरून पण गरम नाश्ते मागवता येतात.
तसेच disposable पण डीशेस available असतात त्यामुळे भांडी वालीचा पण प्रश्न सहज सुटतो.
तर सांगायच काय की मनी आवड असेल तर प्रश्न सहज सुटतात.
खरच बालपणी ची शिकवण आतिथी देवो भव दिलेली व सासरी पण तितकाच उत्साह त्यामुळे आनंदाला उधाण येते.आणि खरच लोक येणार ,रहाणार यातच जीवनाची मजा असते. अर्थात मुलांच्या शाळा क्लासेस पण adjust करतोच .
आजी आजोबा म्हणजे आता ती पदे ..जागा आपल्याच पहावयास लागतात. सूना पण समजून उमजून सहकार देतात. त्यामुळे जीवनाचा आनंद लुटत जगण्याची मजा लुटता येते.
घर लहान असेना. पण मन मोठी असली की सर्व नीट पार पडत. पण कधी कधी येतात काही आडमुठे पाहुणे...तर तेव्हा थोडे मन खट्टू होते. पण नेहमी ची मनाला सवय झाल्याने ,उगा शब्द न वाढविता, वेळ निभावून नेण्याची कला पण अवगत झाली आहे. व कधी तरी पडते घेतले तर काय?,आता वाढत्या वयाला तेवढा समंजस पणा आलाच असतो ना?
तसेही आज काल फास्ट जीवन शैली झाल्यानं कोणी 2/3दिवसा हून जास्त दिवस कोणी येत नाही. व तेवढी सरबराई सहज होते.
आणि वरिष्ठ नागरिकांना तर कोणी आले गेले की छानच वाटते.
आज काल लग्न कार्य पण एक एक दिवसात आटोपली जातात.
तर असे धावपळीचे जीवन असता कोण कोणाकडे ठाम मांडणार.?गेले ते दिवस.
तर, मी तर म्हणते मस्त पाहुणचार करावा अतिथीला आनंद द्यावा व तर आपल्याला पण पाहुणचार घेण्याचा आनंद घेता येतो. पण आधी आपण अतिथी देवो भव अगदी नाही तरी आनंदाने स्वागत केले तर वेगळाच आनंद मिळतो. नाही का?
वैशाली वर्तक
अहमदाबाद