शनिवार, ११ मे, २०२४

नीरजा काव्य. चित्र काव्य


 *स्पर्धेसाठी* 

स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित 

नीरजा काव्य स्पर्धा 

स्पर्धा क्रमांक ४६

विषय  चित्राधारित


    

   चिंतातूर मायलेक


झालाय धनीला उशीर 

करीतेय चिंता 

मनी,

भाव 

उदास मुखावरी

 नारी झालीय गंभीर 



मुलाच्या नजरेत हूरहूर 

राहिला उभा

जलात 

दूरवरची

पाहून होडी

बाबांसाठी मन आतुर


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

शुक्रवार, १० मे, २०२४

विसावा शब्दगंध शब्द मे2024



 विसावा 


जीवा ,जरुरी विसावा 

वाटे  तो  हवा हवासा 

काम चाले अविरत 

 मनी देतसे दिलासा.  


सुख, शांति मिळविता

क्षणभर न उसंत 

नाही मिळाला निवांत    

मनी राही सदा खंत


कर्तव्याच्या, पठडीत

 सदा राही रममाण 

घर, गृहस्थी पाहण्या

दिले ,झोकूsssन बेभान.



शमवून तप्त रश्मी 

 रवि जातसे अस्ताला

 अवनीच्या तो कुशीत 

 जाई जणु विसाव्याला.


आयुष्याच्या. ... सायंकाळी 

आता जगु स्वतः साठी 

नका  मानू रिक्त पण  

 आयु असता ते गाठी


इच्छा  आकांक्षा व स्वप्ने 

यांची करु फुलवात

मिळुनिया तेजाळुया

स्वर्णांकित सांजवात



वैशाली वर्तक




जीवाला विसावा /वाटे  तो हवासा /देतसे दिलासा.  /सदा मना


सुखासाठी धावे//   नसते उसंत /मनी सदा खंत/ दिनभर

कर्तव्यात दक्ष/कामी रममाण/होऊनी बेभान/गृहस्थीत


शमवून रश्मी/ आदित्य अस्ताला/जातो विसाव्याला/सांजवेळी 


झाली बघ सांज/जगु स्वत:साठी/आयुष्य ते गाठी/ असताना




गुरुवार, ९ मे, २०२४

चित्र चारोळ्या लेखन

शब्द प्रेमी विश्व शब्दांचे
आयोजित उपक्रम
 चित्र चारोळी लेखन
13/3/23

सांजवेळी 

मुलांच्या समवेत आई
दिवा लावून  देवाला
सांजवेळी  शुभंकरोती
 म्हणत  जपतेय संस्काराला



श्रीकृष्ण गोविंद मुरारीने
 अधरी धरली बासरी
गळा हार कटी पितांबर
 लोभस मूर्ती हासरी.

किती  प्रसन्नता देवा-ही
पाहता जुळती कर
भासे डोळे मिटुन
बसावे येथे क्षणभर

आहे तोची करविता
जावे त्याला शरण
शिकवण देतेय माता
करती सारे देवाला वंदन


वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, ८ मे, २०२४

नारळ



 सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित 

उपक्रम 348

विषय.  नारळ

   कल्पवृक्ष 


स्थान फळांत मानाचे

असे सदा नारळाला

 श्री उपपद लावून

 वदती जन श्रीफळाला


असो कार्य कुठलेही 

नाव  यादीत खचित 

मान त्याला मिळणार 

हे तर खरेच सदोदित 


स्वयंपाक घरात स्थान 

असे त्यांचे हमखास 

चटणी भाज्यांना तया विना

रुचिरा येई ना  खास


जाता समुद्राच्या किनारी 

हवेच  पिण्या नारळ पाणी 

 गोडी त्याची शमवे तहान 

 रमती युगुल गात गाणी


असे नारळाचे झाड

दावी सौंदर्याची शान

उंच उंच झावळ्या 

दिसतात किती छान 


 उपयोग  किती तयाचे

 कळते हे तर कल्पवृक्ष 

सर्वच अवयव पहाता

समजे सारेच कार्य दक्ष


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सोमवार, ६ मे, २०२४

चित्र काव्य गजरे वाला

नित्य फुलांचे गजरे
विकण्यास हा बालक 
घेत हातात सकाळी 
झाला अवेळी पालक

 लावितसे हातभार 
कमविण्या चार पैसे 
विक्री करी गज-यांची
माय बाप सांगी तैसे 

खरे वय खेळण्याचे
पहा नशिबाची गती
हरवले बालपण
होतै कुंठित ती मती

वणवण फिरुनिया
दिसे पहा थकलेला 
सहजची विसावता
आडोशाला झोपलेला

जीव तयाचा लहान 
किती करणार कष्ट 
वाटे देवाने इतुके 
होऊ नव्हे  ना रूष्ट





DBSसाहित्यिक नाशिक 
आयोजित 
चित्र काव्य 
शीर्षक..मेहनती मुलगा


  वय आहे खेळण्याचे
  पहा काय दैवाची गती
  कोवळ्या वयात महेनत
  पाहून कुंठीत होते मती

  का दैवाने असे लिहावे 
खेळ मौज सारूनी दूर
लहान वयात कष्ट सहणे
 काम संपविण्याची हूरहूर 

काय करणार पोटासाठी 
खायला हवेत दोन घास
नित्य उठूनी मोल मजूरी
मेहनत करावी लागेल खास 

 स्वकष्टाने करतोय महेनत 
महेनतीचे मिळेल फळ
 दुष्कृत्य तर  करत नाही 
देवच देतोय त्याला बळ

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ५ मे, २०२४

चित्र काव्य सकाळ

*आले  रवी राजे नभी
उजळल्या दाही दिशा
सोनसळी किरणांत 
न्हाली मंगलमय ऊषा      

 जणु करीती वंदन
दोन तरु आदराने 
यावे रवी राजे नभी
सृष्टी फुलली मोदाने   


प्रतिबिंब आदित्याचे
अवर्णनीय   खरोखर 
शांत निश्चल जलात
दिसे किती मनोहर

थंड मंद पवनाची 
झोंबे अंगा झुळुक
करी मनाला प्रसन्न 
 नव कामास उत्सुक
असतेच सकाळ ती
नव आशा  फुलवते 
दूर  करुनी निराशा 
नव चैतन्य जाणवते

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...