शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

बाबा माझे वडील माझा आदर्श *निष्ठावंत बाबा*माझा बाप

अव्यक्त अबोली साहित्य मंच  आयोजित स्पर्धा 
स्पर्धासाठी
विषय - माझे वडील माझा आदर्श

          *निष्ठावंत बाबा*

माझा बाप निष्ठावंत
तोची घराचा आधार
किती आनंदे संभाळी
सा-या कुटुंबाचा भार

लेकरांच्या सुखासाठी
सदा तळमळ साही
स्वतः कडे दुर्लक्षता
कुटुंबाचे सुख पाही

 चिंता आम्हा लेकरांची
मनी एकची तो ध्यास 
होवो मुले यशवंत
हीच असे मनी आस

सारुनिया हौसमौज
सदा घडविण्या  दक्ष
पुरविले  हटृ लाड
गुणी बाळांकडे लक्ष

आहे संगे मायबाप
आहे मीच भाग्यवान 
गेल्या जन्माची पुण्याई
झालो आम्ही  पुण्यवान

 
तेची मजला सर्वस्व
बाबा आहेत आदर्श 
 पोहण्यात पारंगत
माझा केलाय उत्कर्ष

किती ऋण मजवरी
कधी न व्हावा विसर
फेडण्यास त्याचे ऋण
घडो सेवा निरंतर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

गीत. कोरी पाटी नशीबाची

उपक्रमासाठी शब्दरजनी साहित्य समूह आयोजित उपक्रम अष्टाक्षरी गीत लेखन काव्य विषय - पाटी कोरी नशीबाची *आस सुटली यशाची* आस होती सुयशाची पाटी कोरी नशीबाची धृवपद केले प्रयत्न अपार दैव अडलेची फार छाया दाटे नैराश्याची पाटी कोरी नशीबाची 1 विनाशाचा चाले खेळ आली बिकट ही वेळ न सरे निशा दुःखाची पाटी कोरी नशीबाची 2 आली जगी अवदसा हरवला कवडसा आली वेळ संकटाची कोरी पाटी नशीबाची 3 वैशाली वर्तक अहमदाबाद



उपक्रमासाठी 
शब्दरजनी साहित्य समूह
 आयोजित उपक्रम अष्टाक्षरी गीत लेखन काव्य

विषय - पाटी कोरी नशीबाची

   *आस सुटली यशाची*

आस होती सुयशाची
पाटी कोरी नशीबाची     धृवपद

केले प्रयत्न  अपार
दैव अडलेची फार
छाया दाटे नैराश्याची
पाटी कोरी नशीबाची    1


विनाशाचा चाले खेळ
आली  बिकट ही वेळ
न सरे निशा दुःखाची
पाटी कोरी नशीबाची    2

आली जगी अवदसा         
हरवला   कवडसा
आली वेळ संकटाची
कोरी पाटी नशीबाची        3

वैशाली वर्तक 
अहमदाबाद







 

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीचा आनंदाचा क्षण

*स्पर्धेसाठी*
अखंडिकल्याणकारी काव्यसमूह
फेरी 41
विषय -  स्वातंत्र्याच्या अमृतोत्सव आनंदाचा क्षण

      *साजरा करु सोहळा*

आला क्षण आनंदाचा
करु अमृत  उत्सव
स्वातंत्र्याच्या सोहळ्याचा
करु आज महोत्सव              1

दूर झाली महामारी
वाटे आनंद याक्षणी
देशप्रेम उसळूनी
मोद वाटे मनोमनी         2

स्वदेशीचा लावू नारा
आत्म  निर्भर बनुया
धरु विज्ञानाची कास
नवे शोध ते लावूया            3

दूर सारुनिया जाती
 धर्म  सारेची समान
बनविण्या जगतात
देश भारत महान             4

देशभक्त सुपूत्रांनी
समर्पीले  त्यांचे प्राण
करु देशाचे रक्षण
ठेवुनिया मनी  जाण             5

स्वातंत्र्याच्या शुभदिनी
देश रक्षणाचे काम
घेऊ  मिळूनी वचन
हेच असे तीर्थ धाम                 6

देश आपला भारत
बाळगुया अभिमान
मिळालेल्या स्वातंत्र्याचा 
दाखवुया जगी मान              7

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




निळा निसर्ग /चार रंगी काव्य

 निळा निसर्ग 


देव निर्मीत नीलांगण 

 पहाण्यात मन दंग

कधी निळे कधी केशरी

क्षणोक्षणी बदलते  रंग


रवी येता निलांगणी

 सडे केशराचे नभात

निरभ्र दिसे निळा रंग

पडे बिंब  जलाशयात



 श्रावणमासी निळ्या निसर्गी

चढे धरेला रंग हिरवा

बरसता  कृष्ण मेघ

जन  म्हणती  ऋतू बरवा


भर निळ्या निसर्गात 

 ढगाआड इंद्रधनु  मागे

दावी अवनी अन नभीचे

 जणु प्रीतीचे  ते धागे






अ भारतीय मराठी साहित्य परिषद समूह २

आयोजित उपक्रम क्रमांक ६३२

विषय...चार रंगी काव्य




प्रत्येक रंग असे अनुपम

सूर्यप्रकाशात सामावती  सारे

रंग असती सारेची मनोहर

इंद्रधनुष्य दावी  रुप न्यारे


*पांढरा* दावी शांत भाव

 दिसे  सदा सात्विक निर्मळ 

सरस्वती देवीला पहाता 

कळे भाव कसा शांत सोज्वळ.


धरणी मातेचा रंग काळा

 पण  येता ऋतू बरवा

खुलते कशी हिरव्यारंगी

भासे नेसली शालू *हिरवा*



देव निर्मीत नीलांगण 

 पहाण्यात मन दंग

*सु -नील* नभ हे सुंदर नभ 

क्षणोक्षणी बदलते  रंग



रवी येता *निलांगणी*

 सडे *केशरी* नभात

निरभ्र दिसे निळा रंग

पडे बिंब  जलाशयात.



वैशाली वर्तक

अहमदाबाद




कल्पतरु जागतिक साहित्य मंच

आयोजित उपक्रम

विषय..नभाचे रंग


देव निर्मीत नीलांगण 

 पहाण्यात मन दंग

कधी निळे कधी केशरी

क्षणोक्षणी बदलते  रंग


रवी येता निलांगणी

 सडे केशराचे नभात

निरभ्र दिसे निळा रंग

पडे बिंब  जलाशयात


 श्रावणमासी निळ्या निसर्गी

चढे धरेला रंग हिरवा

बरसता  कृष्ण मेघ

जन  म्हणती  ऋतू बरवा


भर निळ्या निसर्गात 

 ढगाआड इंद्रधनु  मागे

दावी अवनी अन नभीचे

 जणु प्रीतीचे  ते धागे


अशी असते किमया रवीची

दिवसभर असता नभांगणी

खरा तोची  असे चित्रकार

ह्याची जाण होते मनोमनी


वैशाली वर्तक

अहमदाबाद 



वैशाली वर्तक 

अहमदाबाद



चित्र काव्य मने जुळून आपुली


शब्दरजनी साहित्य  समूह
आयोजित  भव्य राज्य स्तरीय उपक्रम 
चित्र  काव्य लेखन

     *विश्वास घात*

मने जुळूनी आपली
वेडी मी कुठे फसली
माझे मलाच कळेना
प्रीत अशी का रुसली         1

झाली घायाळ मी पूर्ण 
अश्रू  ढाळीत बसले
झाला विश्वासाचा घात
दुःख जीवनी उरले              2

झाला वृक्षची निष्पर्ण
माझ्या  सारखा  भकास 
खग समजावी तया
किती होशील  उदास             3

सांगणार तरी कुणा
मम अंतरीचे खंत
झाला  चिरदाह आता
नाही अश्रूंना उसंत            4

तटी गोगलगायने
दिले सोडून शंखास
मीही राहिली एकटी
कोणी नाही सांत्वनास    5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

गीत उघडा आता दार हो गीत

उघडा आता दार हो
झाला फार उशीर हो

नाही दर्शन तुमचे 
जीव तळमळे फार
तूची असता कर्ता
आम्ही कोठे जाणार
कृपावंत दयाधना
तूझा आधार आम्हा हो


क्षणभर चैन नाही
तव मूर्तीच नयनी
कधी पाहीन तुम्हास 
 आस ही डोळा भरुनी
दूर करा ही व्यथा हो


भक्त गण वाट पाही
चाले नामाचा गजर
किती उत्सुक पहाण्या
तूजवर ती  नजर
द्यावे आता दर्शन हो


वैशाली वर्तक 

देवघर

शनिवार उपक्रम
विषय - देवघर
       
सदनात  असे महत्वाचे 
स्थान सदैव देवघराचे
दिशा पाहून ठरविती
ठिकाण देवांना ठेवण्याचे

   
   पाहताच देवघर मनी,
   प्रसन्नतेचे   येती भाव
   दूर होई चिंता दुःख 
   नैराश्याचा सदा अभाव

   रोज अंगणी फुलती 
   फुले विविध  रंगीत 
   करिते देवा अर्पण
   भक्ती भावे समर्पीत

   देवघर पाहता जनांचे,
   नकळत कर जुळती
   देवघराची शान पाहूनी
   हर्षित भाव उमटती

   घरात सर्वात आकर्षक 
   भासे, अर्थात देवघर
   त्याच्या शिवाय घरात
   न आवडे क्षणभर

    वैशाली वर्तक 
   

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

समजून घ्यायला हवे

काव्यस्पंदन राज्यस्तरीय समूह 02
साप्ताहिक काव्य लेखन स्पर्धा 
मुक्तछंद काव्य लेखन स्पर्धा 
विषय - समजून घ्यायला हवे

      *हवा समजूदारपणा*

काय म्हणलात तुम्ही ?
*समजून घ्यायला हवे*
अहो , हे काय सांगणे झाले ?
त्यात काय सांगितलं नवे!

जीवनात हवीच तडजोड
 नको आपलाच अट्टाहास
म्हणजेच समजून घ्यावे इतरांना
नाहीतर होतो आपलाच उपहास

आपलीच  नका लादू मते
 ऐकावी  कधीतरी  कुटुंबियांचे
एकमेकांशी  होता विचार  विनीमय
असते   ते सर्वदा फायद्याचे 

*समजून घ्यायला हवे*
हेच तर आहे जीवनाचे सार
होते मैत्री , जुळतात मन
नको आपल्याच मतांचा भार

सारस्वतात तसेच स्वातंत्र्यवीरांत
होतेच ना  मतभेद अनेक
समजून घेतले एकमेकांना 
कारण ध्येय मात्र   होते  एक


वैशाली वर्तक 
अहमदाबाद











चित्र काव्य

काव्य  रचना 

चित्र काव्य

काव्य रचना 

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...