कारण
कारणात खरोखर जग जगते
आघी कारण, मग कार्य घडते
कारणात खरोखर जग जगते
जन्मा कारण , मरणा कारण
कर्म जरी असावे, फ़ल निरपेक्ष
कारण मात्र असते, करण्या कर्म
हर कर्म, कारणानेच घडते
कारणात खरोखर जग जगते
कर्म न करण्या, पण कारण
म्हणोनी जन, वदति जनात
न करत्याचा असे ,वार शनवार
कर्म विनमुखास, हवे कारण
कारणात खरोखर जग जगते
पानिपतात का अपयश , कारण
उतरत्या छपराची का घरे, कारण
विज्ञानात द्या वैज्ञानिक , कारण
कारणांची नामावली, वाढते
कारणात खरोखर जग जगते
घरात कारण,कचेरीत कारण
उशीर होता हवे ,साजेसे कारण
समाधान न होता , कारणाचे
त्रेधा तिरपिट , मग उडते
कारणात खरोखर जग जगते
कारणात खरोखर जग जगते
आघी कारण, मग कार्य घडते
कारणात खरोखर जग जगते
जन्मा कारण , मरणा कारण
कर्म जरी असावे, फ़ल निरपेक्ष
कारण मात्र असते, करण्या कर्म
हर कर्म, कारणानेच घडते
कारणात खरोखर जग जगते
कर्म न करण्या, पण कारण
म्हणोनी जन, वदति जनात
न करत्याचा असे ,वार शनवार
कर्म विनमुखास, हवे कारण
कारणात खरोखर जग जगते
पानिपतात का अपयश , कारण
उतरत्या छपराची का घरे, कारण
विज्ञानात द्या वैज्ञानिक , कारण
कारणांची नामावली, वाढते
कारणात खरोखर जग जगते
घरात कारण,कचेरीत कारण
उशीर होता हवे ,साजेसे कारण
समाधान न होता , कारणाचे
त्रेधा तिरपिट , मग उडते
कारणात खरोखर जग जगते