सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६

बाप्पा आले धावून


साकव्य कथा स्पर्धा २
साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित सन्माननीय डॉ दाखवायची पंडित, विद्या प्रधान,परवीन कौसर आणि सन्मा. समूह सदस्य दत्तात्रय खारोळकर, रविंद्र राठी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कथा लेखन स्पर्धा.

स्पर्धा क्रमांक २
दि १५ते १८सप्टेंबर २०२६
विषय.. बाप्पा आले धावून 
शीर्षक.  *तूची विघ्नहर्ता* 

      आहेच माझा दृढ विश्वास गणपती बाप्पा वर.
 लहानपणी आजीने रंगवून सांगितलेल्या गोष्टींचा   पण परिणाम असावा . पण कधीही कठीण प्रसंगात आपली निष्ठा असेल तर ... बाप्पा खरच विघ्नहर्ता.....  दु:खहर्ता होऊन कष्ट दु:ख.दूर करतोच.
       आम्ही सिंगापूरला मुलाकडे नेहमी प्रमाणे २\३ महिन्यांसाठी गेलो होतो. सून बाई तिच्या भावाकडे us ला तिच्या भावाकडे त्याची मुलगी लहान म्हणून   , आम्ही परतल्यावर  म्हणजे आपल्या गावी आल्यावर जाणार होती .  
पण सहज तेथे एकदा, सकाळी चहा घेत असता,
 ती म्हणाली," तुम्ही दोघे पण चला ना  ८\१० दिवस us ला, अनायसे तुमचा visa आहेच  , हो\ नाही करता करता आमचे पण जायचे ठरले. तिकिटे पण काढली मुलांबरोबर जायचे व यायचे मग  आल्यावर ४\८ दिवस  सिंगापूर मधे राहून परत घरी अहमदाबादला यावयाचे ठरले .अहमदाबाद सिंगापूर विशेष नव्हते .कारण  आम्ही नेहमी करायचो त्यामुळे ते सवयीचे. आणि अंतर पण कमी आहे.
       अर्थात परदेशी जायचे म्हणजे मेडिकल इन्शुरन्स आधी सिंगापूर स्टेचा. मेडिकल इन्शुरन्स होताच. पण आता  Us stay चा  पण मेडिकल    इन्शुरन्स   काढला.  औषधे तर सर्व बरोबर घेतलीच होती. त्याच्या शिवाय तर पाय टाकतच नाही बाहेर... . त्यातून परदेशात तर शक्यच नाही, सर्व तयारी करून us ला जावयास तयार झालो.
      आणि शेवटी  usला जाण्याचा मंगळवार आला . अचानक प्रवास वाढविला म्हणून आधीच मी गणपतीची आराधना सुरू केलीच होती, हो ! ..तोच दु:ख दूर करून सुखकर यात्रा घडविण्यारा ना!
     पण ,ज्या दिवशी usला निघायचे त्याच दिवशी सकाळी यांना युरिन मधून blood  येतय वाटले, आम्ही घाबरलो. संध्याकाळी निघायचय व तेही अमेरिकेत. तेथे काही कमी जास्त झाले तर ! एकतर डॉ मिळत नाहीत  ओळखीचे नाहीत. दुसऱ्यांचया घरी ..मेडिकल फारच महाग , आपल्याला न परवडणारे, तेथील इंडियन येथे भारतात ट्रिटमेंट घ्यायला येतात. त्यात आम्ही  येथून तेथे जाणार . म्हणजे आ बैल मुझे मार  सारखे.विकतचे दुखणे घेण्या सारखे.
       सकाळी फारच चिंताग्रस्त होतो. लगेच अहमदाबाद ला दुसऱ्या मुलाला ,  मुलीला फोन केले.व भारतात 
ल्या अहमदाबादच्या डॉ ला फोन करुन सर्व हकीकत सांगितली. तो फॅमिली डॉ असल्याने त्याने सांगितले.
नेहमी मी जी औषधे यूरीन इंनफेशन ची देतो ती आहेत का ? मी ४\४  दिवसांच्या कोर्स ची  औषधे घेऊनच आली होती. ती मी त्यांना वाचून दाखवली. ते म्हणाले काळजी करू नका, ती पूर्ण घ्या सर्व ठीक होईल.
        आता ते अहमदाबाद मधून. बोलत होते , मी सिंगापूरला व जाणार आम्ही अमेरिकेला,
पण त्या डॉ नी विश्वासाने सांगितले . 
काळजी नका करू, बिनधास्त जा.आणि त्याच दिवशी  सकाळचा तसेच दुसरा डोस घेतला दुपार पर्यंत फरक  रात्री विमानात पण त्रास नाही व तेथे पोहचतो स्तोवर पण जरा ही त्रास झाला नाही. अमेरिकेत पण १० दिवस राहिलो
     आम्ही अमेरिके हून पुन्हा सिंगापूरला स्टे करून परत अहमदाबाद ला आलो.
        मी आल्या दिवशी डॉ च्या कडे गेले, त्यांच्या पाया पडले. एका बाजूला रोज भक्ती भावे... दृढ विश्वासाने गणपती अथर्वशीर्ष म्हणतच होते. खरच त्या  बाप्पा रूपीच.डॉ.नी  आमचा प्रवास सुरळीत पार पाडला.व सुखरूप घरी परत आलो. 
      नाही तर डॉ एका ठिकाणी, मी दुसऱ्या ठिकाणी ,व जाणार अजून तिसऱ्या ठिकाणी.पण माझ्या बाप्पा ने
त्या डॉ ना विश्वास. व माझ्या त हिंमत देऊन. बाप्पा डॉ रांच्या रूपाने मला मदतीसाठी धावून आला.
 खरच तेव्हा बाप्पा ला संकटहर्ता म्हणतात ते खोटे नाही. संकट समयी धावून  येतो म्हणतात याची मला प्रचिती आली.
 खरी भक्ती व  श्रध्दा असली तर बाप्पा धावून येतो, मला राहून राहून हे पटले.
मी डॉ रुपात आलेला बाप्पा ने केवढे मोठे संकट निर्विघ्न पार पाडले . आता मी लिहीत आहे ,पण लिहीता ना "तो दिवस नजरेत समोर आला तरी भयभीतने झालेले व रडकुंडीला आलेले क्षण आठवून  क्षणभर जीव घाबरतो. आणि काव्य पंक्ति ओठी येतात व मनाला सुखावतात.

जरा येताची प्रसंग बाका
आमुचा दृढ विश्वास तूजवर
हाक देता येशी, तूची धावूनी 
दुःख दूर करण्या खरोखर . 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

बालगीत. उंदराचे मनोरथ

साकव्यकाव्य स्पर्धा 97
*स्पर्धेसाठी*



१] किलबिल  बालमनाची 

स्पर्धेसाठी....

जागतिक  साकव्य विकास मंच 
            आयोजित 
सन्माननीय  समूह सदस्या प्रेमा दळवी, सदस्य अरविन्द गणपुले व  समूह अध्यक्ष पांडूरंग कुलकर्णी यांचा 'नातू...श्रीमान कुलकर्णी" यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य काव्य लेखन स्पर्धा..
        स्पर्धा  क्र. ९७
दिनांक --२६ ते ३० सप्टेंबर २०२६
       विषय :-उंदीरमामा वर बड़बड़ गीते 
          शीर्षक ..मनोरथ उंदीराचे

आला उंदीर धावत
येता  भाद्रपद मास
मनी रचे आराखडे
दिन आनंदाचे खास

रोज मिळेल मोदक.   
लागेल  गंध धूप दीप
मान *श्रीं**च्या वहानाचा 
बसेन मी ऐटीत समीप.

नाही आता मज भय
मनी माऊ आली तरी. 
प्रत्यक्ष गणराया असता
नुसती पाहून जाते घरी.  

गणेशाच्या जोडीने  मला
 पांघरले पहा वस्त्र सुरेख
 किती तलम गर्भ रेशमी
 पहाती  मजला प्रत्येक 

दहा दिवसांची मजा
दर्शनाला येती जन
कोणी न हटके मला
भरले माझे आनंदे मन

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
8141427430

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

वृत्त बध्द जलौघवेगा. प्रवास

जलौघवेगा - 
लगा लगागा लगा लगागा
 
       प्रवास 

बराच झाला ,प्रवास आता
कधी नव्हती ,मनात चिंता  

नकोच आता ,कुठे भ्रमंती 
शरीर मागे ,जरा विश्रांती       

फिरून झाल्या ,कडे कपारी 
नदी जलाशय ,नदीश भारी        

किती करावी, दया मजवरी
तरी  तुझा हात दे  पळभरी. 

तुची करविता,  तुझ्या शुभेच्छा 
तुझ्या दयेची   मनात इच्छा         

मनी नुरावी कुठेच  भ्रांती
सदैव  देतो मनास शांती .

सुखात झाला ,वदे प्रवासी 
कृपा  तुझी मग,नसे उदासी.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




जलौघवेगा - 
लगा लगागा लगा लगागा
 
प्रवास 

बराच झाला ,प्रवास आता
कधीच नव्हती ,मनात चिंता  

नकोच आता ,कुठे भ्रमंती 
शरीर मागे ,जरा उसंती 


फिरून झाल्या ,कडे कपारी 
नदी जलाशय ,नदीश भारी        

 दया असू दे अशीच मजवर
असेच आशीष ठेव पळभर

नको उपेक्षा,  असो शुभेच्छा 
तुझ्या दयेची   मनात इच्छा


मनी नुरावी कुठेच  भ्रांती
सदैव  दे तू मनास शांती 

सुखात झाला ,वदे प्रवासी 
कृपा  तुझी मग,नसे उदासी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

निसर्गाचे दान

 सर्व धर्म समभाव  साहित्य मंच

उपक्रम 

काव्य लेखन 

विषय - निसर्गाचे दान



चराचरात असे देव

निसर्गाने दिले दान

पहा किती अनमोल

ठेवू सदा तयाची जाण


सूर्य चंद्र तारे नभी

नभांगणीचे  असे दान

निळ्या निसर्गाची जादु

ऋतुचक्राने येते भान


नदी डोंगर कड्यातून

येते खळखळ  वाहत

देते जल प्राणीमात्रास 

जीवन देण्या अविरत


वृक्ष  लता वेली देती

अन्न वस्र  निवारा छाया

वरदान रुपी असती

करीती सदैव माया


अथांग जलाशय सागर

करी जलद देण्या जीवन

मोती रत्ने माणिक उदरी

रत्नाकराचे ऋण जाणा मनी


असे दान रूपी निसर्ग 

किती असती उपकार

निसर्गात पहा  देव

असे जीवनाचा आधार


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

चित्र काव्य करू हितगुज


शब्द रजनी साहित्य समूह पुणे 
चित्र काव्य 
अष्टाक्षरी 
शीर्षक  ... करु हितगुज 


हात  हातात घेतला
जाऊ समुद्र  किनारी
मौज लाटांची पहात
बसु बाळुत शेजारी.

सूर्य आलाय अस्ताला 
 पीत वर्णी नभ झाले
दिशा सा-या धुंद कशा
जन फिरायला आले.

सांज असतेच अशी
ओढ लावते जिवाला 
दोघे आपण असता
मिळे आनंद मनाला .

रंगवूया स्वप्ने मनी
सांग तू  मनीचे गुज
नको ठेवू मनी किंतू
 करू आज हितगुज 


सूर्य पण पहातोय 
पुन्हा पुन्हा वळुनिया
किती गोड हास्य तुझे 
तोही थांबला पहाया 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.
 .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.                                                   |त्यावर व ज्या माणसात वावरतो त्यावर पण थोडी फार अवलंबित असते .अथवा 
काही वृत्ती जन्मताच स्वभावात असतात .तर काही वृत्ती परिस्थितीने अंगीकारल्या 
जातात . आता अलिप्त वृत्तीवर बोलावयाचे म्हणजे ही वृत्ती थोडी फार अंगी असते अथवा 
 परिस्थितीने स्वीकारावी लागते, अंगिकारली जाते . अथवा जरूरी पण असते उदाहरणार्थ 
मुले मोठी झाली त्यांच्या संसारात रमली की आपण समजून उमजून अलिप्तता स्विकारण्याची 
जरूरी असते. उगाच उपदेश वा सूचन न करता अलिप्त रहाणे हितावह असते, अर्थात जरूरी असता व विचारणा होता  पण अलिप्तता दर्शनवणे पण योग्य नाही. 
   आणि दुर्लक्षता ही  कधी जाणून बुजून केली जाते वा  कधीआपल्या चुकीमुळे होते.  जेव्हा चुकीने ,तेव्हा ती निष्काळजीपणा दर्शविते. पण काही वेळा  जीवनात दुर्लक्ष करणे म्हणजेच आपल्या पुढील जनरेशन 
काय,किती  कशावर खर्च करतेय वगैरे  बारिक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे , हीच पायरी आहे अलिप्तता कडे 
जाण्याची वा जीवनात अलिप्तता आणण्याची .जेणे करून   नाते संबंध गोड ठेवण्याची  व जीवनाचे खरे सार समजले हे अनुभविण्याची.
       किती ही झाले तरी सर्व सामान्य माणसाचे  जीवन आंब्याच्या कोयी सारखे असते  ,कोय जशी लडबडलेली असते तसे आपण संसारात नाही म्हटले तरी लडबडलेलो असतो चिकूच्या बी प्रमाणे जगणं 
संतांना जमते.
      पण  कित्येकदा असं घरात घडत असतं की ,
     गॅस बाजूला केलेल्या तयारी नुसार  खीर बनणार आहे समजले. पण , ती. का? कशासाठी? चे विचार न येऊ देता तेथे अलिप्तता दर्शनवणे व. गॅसवर चे  तापायला ठेवलेले  , आता ऊतु जाण्याच्या तयारीत  असता ,त्याला  गाजावाजा  न करता 
 दुध जणु न देता  , न दुर्लक्ष करीता    गॅस बंद करण्यात दक्षता दाखविणे . यात कुठे अलिप्तता व दुर्लक्ष 
याची दोन्ही उदा आहेत.
दोन्ही एकाच वेळी संसारातील आंब्याची कोय. क्षणात  जरूरी प्रमाणे (चिकूची बी.)  दक्षताघेणारी होऊ शकते
 तर  अलिप्तता व दुर्लक्षता  सांभाळत जे जीवन जगतात त्यांना जीवनाचा खरा आनंद लुटता येतो.

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

गौरी महालक्ष्मी गौरी


स्पर्धा!स्पर्धा! स्पर्धा
*स्वप्नगंध साहित्य समूहातर्फे ज्येष्ठ गौरीआवाहन आणि गौरी पूजनानिमित्त विशेष काव्यलेखन स्पर्धा 
*स्पर्धा क्रमांक -७९
*दिनांक -१७ सप्टेंबर २०२६ तेदिनांक -१८सप्टेंबर २०२६
विषय. गौरी 
शीर्षक. गिरीजा 

झाले आगमन जेष्ठ गौरीचे
पायी रूळझुळली पैंजणे,
आली सोनियांच्या पाऊले
सदन  भरले आनंद मने

  हिरवीगार केली सृष्टी
कन्याच ती पर्वताची
 नव चैतन्य तिने भरले
गिरीजा ती ब्रम्हांडाची

नेसवून भरजरी साडी
नथ चमके,हाती चुडा हिरवा
शोभे कंठात हिरे माळा
शालु दिसे मोहक बरवा

करून गोडधोड पदार्थ 
नैवेद्यासाठी पुरणपोळी 
  पाही प्रसन्न वदने 
रेखाटलेली सुंदर रांगोळी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बाप्पा आले धावून

साकव्य कथा स्पर्धा २ साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित सन्माननीय डॉ दाखवायची पंडित, विद्या प्रधान,परवीन कौसर आणि सन्मा. समूह सदस्य दत्...