बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

काव्य बत्तीशी\ हल्ली मन फार दाटते \मने झालीत दूर

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित उपक्रम

काव्य लेखन

विषय .. हल्ली मन फार दाटले

     7/9/7/9


झालंय खरं असे

हल्ली मन फार दाटते

जसे वाढले वय

मन उगाच घाबरते.  1


 मुले घेण्या भरारी 

 गेली दूर परदेशात

सणवार येताची

भेटणे नाही प्रत्यक्षात.  2


नुरला साधेपणा 

दिखावा मात्र अतिशय

जन झाले नाटकी

 तीळमात्र नसे संशय. 3


 पूर्वी घरे लहान 

बदलले रहाणीमान 

आता जन दोनच

घर असते आलिशान. 4


संस्कार संस्कृतीचा

पडत चालला विसर

दाटते सारे मनी

  हे चालणार कुठवर.   5


वैशाली वर्तक

अहमदाबाद




मोहरली लेखणी साहित्य समूह 

काव्य बत्तीशी प्रकार 

विषय.. मने झालीत दूर

२७\६\२४ 

 ७\९\७\९

आहे खरे कथन.         

लोप पावला  आता काळ 

मने झालीत दूर 

स्नेह  भावनेचा दुष्काळ 


 आपापल्यात व्यस्त 

कुटुंब दिसती विभक्त 

संवाद  संपुष्टात 

होत नाही बोलून व्यक्त 


भौतिक साधनांचा 

आलाय सर्वत्रची  पूर

 हवी  जवळी सदा 

 संवादातून  केले दूर


 येता सण उत्सव 

 जमून सारे आप्त जन

भेटी गाठी घडती

 आनंदाचे  तेची ते क्षण


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


दरवळणारा स्वप्नगंध


चतुर्थ वर्धापनाचा दिन
आज  करुया साजरा
दरवळणारा स्वप्नगंध
सारस्वतांना ठेवी हासरा


हाताळले समूहाने सहज
अगणित साहित्य प्रकार
प्रशासक  हे चोखंदळ
दिधले ज्ञान आम्हा अपार

देऊन विविध विषय 
संधी दिधली दावण्या चुणुक
सारस्वतांना मिळता खाद्य
सरसावती होऊनी उत्सुक 

दरवळणारा स्वप्नगंध
सेवा माय मराठीची करितो
नको नुसते बोलणे मुखाने
प्रत्यक्षात मायभाषा वाढवितो

किती वर्णू , गावू गुणगान
असाच चालो  समूह सदैव
दरवळती अनेक समूह गंध
पण स्वप्नगंध असे एकमेव

वैशाली वर्तक
अहमदाबाद

आयुष्य तेच आहे



विषय.. आयुष्य तेच आहे


नित्य नेमाने करितो उषा 
रवी येऊनी  गगनी
यामिनीचा तोच शशी
रास खेळतो तारांगणी

रोजची तीच ती सकाळ
न घडता  तयात बदल 
ओघाने येतेच , तेच जगणे
 न वाटे मनाला नवल

नव्या आशेच्या किरणांनी
मानवच शोधतो नावीन्य
करण्या आनंद सोहळा
मिळवितो जीवनी प्राविण्य 

 नदी  आक्रमिते मार्ग
 वाट खडतर , वाहे अविरत
सागर लहरी येती उचंबळुनी
भेटती  किना-यास उसळत

सर्व सर्वची,  असे तेची
 जन्म ते  मृत्यूच्या अवधीत
 आयुष्य आहे, तेच ss तेच 
अबाधित राखावे सदोदित 

 तेच ते  असता आयुष्य
संगीताच्या  सप्त सुरात
इंद्रधनुच्या सप्त रंगाने
जगू आयुष्य, घेत हाती हात


 वैशाली वर्तक
अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...