ठेव
बालपणी पुस्तकातील
मोरपीस, पिंपळपान
चॉकलेटच्या चांदयाची
आगळीच ठेवेची शान
थेंबे थेंबे तळे साचे
बचत करून ठेव पैका
भविष्यात येतो कामी
बचतीचा महिमा ऐका
आई बाबांचे संस्कार
दुसरी अमुल्य ठेव
जीवनात येते कामी
ज्याचे कौतुक एकमेव
बालपणीची संस्काराची
पूंजी मानितो मी ठेवी समान
तिच्या बळावर सदा जीवनी
मिळविला मान सन्मान
संस्काराने सुसंस्कृत
होतो आपण विद्यावान
नसे चोरी भय विद्या ठेवीस
खर्चताही वृध्दी वेगवान
ठेव वाढवावी नित्य
सत्कर्माची जीवनात
पुण्य संचित कर्माने
जाते आयुष्य आनंदात
आठवणींची पूंजी
अतिशय महत्त्वाची
पुन्हा चुका न होण्यास
मनी ते रुजवायची
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा