शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

माणसात मी

माणसात मी      12/2/2021

आहे मानव   , सामाजिक  प्राणी 
रहातो वाढतो तो समाजात
आदि काळापासून  राहे तो
 माणसांच्या च मेळाव्यात

 कसा असेन  मग मी
या जगताहूनी  वेगळा
संत शिकवणीने मी देखील 
पहातो, देव ...माणसात आगळा

मानवता हा मानतो धर्म  
प्रत्येक माणसातच   वसे देव
जाणतो जीवनाचे हे मर्म
जपतो  संस्कृती ची अमुल्य ठेव


मानवास हवा,  मानव संगतीस
पाण्या वाचून,  जगत नाही मीन
*माणसात  मी* रहातो मजेत
तया वीण जीवन असे हीन

माणुसकीने   सदा जगता
मित्र  मंडळी मिळे खूप  सारी
खरी असे  हीच श्रीमंती 
माणसात मी, शोधणे ही किमया न्यारी


वैशाली वर्तक

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

अभंग सारे संत जन

सारे संत जन । सांगे तत्व ज्ञान
 असे ज्ञान खाण  ।   सर्वासाठी       1

दासांचे ते श्लोक । जणू गीता सार
जीवनाचा  भार ।  दूर सारी              2

विश्व शांती मंत्र ।  देती ज्ञानदेव
 अमृताची ठेव  । विश्वालागी              3

जगाच्या कल्याणा  । हे पसायदान
 संस्कृतीची  शान  ।  ज्ञानोबांची           4

ठेवा दृढ श्रद्धा । आहे विठूराया  । 
जगावरी माया ।  तुका सांगे ।।              5

संत बोले तैसे  । करी आचरण । 
वंदती चरण । सर्व लोक ।।                    6


नसे उच नीच।   सर्व ची समान
सांगते महान । संतवाणी  ।।                    7

जनांचा   उध्दार  ।    संताच्या विभुती
असती जगती    ।  संतसारे  ।।                  8


वैशाली वर्तक

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

सहाक्षरी माझी शब्द फुले

विषय - माझी शब्द फुले

 शीर्षक --  शब्द उधळण


मी माझ्या  शब्दांचे
करिते स्वागत 
शब्द गुंफण्याची
कला अवगत                 1

माझी  शब्द फुले
सुगंधी असती
सदा साहित्यात 
शोभून  दिसती               2

मोजून मापून
शब्दांचा  वापर
फापट पसारा 
नकोच खापर                 3


 मनीचे विचार 
 शब्दांची  सोबत    
 होतेची तयार
 छान मनोगत                   4


विचार कल्पना 
मनी उमलता   
शब्द फुले माझी  
दिसे बहरता                     5

शब्द फुले माझी
विविध रंगात    
सुख धैर्य भाव
दावी साहित्यात              6

 
शब्दफुले अशी
हृदयाच्या ठायी
वाहते तयांना
शारदेच्या पायी                7


वैशाली वर्तक
अहमदाबाद  24/1/2021



मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

हत्ती

 लेखणी माझी  देखणी                 8/2/2021

जेष्ठ गझलकार  स्व किरण  जोगळेकर 

जयंती विशेष  काव्य लेखन महा स्पर्धा

फेरी क्र . 3  बालकविता

विषय -- हत्ती


           जाड्या हत्ती 


 विचारात  रस्त्याने ,चालत होता हत्ती  

 का बरे इतर प्राणी, नसती अवजड     

माझेच शरीर  अवाढव्य  किती    ?

तयांचे  बांधे,   कसे  नाही बोजड               1  



पोट तर माझे  , जणू कोठार  घर

पंधरा वीस लाडू , सहज  होती फस्त 

केळ्यांच्या घड तर ,   एकची घासात

बादली भरुनी पाणी , पितो मी मस्त       2     



असा  हा आहार , असताची माझा

 कसे कमी  होणार,   सांगा हे  शरीर

तरी करतोय सदा, विचार मी मनात

उगा नको व्हायला, कदा तो उरीर             3  


मानव  करतात , रोजची व्यायाम

देऊन शरीरास , शिस्तीत तालीम

सुडौल सृदृढ   , राखण्या बांधा

उपाय करतात,  अनेक जालीम              4


डाॕक्टरांना  विचारण्या,   गेला हत्ती 

दिले औषध  तया , बादली    भरुनी

बांध्याची चिंता , नका करु  म्हणताच

सोंड घातली हत्ती ने , घाई करुनी            5


अरे रामा s रामा , किती  कडू औषध

म्हणत  असे हत्ती,   पळतच सुटला

नकोची मला  तो  , सुडौल बांधा 

तेव्हापासून  हत्ती  , जाड्याच राहिला.       6


वैशाली वर्तक 

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

अष्टाक्षरी सावित्री माऊली (साऊ)


प्रेमाची अक्षरेआयोजित
स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी
विषय -- साऊ

   *सावित्री माऊली*

सावित्रीच्या लेकी सा-या
तूच  भरूनी प्रकाश 
केल्या कर्तृत्वान नारी
 तेजाळती त्याआकाश

दिली उघडून द्वारे 
मार्ग  दावि  प्रगतीचा
तूच आद्य स्त्री शिक्षिका
मान तुला सन्मानाचा

ज्योत क्रांतीची तुझ्यात
 ठेवलीस तेजाळत
त्रास  साहूनी प्रजेचा
केले स्रियांना प्रगत

शेण गोळे दगडांचे
साहूनिया भारी घाव
दिली लेखणीस हाती
केले उज्वल स्त्री नाव

सावित्रीच्या आम्ही लेकी
तुला सदैव वंदन
तुझ्यामुळे झाले आज 
तूची दिले संजीवन

वैशाली वर्तक

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...