बुधवार, २९ मार्च, २०२३

वडापाव

काव्य निनाद साहित्य मंच
आयोजित उपक्रम
दि 29/3/23
काव्य लेखन 

विषय..वडा पाव

नाव नुसते उच्चारता
भुक पहा चाळवली 
भरल्या पोटी सुध्दा
खाण्याची मजा आगळी

नाट्य गृहात मध्यांतरात 
वडापाव ची हवी संगत
खाल्याविणा  वडा पाव
पुढचा अंक नाही रंगत

खातो कोणी पोट भरण्या 
तर कोणी खास सवडीने
गरीब असो  वा श्रीमंत
खाद्य पाववडा आवडीने

होता प्रचलित मुंबईचा
आता विख्यात. जगभर
पोट भरण्यास एकमेव
उदर देते  तृप्तीची ढेकर

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, २८ मार्च, २०२३

क्षणभंगुर



भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच ठाणे
आयोजित उपक्रम क्रमांक ९१
विषय.  क्षणभंगुर



जीवन आहे क्षण भंगुर
जगून घ्यावं आनंदाने
पाण्याचा  पहा बुडबुडा
 जगतो  ऐटीत दिमाख्याने

  असते बुडबुडयाचे जीवन
 ख-या अर्थाने क्षणिक
पण कसा  भावतो मनास
उजळून जातो साहजिक.

नभी काळे मेघ जमता
  जाते दामिनी चमकून
 क्षणिक तेज स्वरूप 
क्षणभर जाते प्रकाशून

करा विचार जीवनाचा
क्षण क्षण चालला निसटून
काळ चालला सदैव पुढे 
जशी निसटते वाळू हातातुन

आजची सकाळ येत
नाही पुन्हा परतून
आला तो क्षण आनंदाचा
म्हणत उत्साहाने घ्यावे जगून

वैशाली वर्तक
अहमदाबाद झ

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...