दोघे बैसले एकांती
घेत आनंद निसर्गाचा
आला विचार मनात
आनंदी सहजीवनाचा.
नाव राखिले मनीषा
केली पूर्तता इच्छांची
मोदे विचारात रंगली
मने दोन जिवितांची
वदती एक मेकांना
अजून मज कळेना
पाच दशके सरली
काहीच आकळेना
कधी दिन भासले कष्टाचे
पण होती जाणीव मनाला
होणार चीज श्रमाचे
सुख मिळणार जीवाला.
उन पावसाळे पाहिले
पण नव्हती कधीही भ्रांत
प्रेमाच्या गाडीत खरतर
समाधानी मन सदा शांत
मागे वळून पाहता
ओठात शब्द आले
देवा तुझीच कृपा
सहजीवनी धन्य झाले.