शुक्रवार, २८ जुलै, २०२३

हसले मनी चांदणे

 कल्याण डोंबिवली महानगर 2 

आयोजित उपक्रम 

विषय.हसलेमनी चांदणे 









मना जोगते  होता काम 

आनंदले माझे मन

चकाकत्या उन्हात पण

भासे फुलले नंदनवन


भाव मम अंतरीचे

तयाने सदैव जाणिले

सहज देत हात हाती

सप्त रंगी रंगविले


सहवास त्याचा माझा

प्रीत गंध पसरला

एकमेका देत साथ

संसार ही फुलवला


देवाने.  सारे दिले

महत्वाचे दिले समाधान

भरुन पावले जीवनी

तेच ठरले सर्वोत्तम दान


झाले मनाने संतृप्त

काही न उरे मागणे

हसले मनी चांदणे 

हेची देवास सांगणे




वैशाली वर्तक 

अहमदाबाद





मंगळवार, २५ जुलै, २०२३

करू वन संवर्धन \ वृक्षारोपण

अखंडित कल्याणकारी काव्य
आयोजित उपक्रम
विषय..करू वन संवर्धन
   *वृक्ष सोयरे साथी*
वेळ आली आहे आता
वनांकडे देणे लक्ष
राने वने केली नाश
 वृक्षारोपण   दुर्लक्ष 

करा लगबग आता
लावा आपापल्या अंगणी
पुष्प भाज्यांची रोपे  
पहा हिरवी धरणी

लावू वृक्ष  सभोवती
निसर्गाचे संवर्धन 
शुध्द हवेचे योजन
आरोग्यासाठी वर्धन

वृक्ष असती सोबती
देती अन्न न  निवारा
करी माया देत छाया
जीवनासाठी सहारा 

वृक्ष संवर्धन करा
 -हास थांबवा वनांचा
येता संपुष्टात वायु
टाळा प्रसंग धोक्याचा

वैशाली वर्तक
अहमदाबाद




आ भा म भा प शब्दभाव
आयोजित उपक्रम
विषय.. वृक्षारोपण 


बरसत आहे सरीवर सरी
अलवार जणू रेशीम धारा
दिसतेय हिरवळ सर्वत्र
 जणू पाचूचा पसरला पसारा

करा लगबग आता
लावा आपापल्या अंगणी
पुष्प भाज्यांची रोपे  
पहा हिरवी धरणी
 
लावता वृक्ष  सभोवती
वाढेल सुंदर पर्यावरण
शुध्द हवेचे  नियोजन
आरोग्याचे करेल वर्धन

वृक्षारोपण केल्याने 
मिळेल प्राणवायू  आपणाला
प्रगतीच्या नावे केलीय वृक्ष तोड 
 आता दुःख  होतय मनाला

वैशाली वर्तक
अहमदाबाद

रविवार, २३ जुलै, २०२३

.श्रावण धारा .. नाचतआलाश्रावण \मन भावना श्रावण श्रावणी उत्सव

 वर्ल्ड व्हिजन टाईम्स २९\७\२५

 *नाचत आला श्रावण


सुरु झाला ऋतु वर्षा

नभ  दाटले मेघांनी  

दाहकता कमी भासे

आदित्याची नभांगणी


गर्दी  जलदांची नभी

गर्जताती कृष्ण मेघ

झाली घाई बरसण्या

मधे चमके वीज रेघ


ढोल ताशांच्या गर्जना

धुवादार   बरसात

भासे फाटले आभाळ

वारा वाहतो जोशात 



घन आले ओथंबूनी 

  लपंडाव चाले खेळ

मेघ   गातात मल्हार 

जमे पावसाचा मेळ


कड्यातून वाहे  झरे

जणू शुभ्र दुग्ध धारा

खाच खळगे भरले

शीळ घाली मंद वारा


जणु सरी मोतीयांच्या

 भासताती जल धारा

वाहे ओहोळ सर्वत्र 

ओली चिंब झाली धरा


वैशाली वर्तक






मनभावन श्रावण काव्य शृंखला

कल्पतरू जागतिक साहित्य मंच आयोजित

काव्य शृंखलेत स्मिता भिमनवार व अंजली देशपांडे (नाशिक) यांना आमंत्रित केले आहे 

माझी रचना👇🏼

विषय... मनभावन श्रावण 

          *सणवार आनंदाचा श्रावण*मनभावन \



मास  आषाढ   सरला

सुरु  झाल्या श्रावण धारा

रिमझिम पडे पाऊस

थंड झोबतो अंगा वारा


 ऊन आले म्हणताच

सरी वर सरी  बरसती

लपंडाव ऊन पावसाचा

 पक्षी मजेत विहरती


 वाहती खळखळ नद्या

उंच कड्यावरुनी प्रपात

किती मोहक सृष्टी सजली

   गाणे गाई  वारा जोरात


येता श्रावण महिना

येई उधाण उत्साहाला

असे सणांचा  सोहळा

सीमा  न  उरे आनंदाला


होते श्रावणाची सुरुवात 

दिव्याच्या आवसेने

दीप पूजन करती नारी

भाव कृतार्थ जागवणे


याच  महिन्यात येतो 

कृष्ण जन्म,बैलपोळा

अन् रक्षा बंधन दिनाला

आप्त जन होती गोळा


अशी सणांची रेलचेल

असे आवडीचा श्रावण

होती आप्त जनांच्या भेटी

मास असे *मन भावन*


वैशाली वर्तक

अहमदाबाद








भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच
आयोजित काव्यलेखन उपक्रम
विषय.. श्रावण सरताना

आला आला म्हणता 
वेळ आली हो सरण्याची
किती आनंद सुखाचे
क्षण होते म्हणण्याची

लेकी येता माहेरास
घर गोकुळ बनले गोकुळ
हास्य मोदाचे स्नेहाचे
नातवंडांचा धुमाकूळ

भाऊ बहिणींच्या प्रेमाचे बंधन
कृष्ण जन्माष्टमी सोहळा
  मंगळागौरी पूजनाची
मजा लुटण्या भगिनी गोळा


केली पूजा वाहूनी शिवामुठ
भोळ्या शिव शंकराला
कसा सरला  मासश्रावण
कळेना क्षणभर मनाला

रिमझिम झेलल्या रेशीम सरी
काही म्हणा श्रावण पावन
उगा का म्हणती जन
श्रावण अती भावन

वैशाली वर्तक
अहमदाबाद



सुवर्ण साहित्य मंच 
स्पर्धेसाठी
स्पर्धा क्रमांक 1
दि 28/7/25
दशाक्षरी काव्यलेखन 
विषय ... श्रावणी उत्सव 

शीर्षक ...श्रावण मनभावन 

पाचोळा उडला सभोवती
वाहे वारा पहा सोसाट्याचा
फेर धरुनी नाचली पाने
बरसल्या सरी  श्रावणाच्या .

बरसता  श्रावणाच्या सरी  
 धरा  हिरवाईने नटली
जणु प्रीतीच्याच पावसात
नव वधू सजली धजली.


प्रीत पावसाने अंकुरली.
बीजांकुरे फुटे अलवार.
नेसुनिया  हिरवा  तो शालू. 
लाजूनी  मुरडे हळुवार.

श्रावणात चालेआदित्याचा
खेळ पहा ,ऊन पावसाचा 
सर सर क्षणी,  बरसूनी
पहावे, तर दिन ऊन्हाचा   

*श्रावणी उत्सव* सणवार
येती लेकी बाळी माहेरासी,
चाले पूजन मंगळागौरीचे
वाही बल्व पत्र शंकरासी.


बांधूनीया झुले अंगणात
लावुनी मेहंदी हातावरी,
मुली झुलती झोके घेउनी
पूजती नागाला घरोघरी.

 काळच हा, नव सृजनाचा 
 महिना तोची असे ,श्रावण
येतसे आनंदाला उधाण
सर्वांचा असे, मन भावन

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...