भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच बुलढाणा आयोजित उपक्रम
राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा
विषय..पत्र लिहिण्यास कारण की,
शीर्षक...*आठवणी मनीच्या*
दिन हरपले राहिल्या फक्त आठवणी
वाट पहात बसणे वाटे भारी
कधी येईल पोस्टमन
पत्र देण्या आपल्या दारी
विचार पूस होई एकमेकांना
आला का ग पोस्ट मन
पत्र नाही मुलांचे कधीचे
काळजीत जातात एक एक क्षण
आता नाही मजा पत्राची
तेच तेच पत्र वाचण्याची
वाचून घडी करुन जपून
ठेवलेल्या अनेक पत्रांची
आता केले विज्ञानाने
जग अतिशय सुलभ
प्रत्यक्ष पहाणे होते क्षणात
काळजी , चिंतेचे नुरे मळभ
लहान सहान गोष्टी पण
कळतात मिचकविता पापणी
थेट घरात पोहचून , शिरून
नजरेने होते प्रत्यक्ष देखणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद