सावली प्रकाशन समुह
अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा
काव्यचोरी
लेखणीला द्यावी धार
विचारांना द्या प्रेरणा
नका करु काव्य चोरी
द्यावी बुध्दीला चेतना
करा साहित्य वाचन
मिळे विचार नवीन
शब्द भंडार समृद्ध शब्द होतील समृद्ध
येते लिखाणी प्राविण्य
नको चोरी साहित्याची
शारदेचा ठेवा मान
स्वरचित लिखाणास
मिळे जगती सन्मान
करी विचारांची चोरी
दावी लिखाणी हुशारी
शारदेच्या दरबारी
करा भाषेची तयारी
स्वरचित साहित्याने
मोद मिळे मना खरा
फुलविता शब्द मळा
वाहे साहित्याचा झरा
वैशाली वर्तक 5/12/20
अहमदाबाद