शुक्रवार, ३० जुलै, २०२१

पैसा ...चाराक्षरी पैसा ....दीन कुटुंब

चाराक्षरी  
विषय - कुटुंब

आई बाबा
आणि मुले
कुटुंबात 
मन झुले


आजी आबा
 पण हवे  
कुटुंबास
रुप  नवे

कुटुंबाची
शिकवण
करी जन
 आठवण

सर्वांनाही
 देती मान
कुटुंबाची 
दिसे शान


सुख वाटे
कुटुंबात
समवेत सारेजन

कुटुंबात         
ती सकाळ      
मजा येई        
सदाकाळ  

कुटुंबात
होई ऊषा
सदा देई
  नव आशा


माझी  लेखणी चाराक्षरी मंच
विषय- पैसा

 हवा जर
पैसा पैसा
करा कष्ट
मिळे ऐसा

 पैशानेच
चाले जग
करा श्रम
मिळे मग


जग धावे
पैशा मागे
तयानेच
जुळे धागे

पोटासाठी 
हवा पैसा
तया विणा
जगु कैसा

कामे होती
पटापट
देता पैसा 
झटपट

किती केले
तरी मान
पैशाचीच
दिसे शान

पैशाचाच
खेळ सारा 
जगी तोच
शोभे न्यारा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



शब्दवेड साहित्य  समूह
उपक्रम
विषय - दीन


असतात
काही दीन
नका मानू 
तया हीन        १

समाजात 
नको भेद
 मनी सदा
वाटे खेद           २

बुध्दी  द्यावी
मज देवा
घडो नित्य 
त्यांची सेवा          ३
 
 द्यावे नित्य 
इतरास 
जवळ जे
असे  रास         ४

भुकेल्यास
अन्न् दान
तेची कर्म
ते महान         ५


 दलितांची
  करी सेवा
तोची असे
खरा ठेवा    6










औक्षण प्रेमाचे ....प्रणाली म्हात्रे

अ भा म सा प स्वप्नगंध समूह 
विषय -- औक्षण  प्रेमाचे

शुभदिन असे आज
केले ताम्हन तयार
करण्या औक्षण प्रेमाचे
मनी दाटे आनंद फार

गुणी साहित्यिका प्रणु
किती कला तिला अवगत
चाराक्षरी ची निर्मीतीकार
गायन ग्राफिक्स पारंगत

विद्या विनयेन शोभते
म्हण तंतोतत खरी
तिच्या स्वभावात दिसे 
म्हण   ही सर्वोतोपरि

 
मराठी भाषा सेवेचा वसा
जणु उचलला  प्रणालीने
व्याकरण वर्ग चालविते
उपक्रम घेते   सातत्याने

औक्षण करिता मागणे
हेच   देवी शारदेला
उदंड निरोगी  आयुष्य 
लाभो  लाडक्या प्रणालीला


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २८ जुलै, २०२१

कोसळले आभाळ

कोसळले  आभाळ

सुरु झाला ऋतु वर्षा
नभ  दाटले मेघांनी  
दाहकता कमी भासे
आदित्याची नभांगणी


गर्दी  जलदांची नभी
गर्जताती कृष्ण मेघ
झाली घाई बरसण्या
मधे चमके वीज रेघ

ढोल ताशांच्या गर्जना
धुवादार   बरसात
भासे फाटले आभाळ
वारा वाहतो जोरात  


घन आले ओथंबूनी 
  लपंडाव चाले खेळ
मेघ   गातात मल्हार 
जमे पावसाचा मेळ

कड्यातून वाहे  झरे
जणू शुभ्र दुग्ध धारा
खाच खळगे भरले
शीळ घाली मंद वारा

 
जणु सरी मोतीयांच्या
 भासताती जल धारा
वाहे ओहोळ सर्वत्र 
ओली चिंब झाली धरा


वैशाली वर्तक

सोमवार, २६ जुलै, २०२१

अष्टाक्षरी रुप सावळे सुंदर

माझी लेखणी आष्टाक्षरी मंच
अष्टाक्षरी
       *माझा विठुराया*

माझ्या  विठ्ठलाचे पहा
रुप सावळे सुंदर 
भान माझे हरपते
वाटे पाहू निरंतर                 1

भाळी उटी चंदनाची
गळा तुळशीच्या माळा
कर कटी वरी  शोभे
दाटे पाहता उमाळा                 2

कानी कुंडले शोभती
मुख भासे ते सुंदर 
कटी शोभे  पितांबर
मना भासे मनोहर            3

रुप तुझे आवडीचे
सदा नयनी ठसते
डोळा भरुनी सदैव
चित्तातून मी पाहते        4

*रुप सावळे सुंदर* 
आता  दाखवा चरण
कधी देशील दर्शन  
आले तुजला शरण            5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद












रविवार, २५ जुलै, २०२१

कालचक्र

सायबर क्राईम 
           
काव्यपुष्प  साहित्य  मंच.               
आयोजित  काव्य स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
विषय -- कालचक्र

    *काळ जाई पुढे*



कालचक्र चाले अविरत
 थांबे  न कधी कोणासाठी
आली वेळ न  येई पुन्हा          
अशक्य  पुन्हा   मिळण्यासाठी   


होत असती सदाकाळ
कालचक्रात ऊषा निशा
जसे चाले खेळ सुखदुःखाचा
रोज नव्याने मिळती दिशा

सूर्या भोवती  फिरे  वसुधा 
होई रोजच  नवी सकाळ
युगानुयुगे कालचक्र चालतय
आजचा वर्तमान  होई भुतकाळ 

प्राप्त काळ हा विशाल सुंदर 
नका दवडवू  वर्तमानास
क्षण क्षण उपभोगावा
उज्वल करण्या भविष्यास

जसे होता पाने पिवळी 
जागा करीती हिरव्यास
सृजन वृध्दी लय चाले
कालचक्रात न होता उदास

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...