पर्ण
वाटते सानुले पर्ण मी व्हावे
इवले हिरवे , वायुसंगे झुलावे
नक्षीदार अति ,पान पिंपळाचे
तर कधी असावे पर्ण वेलीवर चे
वाटते सानुले पर्ण मी व्हावे
आम्रतरूच्या , गर्द फांदी वरती
घनदाट छायेची, माया द्यावी जगती
मंगल समयी , तोरण रुपी सजावे
तांबुल पानातून ,प्रभुसेवेशी रुजावे
वाटते सानुले पर्ण मी व्हावे
कमळ पत्रासम , जगाअलिप्तता दावावी
सोने लुटुनी , मनीं स्नेहता जपावी
सोने लुटुनी , मनीं स्नेहता जपावी
पर्णकुटी करिता , झावळ्या बनावे
लक्ष्मी रूपाने , स्वच्छ सदन करावे
वाटते सानुले पर्ण मी व्हावे
पवित्रता जपण्या , अंगणीची तुळस व्हावे
हरीच्या कंठी , तुळस माळेतून शोभावे
अवनीच्या कुशीत , निसर्ग रुपी वसावे
रोपलतातरू रूपाने,हरित चैतन्य वाढवावे
वाटते सानुले पर्ण मी व्हावे वैशाली वर्तक .. 3/7/2017
अंतर्मन काव्य संग्रहातील