शनिवार, १९ जून, २०२१

देवमाणूस

अ भा म सा प समूह 2
उपक्रम
विषय -- देव माणूस

देव वसे  प्रत्येकात
जसे होतेची सत्कृत्य
तेव्हा  तो देवमाणूस
 करी दानव दुष्कृत्य

  मदतीस सदा तत्पर
 गरजूंना दावी प्रेमभाव
 माणसुकी जपणूक
 तया द्वेष  नसे ठाव

पहा कामगार जन
केले देव काम कोरोनात
जोडीला नर्स डाॕक्टरांनी
केली सेवा रूग्णांची समाजात

संतानी करुनी सजाण
दिले ज्ञान सामान्य  जनास
दिले बोधक विचार ज्ञान
उमजण्या देव कर्मास

जिथे असे सत्कर्म 
तेथे वसे देवत्व
म्हणून संत सांगी सदा
कर्मात आसे प्रभुत्व 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

ठेवू भान निसर्गाचे

अ भा म सा प स्वप्नगंध समूह
आयोजित  उपक्रम
विषय- ठेवू भान निसर्गाचे

*निसर्ग  हाची देव*

नसे  दुजा देव कोणी 
निसर्गास  माना  देव 
 असे कर्ता करविता
तोच देई सुखाची ठेव

दिन क्रम चाले आज्ञेनुसार
येई नित्य सूर्य  नेमाने 
घडे दिनरात्र, ऋतुचक्र
पडे पाऊस , येई थंडी क्रमाने

स्वच्छ ठेवा वसुधेला
तरु वृक्षाचे महत्त्व माना
मग पहा बरसती धारा
जल हेची जीवन जाणा

 मानवा सह, जल चर प्राणी  
राखू  स्वच्छ  सरोवर सरिता
सारे अवलंबित जलावरती
आशीष रुपे पोशिंद्या करिता

 
आरोग्याची  घेत काळजी
स्वच्छ  राखण्या पर्यावरण
दक्षतेने *ठेवू भान निसर्गाचे*
सदा दूर होईल प्रदुषण


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अष्टाक्षरी दागिना

काव्यस्पंदन राज्य स्तरीय 02
आष्टाक्षरी रचना
विषय - दागिना

हिरे मोती सोनियाचे
आभुषणे आहे बरी
बाह्य रुप शोभविण्या
येती मदतीस खरी                1

हाती सुवर्ण  कंकण
शोभा देतसे हातास 
पण खरी शोभा दिसे 
जेव्हा पुढे तो दानास              2

विद्या असे जो दागिना
दडलेला हृदयात
नसे भय होण्या चोरी
भुषवितो जगतात                   3

विनयता आभूषण
सर्व  जगात महान
 मोल तयाचे सदैव
दागिन्यात  मौल्यवान             4

नाव कुळाचे राखिती
तेची दागिने महान
अशी बालके भुषणे
तोच खरा बहुमान           5
...........................वैशाली वर्तक

गुरुवार, १७ जून, २०२१

...अष्टाक्षरी. आठवण

माझी लेखणी अष्टाक्षरी मंच
आठवण
 विषय --आठवण 

रम्य  जुन्या दिवसांची
आहे मज आठवण
जेथे भेटलो आपण
केली मनी साठवण

किती केलेस  नखरे
 कधी नसे वेळेवर
मात्र  मी असे उभाची  
 तुझ्या भावा बरोबर



हात तुझा माझ्या  हाती
दिली वचने जोडीने
पहा हसली सुमने
पाहुनीया ती प्रीतीने



आज आलो तेथे दोघे
चंद्र  पहा हासला
आठवून तीच रात
वृक्ष फुलानी बहरला

अशी भेट स्मरणात
कसे  होई विस्मरण
तुझ्या  माझ्या  मनातली
राही सदा आठवण

वैशाली वर्तक
अहमदाबाद

चित्र काव्य....कल्पना पूर्ती

शब्दरजनी साहित्य  समूह 
चित्र  काव्य

*कल्पना पूर्ती*

आला आला पाऊस आला
निळे अथांग चोहीकडे पाणी 
वर्षा धारेची वरून बरसात
चल सखे गाऊया प्रीत गाणी

झेलू थेंब पावसाचे मिळूनी
करुया नौका विहार मजेत
लुटूया आनंद पहिल्या पावसाचा
किती मजेचे क्षण आलेत

 लाल नौका  लाल छत्री 
फुल नावेत फुललेले सुंदर 
दोघे आपण उभे नावेत
जन बघतात दृश्य  मनोहर

आला बघ तो  दिसे पैलतीर
थांबेल आता तो पाऊस
कागदाचीच ती होती नौका
कल्पनेतील पूर्ण  झाली हौस

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, १६ जून, २०२१

अष्टाक्षरी चला जाऊ या रानात

 अ भा म सा प स्वप्नगंध समूह 

विषय -चला जाऊ या रानात

अष्टाक्षरी

   

चला जाऊ भटकण्या

मजा वाटे रानी वनी

 फोफावल्या तरुवेली

मोद मिळे  मनोमनी


शुध्द निर्मळ  निसर्ग 

हिंडू फिरु रानातूनी

वारा गाई गोड गाणी

पक्षी गाती वृक्षातूनी


रान मेवा चाखण्याची

लूटु मजा आनंदाने

चिंच  करवंदे खात

मस्त  रमूया मोदाने



झेलू थेंब पावसाचे

निसर्गाच्या  सानिध्यात 

रमणीय निसर्ग  हा

वेळ घालवू रानात


वर्षा धारा बरसता

धरा होईल हरित

पहा नेसली लाजत

दिसे सुंदर  खचित


वैशाली वर्तक

सोमवार, १४ जून, २०२१

उधळला रंग प्रीतीचा

नक्षत्र वेल साहित्य  समूह
काव्य -- उधळला रंग प्रीतीचा

 वर्षभरात ऋतु  सहा धरेचे
प्रत्येक  ऋतूत रुप वेगळे
एकाहून एक दिसे तयाते
सहा ऋतू चे सहा सोहळे

येता ऋतू तो वसंत 
वदती ऋतूंचा राजा
आनंदे बहरे अवनी
उगा का त्याचा गाजावाजा

नानाविध रंगी फुले फुलली
कुणी काढली रांगोळी धरेवर
लाल केशरी पीत वर्णी रंगात
पहाण्या मोह न आवरे क्षणभर

पळस बहवा फूलोनी
करी हळद कुंकूची उधळण
उधळला सर्वत्र  रंग प्रीती चा
किती करावी रंगाची  साठवण

वसंत  ऋतुची  ही किमया
धरेने उधळले रंग  प्रीतीचे
पहा कशी लाजून बहरली
स्वागत होई ऋतुराजाचे.

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...