स्वार्थ
म्हणती जरी,मनी स्वार्थ नसावा
क्षणा क्षणा ला नजरेस यावा
वससी स्वार्थ सर्व कर्मातुनी
स्वार्थ विरहीत कर्मची न घडी
म्हणती जरी मनी स्वार्थ नसावा
देवावरती ठेवती श्रद्धा
श्र द्धेमागे स्वार्थ कर्मपुर्तीचा
मदतीसाठी हात लांबविता
स्वार्थ दडलेला सन्मानाचा, प्रतिष्ठ्तेचा
म्हणती जरी मनी स्वार्थ नसावा
निवांतपणा अनुभविता सुद्धा
स्वार्थ असे मन:शांतीचा
माये पोटी नातीगोती सारी
स्वार्थ तयात उद्याची आधार काठी
म्हणती जरी स्वार्थ मनी नसावा
घडविता बालक ज्ञानी -संस्कारी
मोठे-पणाची झालर जोडलेली
ज्ञान संपदा, संपादन करिता
स्वार्थ असे कर्तृत्व बलाचा
म्हणती जरी मनी स्वार्थ नसावा
जग हे असे बाजार स्वार्थाचे
पदोपदी स्वार्थ भरलासे
पण दुज- हितात स्वार्थ नसावा
निस्वार्थी पण तिथे असावा
म्हणती जरी मनी स्वार्थ नसावा
प्रेमाची अक्षरे समुह
राज्य स्तरीय स्पर्धा
महा अंतीम फेरी 1
अष्टाक्षरी काव्य
विषय......... स्वार्थ
स्वार्थ
स्वार्थ नसावा कधीच
स्वार्था विणा नसे कर्म
क्षणा क्षणाला तो दिसे
हेच कर्माचे ते मर्म
श्रध्दा असे देवावर
स्वार्थ तो ईच्छापूर्तीचा
देती हात मदतीचा
स्वार्थ , मान सन्मानाचा
निवांतात सुध्दा वसे
ईच्छा ती मनःशांतीची
मायेपोटी नाती गोती
काठी हवी आधाराची
घडविता मुला ज्ञानी
स्वार्थ रूळे कर्तव्याचा
ज्ञान मिळवी मुले ती
स्वार्थ कर्तृत्व बलाचा
पदोपदी भरलेला
दुजा हिता तो नसावा
जरी बाजार स्वार्थाचा
तेथे निःस्वार्थ असावा
......वैशाली वर्तक 5/11/2019