शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

मी भाग्यवान आहे

*स्पर्धेसाठी*
ArLiEn ka  मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित भव्य राज्यस्तरीय मासिक १५ ऑगस्ट 
स्वतंत्र दिनानिमित्त विशेष काव्यलेखन स्पर्धा 
क्रमांक २४
विषय ..मी भाग्यवान आहे 

शीर्षक.. भाग्यवान मी नागरिक भारताचा 


भारत देश माझा महान
मला त्याचा सदा अभिमान
प्राणाहूनी असे मज प्रिय
गौरविण्यात असे माझी शान

वसे समतेचा भाव सर्वत्र 
न दिसे कधी भेद भाव तयात
असुनिया जाती धर्म अनेक
असा देश नसे कुठे जगात

एकता नांदे माझ्या  देशात
विलीन केलीत संस्थाने अनेक
राखुनिया मान वल्लभभाईंचा
घडविला अखंड भारत एक.

भारतभूचा मी  नागरिक भाग्यवान  
स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा
लाल ,बाल ,पालांची स्मृती जागता
नागरिकांचा  उंचावतो माथा


अभिमान वाटे शास्त्रज्ञांचा
 नव्या युगाचा बदल घडविण्यात 
  प्रगतीशील  भारत देश माझा
टाकिले  पहिलं पाऊल अंतरिक्षात


वैशाली वर्तक
अहमदाबाद 

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

हितचिंतक

 भा सा व सां मंच गडचिरोली

आयोजित

उपक्रमासाठी

विषय -  हितचिंतक



देव  असे हितचिंतक पहिला

होता उषःकाल वंदतो तयाला

दावितो नवी उषा नव आशांची

प्रफुल्लित करितो जन मनाला.


हितचिंतक देती शुभ कामना

होता उत्तेजित पडते  पाऊल

यश  मिळवण्या मिळते चैतन्य

मनाला लागते यशाची चाहुल.


मंगल दिन वा वर्धापन दिनी

करिती वर्षाव हितचिंतनाचा

वाचता ऐकता शुभ संदेशांना

पारावार न उरतो आनंदाचा


हितचिंतक रहावेच  सदाची

न लागतो पैका गोड बोलण्यात

सदा शुभेच्छा द्याव्या मना पासूनी

कशाला ती दरिद्रता वचनात


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

मोकळा श्वास पिंजऱ्यातील पक्षी


विश्व शारदा सा मी मुख्य 
विषय... मोकळा श्वास 
     शीर्षक..पिंज-यातला पक्षी

 साद ऐकून खगांची 
सय येतेच मनात 
जीव लागत नाही रे
जावे बाहेर क्षणात .

रोज चाखतो  रे फळे
नाही कशाची उणीव 
 स्वच्छंदाने न वागणे 
याची होतेच जाणीव

 येता कानी किलरव
वाटे आकाशी उडावे 
श्वास मोकळा घेऊन 
मित्रांसमवेत रमावे,

धन्यवाद रे मालका 
तुला कळली रे आस
घेत उंच उंच भरारी 
घेतोय मोकळा श्वास 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...