सुंदर मी होणार
22/1/25
आजीच्या हातात राईंटींग पॅड पेन घेऊन विचार करत बसलेली पाहून नातीने विचारले
काय ग आजी तुमच्या विविधतेत तुम्हाला पण होम वर्क देतात काय
आणि एवढं काय लिहीत आहे .
बघू बघू
आणि तिने मोठ्याने हेडींग वाचले ..सुंदर मी होणार .
व लगेच नातं वदली अगं आजी तू सुंदर आहेस च की अजून किती सुंदर होणार
म्हणत पळून गेली. कारण तिला आजी जीव की प्राण. प्रेमळमाया ममतेने भरलेली तिची ती सुंदरतेची मूर्ती.
कसं असतं ना बाह्य सुंदरतेला जग पहात असते.
पण खरं तर मनाच्या आरशात दडलेली सुंदरता पहावी
गोड मृदू भाषी बोलणे. प्रेमळ ममता माया ने भरलेले मन, परोपकारी स्वभाव.. हुशार असूनही विनयता, अहंकाराचा लवलेशही नाही, पैशाचा, विद्येचा गर्व नसणे. मनाची उदारता ,आवड सत्कर्माची ही सर्व आंतरिक सुंदरतेची उदाहरणे होत.. ह्याच सौंदर्यतेत माणसाची खरी सुंदरता दडलेली आहे. आपण सा-यांना बाह्य सुंदरतेची भुरळ पडते.
साधी सर्व सामान्य दिसणारी , पण सतत सर्वांना धावत जाऊन मदतीला येणारी, भले दिसण्यात रूपवती नाही पण ,तिच्या कर्माने आकर्षक व्यक्तिमत्वाची व्यक्ती बनते. आणि त्यातच तिच्या मनमिळाऊ स्वभावाने परोपकारी वृत्तीच्या स्वभावाने ती बाह्य सुंदरतेला मात करते. बाबा आमटे कुटुंब सुंदरतेत आहेतच पण कुष्ठरोग्यांना पण करून कर्म सौंदर्याने ते देश भरात उजळले. तर कर्मात सौंदर्य आहे. ते सौंदर्य आपापल्या नजरेत आले पाहिजे. तर असे सौंदर्य प्रत्येक मानवात दडलेले आहे. कोणी कलाकृती, वाद्य ,
बागायती ,निसर्ग चित्रण वगैरेमधे आपली सुंदरता दाखवित असतो. तर त्या गुणांनी उजळून सौंदर्य वाढवितो.प्रत्येक जण सुंदर असतो.
कित्येक नट नायक त्यांच्या अभिनयाने उजळून सुंदरतेला मात करून उत्तम नटसम्राट होतात.
निसर्ग आपली सुंदरता क्षणाला दाखवितो.व तो पाहून आपण आनंद घेतो. साधे पिवळे पिकलेले पान पण कसे मस्त गिरकी घेत भुमीवर येते. पण त्याच्या पडण्यातील सुंदरता सर्वांनाच जाणविले असे नाही. कारण
त्या कृतीकडे पहाण्याची ती दृष्टी पाहिजे तर त्यात सौंदर्य जाणविते. तर सर्वत्र सुंदरता भरलेली आहे.
त्यात आपण पण कर्माने आपण आपल्याला सुंदर बनवू शकतो. आपण सुंदर बनतो.
आता पहा विविधोत्सवात वा वर्धापनदिन साजरा करतांना, आपापले सुंदर कलागुण प्रदर्शित करून
सारे कलाकार सुंदर झालेच ना . आणि सारेच जण सुंदर भासले ,दिसले , सुंदर झाले ना !
तसेच आपणही आपापले सौंदर्य दाखवून. ... सुंदर होतच असतो .आणि. सुंदर होणार च असतो.
नमस्कार